Ash gourd Juice: कोहळा ही एक अशी भाजी आहे; जी भारतात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. सॅलड्सपासून ते सांबार, मिठाईपर्यंत अनेक भारतीय पदार्थांमध्ये कोहळ्याचा वापर होतो. बऱ्याचदा ही भाजी बारीक करून कढीमध्ये वापरली जाते. कोहळा पदार्थाची चव वाढविण्यास मदत करतो. तथापि, केवळ चवीसाठीच नव्हे, तर आरोग्याच्या फायद्यासाठीही कोहळ्याची बऱ्याचदा निवड केली जाते .

एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीत, वेदिका प्रेमानी (क्लिनिकल डाएटिशियन, सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, मुंबई) यांनी दररोज कोहळ्याचा रस प्यायल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

हेही वाचा… पावसाळ्यात गरमागरम भजी, पकोडे खाण्याची खूप इच्छा होते? तज्ञांनी दिलेल्या ‘या’ टिप्स लक्षात ठेवा; कुरकुरीत भज्या खाण्याचा आनंद घ्या

हायड्रेशन

कोहळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे त्याचा रस हे एक उत्तम हायड्रेटिंग पेय आहे. हे पेय शरीराला टवटवीत ठेवते आणि आपल्याला दिवसभर हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत-पटवर्धन यांनी लोकसत्ताशी संवाद साधताना कोहळ्याचा रस कधी प्यावा याबद्दल मार्गदर्शन केले. कोहळ्याचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने अ‍ॅसिडिटी होण्याची शक्यता असते. परंतु, हायड्रेशनसाठी हा रस चांगला आहे म्हणून सकाळी नाश्त्याबरोबर किंवा नाश्त्यानंतर कोहळ्याचा ज्यूस प्यावा, असे आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत-पटवर्धन यांनी सांगितले.

वजनावर नियंत्रण

कोहळ्यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे शरीराचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

पचनास मदत

कोहळ्यात फायबर जास्त प्रमाणात असल्याने, ते बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करते आणि आतड्याची हालचाल नियंत्रित करते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासदेखील मदत करते.

कार्डिओ-संरक्षणात्मक फायदे

कोहळ्यात अ, ब, ब-१, ब-३ ही जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, लोह, पोटॅशियम यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचा समावेश आहे. हे पोषक घटक हृदयाचे आरोग्य सुधारण्यास हातभार लावतात आणि त्यातील फायबर सीरम कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासदेखील मदत करू शकते.

न्यूरोप्रोटेक्टिव्ह फायदे

मूड स्विंग्स होणाऱ्या आणि अल्झायमरग्रस्त लोकांसाठी अँटी-डिप्रेसंट (Antidepressant) म्हणून काम करण्यासाठी कोहळा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. कोहळा मूड सुधारण्यासही मदत करू शकतो.

रक्तशर्करेची पातळी नियंत्रित करणे

कोहळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) खूपच कमी असतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेची वाढ रोखण्यास मदत होते. टाईप-२ मधुमेह आणि इतर चयापचय विकारग्रस्तांसाठी हा एक फायदेशीर पेयाचा पर्याय आहे. कारण- त्यात फायबरचे प्रमाण जास्त आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… Jaggery Tea: फक्कड गुळाचा चहा करताना दूध नासतंय? मग घरच्या घरी करा ‘हा’ सोपा उपाय आणि वाचवा पैसे