Period Acne: मासिकपाळी हे मासिक चक्र आहे जे दर महिन्याला स्त्रियांमध्ये होते. याची लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी असू शकतात. या काळात महिलांना ओटीपोटात दुखणे, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि मूड बदलणे यांचा त्रास होतो. या दरम्यान महिलांना आणखी एक गोष्ट त्रासदायक ठरते ती म्हणजे चेहऱ्यावर येणारे मुरूम. हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार झाल्यामुळे या काळात मुरुमांची समस्या अधिक असते. पीरियड सायकल दरम्यान हार्मोन्सची पातळी बदलते, ज्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीरियड अ‍ॅक्ने ही समस्या पीरियडपासूनच सुरू होते. अर्काइव्हज ऑफ डर्मेटोलॉजीच्या संशोधनानुसार, ६३टक्के महिलांना मासिक पाळीच्या आधी मुरुमांचा त्रास होतो. हे मुरुम मासिक पाळी सुरू होण्याच्या सात ते दहा दिवस आधी दिसतात आणि रक्तस्त्राव सुरू होताच अदृश्य होतात. पीरियड्स दरम्यान, शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होते आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढू लागते, ज्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये सेबम तयार होण्यास सुरुवात होते आणि त्वचा तेलकट होते आणि चेहऱ्यावर मुरुमे दिसू लागतात. चला जाणून घेऊया पीरियड अ‍ॅक्नेपासून कशी सुटका करावी.

( हे ही वाचा: Piles Control: मांसाहारामुळे वाढू शकते मूळव्याधची समस्या; जाणून घ्या नियंत्रणासाठी कोणता आहार आहे आवश्यक)

आहाराची काळजी घ्या

पीरियड्स दरम्यान, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सची पातळी खराब होऊ लागते, ज्यामुळे त्वचेमध्ये कोरडेपणा, निर्जीव त्वचा आणि त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. या दरम्यान आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. आहारात अधिक फळे आणि भाज्यांचा समावेश करा. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फळांचे रस प्या. या काळात तेल आणि मसाले असलेल्या गोष्टी टाळा. तेलकट पदार्थांमुळे तुमचे मुरुम आणखी खराब होऊ शकतात.

हार्मोन्स तज्ञांना दाखवा

मासिक पाळीत नेहमी हार्मोनल असंतुलन असल्यास डॉक्टरांना भेटा. हार्मोन डिसऑर्डरमुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते, म्हणून त्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला हार्मोन्स दुरुस्त करायचे असतील तर जीवनशैलीत बदल करा. तणावापासून दूर राहा.

( हे ही वाचा: Heart Health: हृदयविकारांपासून दूर राहायचे असेल तर आहारात ‘हे’ ३ बदल करा; धोका वेळीच टळेल)

टी ट्री तेल वापरा

मासिक पाळीच्या काळात मुरुमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही टी ट्री तेल वापरू शकता. अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांनी समृद्ध हे तेल मुरुमांवर नियंत्रण ठेवेल. चेहऱ्याची सूज आणि लालसरपणा कमी होईल. मुरुमे दूर करण्यासाठी टी ट्री ऑइल पाण्यात मिसळून चेहऱ्याला लावा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best tips to get rid of period acne gps
First published on: 30-09-2022 at 13:29 IST