पेरू एक आंबट-गोड फळ आहे. पेरू जितका आरोग्यदायी असतो तितकीच त्याची पाने देखील आरोग्यास लाभदायक असतात. आपल्याला त्वचेच्या समस्यावर देखील याचा खूप फायदा होतो. तारुण्य टिकवण्यासाठी पेरूचे अनेक फायदे आहेत. दातांचे आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी पेरू फायदेशीर ठरतो.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पेरूच्या फळाबरोबरच त्याच्या बिया, साल आणि पाने हे सर्व आरोग्य गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. पेरूच्या पानांचा अर्क हा जगातील विविध भागांमध्ये पारंपारिक औषधांचा एक भाग आहे. जपानमधील लोक औषधी गुणधर्म असलेल्या हर्बल टी बनवण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर करतात. याचे फायदे आपल्याला कसे होतात हे जाणून घेऊया.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

(हे ही वाचा : सफरचंद खाल्ल्याने शरीराला काय अपाय होऊ शकतो जाणून घ्या)

  • रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते
    पेरूच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. पेरूच्या पानांमध्ये असवलेले फिनोलिक कंपाऊंड शरीरात तयार होणारी अतिरिक्त साखर नियंत्रित करण्याचे काम करते.
  • वजन कमी करते
    पेरूच्या पानांमध्ये अनेक बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतात, जे तुमच्या शरीरात कार्बोहायड्रेट्स रोखून ठेवण्याचे काम करतात. तसेच, ते शरीरातील साखर आणि कॅलरीजचे प्रमाण कमी करतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
  • खराब कोलेस्ट्रॉल कमी करते
    पेरूची पाने हायपरग्लाइसेमिया कमी करण्यास देखील मदत करतात म्हणजेच साखरेचे प्रमाण जास्त आहे, जे कोलेस्ट्रॉल रोखण्यास मदत करते. याशिवाय, पेरूच्या पानांमध्ये हायपोलिपिडेमिक गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे शरीरातील लिपिड्स ही कमी होऊ शकते.

(हे ही वाचा : दात न घासल्यानेच नव्हे ‘या’ कारणांमुळे देखील येते तोंडातून दुर्गंधी )

  • अतिसारावर उपयोगी
    पेरूच्या पाने अतिसार कमी करणारे गुणधर्म असतात. पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटी-हेल्मिंथिक गुणधर्म पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर करतात. तसेच, हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात.
  • शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत
    पेरूच्या पानांच्या मदतीने शुक्राणूंची संख्या देखील सुधारली जाऊ शकते. यासोबतच पेरूची पानेही प्रजनन क्षमता वाढविण्यास सक्षम मानली गेली आहेत. पेरूच्या पानांच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांचा शुक्राणूंच्या विषारीपणावर फायदेशीर प्रभाव पडतो, ज्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)