गणेशभक्तांसाठी संकष्टी चतुर्थी हा दर महिन्यात येणारा एक मंगलमय दिवस असतो. जेव्हा संकष्टी चतुर्थी आणि मंगळवार हा योग जुळून येतो तेव्हा त्याचं महत्त्व द्विगुणित होतं. यंदा नोव्हेंबर महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग आहे. अनेक जण संकष्टीच्या दिवशी एक दिवसाचा उपवास करून बाप्पासाठी व्रत ठेवतात. गणपती बाप्पाच्या आराधनेसाठी उपवास आणि चंद्रदर्शन हे एक गणितचं आहे. त्यामुळे आज तुम्ही विधिवत अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर पहा आज संध्याकाळी किती वाजता चंद्रदर्शनानंतर तुम्ही या उपवासाची सांगता करू शकता?
संकष्ट चतुर्थी : मंगळवार, २३ नोव्हेंबर २०२१
कार्तिक वद्य चतुर्थी प्रारंभ : सोमवार, २२ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजून २६ मिनिटे.
कार्तिक वद्य चतुर्थी समाप्ती : बुधवार, २४ नोव्हेंबर २०२१ रोजी मध्यरात्री १२ वाजून ५५ मिनिटे.
हिंदू पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असली, तरी संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाला महत्त्व असते. म्हणून नोव्हेंबर महिन्यातील संकष्ट चतुर्थी व्रत मंगळवार, २३ नोव्हेंबर २०२१ रोजी करावे, असे सांगितले जाते. नोव्हेंबरमधील कार्तिक वद्य चतुर्थी मंगळवारी असल्या कारणाने ही अंगारकी संकष्ट चतुर्थी असून, या दिवशी विशेष योग जुळून येत आहे. या योगात केलेले पूजन शुभ मानले जाते. व्रत करणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२१ चंद्रदर्शन वेळ
मुंबई: रात्री ०९ वाजून ०६ मिनिटे
ठाणे: रात्री ०९ वाजून ०५ मिनिटे
पुणे: रात्री ०९ वाजून ०३ मिनिटे
रत्नागिरी : रात्री ०९ वाजून ०८ मिनिटे
कोल्हापूर: रात्री ०९ वाजून ०५ मिनिटे
सातारा: रात्री ०९ वाजून ०४ मिनिटे
नाशिक: रात्री ०८ वाजून ५९ मिनिटे
अहमदनगर: रात्री ०८ वाजून ५८ मिनिटे
धुळे: रात्री ०८ वाजून ५३ मिनिटे
जळगाव: रात्री ०८ वाजून ५० मिनिटे
वर्धा: रात्री ०८ वाजून ३८ मिनिटे
यवतमाळ: रात्री ०८ वाजून ४० मिनिटे
बीड: रात्री ०८ वाजून ५४ मिनिटे
सांगली: रात्री ०९ वाजून ०३ मिनिटे
सावंतवाडी: रात्री ०९ वाजून ०९ मिनिटे
सोलापूर: रात्री ०८ वाजून ५६ मिनिटे
नागपूर: रात्री ०८ वाजून ३५ मिनिटे
अमरावती : रात्री ०८ वाजून ४१ मिनिटे
अकोला: रात्री ०८ वाजून ४४ मिनिटे
औरंगाबाद: रात्री ०८ वाजून ५३ मिनिटे
भुसावळ: रात्री ०८ वाजून ४९ मिनिटे
परभणी: रात्री ०८ वाजून ४९ मिनिटे
नांदेड: रात्री ०८ वाजून ४६ मिनिटे
उस्मानाबाद: रात्री ०८ वाजून ५४ मिनिटे
भंडारा: रात्री ०८ वाजून ३२ मिनिटे
चंद्रपूर: रात्री ०८ वाजून ३७ मिनिटे
बुलढाणा: रात्री ०८ वाजून ४८ मिनिटे
मालवण: रात्री ०९ वाजून १० मिनिटे
पणजी: रात्री ०९ वाजून १० मिनिटे
बेळगाव: रात्री ०९ वाजून ०६ मिनिटे
इंदौर: रात्री ०८ वाजून ४४ मिनिटे
ग्वाल्हेर: रात्री ०८ वाजून २६ मिनिटे