Sex Education Question And Answers: लैंगिक समस्या व संबंधित प्रश्नांच्या यादीत नेहमीच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे जर गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या तरीही कंडोम वापरायची गरज आहे का? मुळात गर्भनिरोधकाचे अनेक पर्याय व त्यांचे वापर याविषयी अनेकांना माहितीच नसते परिणामी अनपेक्षित गर्भधारणा, लैंगिक आजार यांची अनेक उदाहरणे दिसून येतात. अशातच या सगळ्या विषयांवर बोलायचं तरी आपल्याकडे दहा वेळा विचार करावा लागतो परिणामी आपलं प्रश्न सोडवून घेण्यालाही अनेकजण टाळाटाळ करतात. आपण आज तज्ज्ञांच्या माध्यमातून या कंडोम व इतर गर्भ निरोधकांच्या बाबतचे प्रश्न सोडवून घेणार आहोत.

सेक्स लाईफ संदर्भातील प्रश्नांविषयी बंगळुरूच्या मदरहूड हॉस्पिटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नागवेणी आर, यांच्याशी इंडियन एक्सप्रेसने संवाद साधला, यावेळेस डॉ. नागवेणी यांनी सांगितले की गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम व गर्भनिरोधक गोळी हे प्रसिद्ध उपाय आहेत. मात्र त्यांचे उद्दिष्ट केवळ गर्भधारणा थांबवणे नसून त्याच्या वापरामागे वेगवेगळे हेतू आहेत.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
drinking warm water
तुम्ही दररोज आठ ग्लास गरम पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

गर्भनिरोधक गोळ्या प्रेग्नन्सी थांबवतात का?

डॉ नागवेणी यांनी सांगितल्याप्रमाणे, गर्भनिरोधक गोळ्या गर्भधारणेविरूद्ध ९९. टक्के प्रभावी असतात मात्र त्या लैंगिक संबंधांनी संक्रमित होणारे रोग (STD) किंवा इतर कोणत्याही संसर्गापासून संरक्षण देत नाहीत. गर्भाशयातील पेशींच्या मध्ये गर्भधारणेच्या गोळ्या एक पडदा तयार करतात ज्यामुळे अनपेक्षित गर्भधारणा थांबवता येते. मात्र एकदा तुम्ही गोळी खाण्यास सुरुवात केल्यावर तुमच्या शरीराला गोळीशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागेल आणि परिणाम दिसायला वेळ लागेल.

कंडोममुळे प्रेग्नन्सी टाळता येते का?

डॉ नागवेणी यांच्या माहितीनुसार, कंडोम हा संभोगाच्या दरम्यान प्रत्यक्ष पडद्यासारखे काम करतो. यामुळे वीर्य थेट योनी मार्गे गर्भाशयात पोहचण्यास अडथळा येतो परिणामी गर्भधारणेचा धोका टळतो. कंडोम वापरल्याने १००% परिणाम होत असल्याचेही दावे केले जात नाहीत मात्र गर्भनिरोधक गोळ्यांच्या तुलनेत हा स्वस्त व प्रभावी पर्याय म्हणून पहिला जातो. गोळ्यांच्या बाबत एक समस्या म्हणजे या गोळ्यांचा परिणाम दिसण्यासाठी काही काळ लागू शकतो त्यामुळे तोपर्यंत कंडोमचा वापर करणे फायद्याचे ठरते.

डॉ नागवेणी सांगतात की, गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये “थोड्या प्रमाणात हार्मोन्स असतात, जसे की इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन जे ओव्हुलेशन थांबवून शरीरात गर्भधारणा रोखतात”. जर ओव्ह्युलेशन होत नसेल तर गर्भधारणेची शक्यता नगण्य असते. हे हार्मोनल गर्भनिरोधक गर्भाशयात चिकट द्रव पदार्थ तयार करतात ज्यामुळे स्पर्म म्हणजेच वीर्य थेट काम करू शकत नाहीत.

दरम्यान, अनपेक्षित गर्भधारणेपासून संरक्षण करण्यासाठी कंडोम व गर्भनिरोधक गोळ्या दोन्ही प्रभावी पर्याय आहेत. मात्र एसटीडी किंवा एसटीआयपासून म्हणजेच लैंगिक रोगांपासून संरक्षण हवे असल्यास कंडोम वापरण्याचा सल्ला दिला जातो.