scorecardresearch

केळी, बदाम की मनुका तुम्हाला रोज सकाळी रिकाम्या पोटी काय खाल्ले पाहिजे? डॉक्टरांकडून जाणून घ्या

soaked raisins: जर तुम्हाला दिवसभर उत्साही राहायचे असेल आणि तुमचे शरीर निरोगी ठेवायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खा.

केळी, बदाम की मनुका तुम्हाला रोज सकाळी रिकाम्या पोटी काय खाल्ले पाहिजे? डॉक्टरांकडून जाणून घ्या
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी काय खाल्ले पाहिजे, हा प्रश्न बहुतांश लोकांच्या मनात असतो. ही चिंता दूर करत, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरने सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम पोस्टवर दिवसाची सुरुवात कशी करावी हे सांगितले आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, जर बहुतेक लोकांनी दिवसाची सुरुवात केळी, भिजवलेले बदाम किंवा भिजवलेले काळे मनुके खाऊन केली, तर आरोग्याला फायदा होतो.

हे पदार्थ कोणी आणि किती प्रमाणात सेवन करावे

केळीचे सेवन कोणासाठी फायदेशीर आहे?

ज्यांना पचनाची समस्या आहे किंवा जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी केळी उपयुक्त आहे. अशा लोकांनी ताज्या केळ्यांचे सेवन करावे. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा केळी खरेदी करा. केळ्यांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवू नका. केळी संपूर्ण आठवडाभर वापरण्यासाठी कापडी पिशव्या वापरा.

६ ते ७ भिजवलेले मनुके खा

जर तुमची एनर्जी लेव्हल कमी असेल तर दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकता. महिलांनी मासिक पाळीपूर्वी १० दिवस आधी भिजवलेले मनुके सेवन करावे. याने बराच फायदा होईल.

( हे ही वाचा: भारतातील ३ शहरात राहतात सर्वाधिक कोट्याधीश; महाराष्ट्रातील ‘हे’ शहर आहे पहिल्या क्रमांकावर)

४ ते ५ भिजवलेले बदाम कोणासाठी फायदेशीर आहेत

जर तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स, मधुमेह, PCOD, कमी प्रजनन क्षमता आणि झोपेची समस्या असतील तर ४ ते ५ भिजवलेले बदाम घ्या. पोषक तत्वांनी युक्त बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. PCOD साठी, स्त्रियांनी मासिक पाळी येण्याच्या १० दिवस आधी ६ ते ७ मनुके आणि १ ते २ केशरचे सेवन करावे.

झोया सुर्वे, आहारतज्ञ, भाटिया हॉस्पिटल, मुंबई यांच्या मते, बदामासारख्या मेव्यामध्ये भरपूर फायबर आणि मॅग्नेशियम असतात. जे वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी आहेत. केळ्यासारख्या फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात जे हृदय आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

सकाळी रिकाम्या पोटी या गोष्टींचे सेवन करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

  • हे पदार्थ खाल्ल्यानंतर १० ते १५ मिनिटांनी चहा किंवा कॉफी घेण्यास हरकत नाही.
  • सकाळी उठून एक ग्लास साधे पाणी प्या आणि नंतर या गोष्टींचे सेवन करा.
  • झोपेतून उठल्यानंतर सर्वात आधी पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
  • तुम्ही उठल्यानंतर २० मिनिटांनी केळी, बदाम आणि मनुका खाऊ शकता. थायरॉईडचा आजार असल्यास गोळी घेतल्यानंतर खा.
  • हे पदार्थ खाल्ल्यानंतर १५-२० मिनिटांनी व्यायाम किंवा योगा करा.
  • तुम्ही ज्या पाण्यात मनुके भिजवले आहेत तेही तुम्ही पिऊ शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 20:55 IST

संबंधित बातम्या