मंदीत नोकरीची संधी; AIIMS मध्ये बंपर भरती, मिळणार सातवा वेतन आयोग

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात मंदीचं वातावरण निर्णाण झालं आहे. अनेकजण बेरोजगार झाले. अशा मंदीच्या परिस्थितीत सरकारी नोकरीची संधी आली आहे. ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेज (AIIMS) मध्ये नर्सिंग ऑफिसर पदासाठी मोठी भरती निघाली आहे. AIIMS मध्ये ३,८०३ जागांसाठी भरती निघाली असून अर्ज मागवण्यात येत आहेत.

महत्वाचं म्हणजे नविन नियुक्त करण्यात येणाऱ्या नर्सिंग ऑफिसरना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया नर्सिंग ऑफिसर रिक्रूटमेंट कॉमन इलिजिबिलिटी टेस्ट (NORCET) २०२० मार्फत केली जात आहे. इंडियन नर्सिंग काउंसिल, स्टेट नर्सिंग काउंसिल यांच्याद्वारा मान्य संस्थामधून उमेदर बीएससी नर्सिंग किंवा बीएससी (पोस्ट सर्टिफिकेशन)/पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग उत्तीर्ण असावा.

या पदासाठी उमेदवाराचं वय १८ ते ३० वर्ष असावं. SC/ST वर्गासाठी पाच वर्षे आणि ओबीसीसाठी तीन वर्षे यामध्ये सूट देण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदरांची निवड ऑनलाईन टेस्ट आणि मेरिट लिस्टनुसार केली जाणार आहे. उमेदवारांनी तीन तासांची परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये २०० गुणांसाठी २०० वैकल्पिक प्रश्न विचारले जातील.

AIIMS Nursing Officer Exam 2020 : Vacancy Details

AIIMS नवी दिल्ली 597 जागा
AIIMS भूवनेश्वर 600 जागा
AIIMS  देवगड 150 जागा
AIIMS गोरखपूर 100 जागा
AIIMS जोधपूर 176 जागा
AIIMS कल्याणी 600 जागा
AIIMS मंगलागिरी 140 जागा
AIIMS नागपूर 100 जागा
AIIMS पाटना 200 जागा
AIIMS राय बरेली 594 जागा
AIIMS रायपूर 246 जागा
AIIMS ऋषिकेश 300 जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२० आहे. ओबीसीच्या उमेदरांना १,५०० तर SC/ST साठी असणाऱ्या उमेदरांना १२०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अर्ज दाखल केल्यानंतर एक सप्टेंबर रोजी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. AIIMS नर्सिंग ऑफिसर भरतीसाठी इच्छुकांना aiimsexams.org या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज दाखल करता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aiims nursing officer recruitment 2020 nck

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण
ताज्या बातम्या