Can vitamin D help prevent colorectal cancer?: कोलोरेक्टल कर्करोग (CRC) रोखण्यात आणि त्यावर उपचार करण्यात व्हिटॅमिन डीच्या संभाव्य भूमिकेच्या दृष्टीने संशोधनात वाढ होत आहे. विशेषतः तरुणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. व्हिटॅमिन डीच्या कमी पातळी असल्यामुळे कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका जास्त असल्याचे बऱ्याच काळापासून सांगितले जात आहे.

१२,००० हून अधिक सहभागींचा समावेश असलेल्या एका मोठ्या अभ्यासात असे आढळून आले की, ज्यांच्या रक्तात व्हिटॅमिन डीची पातळी कमी आहे, त्यांना जास्त पातळी असलेल्यांच्या तुलनेत कर्करोग होण्याचा धोका ३१% जास्त आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, ज्यांच्या आहारात व्हिटॅमिन डीचे जास्त सेवन आहे अशा व्यक्तींमध्ये कर्करोगचा धोका २५% कमी आहे.

अमेरिकन नर्सेस हेल्थ स्टडीमधील डेटावरून असे दिसून आले आहे की, ज्या महिलांनी व्हिटॅमिन डीचे सेवन जास्त केले, त्यांना कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका कमीत कमी घेतलेल्या महिलांच्या तुलनेत ५८% कमी होता. मोठ्या लोकसंख्येतील आरोग्य परिणामांचा मागोवा घेणाऱ्या महामारीवरील शास्त्रीय अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ज्या लोकांच्या रक्तात व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असते, त्यांना कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका कमी असतो. सूर्यप्रकाश किंवा पूरक आहाराद्वारे अधिक व्हिटॅमिन डी मिळण्यासारखे सोपे उपाय कर्करोगाचा धोका कमी करू शकतात.

व्हिटॅमिन डी हा चमत्कारिक उपचार नाही; मात्र त्याची भूमिका आशादायक आहे. केवळ पूरक आहारांवर अवलंबून राहण्याची वेळ आली नसली तरी सूर्यप्रकाश किंवा पूरक आहारांद्वारे व्हिटॅमिन डीची पुरेशी पातळी सुनिश्चित करणे तुमच्या आरोग्यासाठी एक स्मार्ट पर्याय आहे. कोलोरेक्टल कर्करोग हा एक गुंतागुंतीचा आजार आहे आणि त्याच्याशी लढण्यासाठी तितक्याच सूक्ष्म दृष्टिकोनाची आवश्यकता आहे.

व्हिटॅमिन डीची पातळी कशी वाढवायची?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उन्हामध्ये जास्त काळ घालवून तुम्ही मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी घेऊ शकता. काही खास अन्न आणि मशरूम खाल्ल्यानेदेखील फायदा होतो. सीफूड आणि मासे हे व्हिटॅमिन डीचे प्रमुख स्रोत आहेत. सीफूडमध्ये टूना, मॅकरेल, ऑयस्टर, स्रिम्प यांच्या सेवनामुळे व्हिटॅमिन डी मिळेल. अंड्याचा बलकदेखील व्हिटॅमिन डीने भरपूर असतो. त्याशिवाय गाईचे दूध, संत्र्याचा रस, दही यांतून व्हिटॅमिन डी मिळते. यू.एस. नॅशनल अकॅडमी मेडिसिननुसार, ६००-७०० IU दररोज घेतलेले व्हिटॅमिन डी शरीरारासाठी पुरेसे असते.