scorecardresearch

क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंटमधून करा हजारोंची बचत; शॉपिंग, ट्रॅव्हलसह ‘या’ गोष्टींवर मिळवा भरघोस सूट

क्रेडिट कार्डवरून तुम्ही शॉपिंगचा विचार करत असाल तर तुमचे हजारो रुपये वाचले म्हणून समजा.

credit card discount
क्रेडिट कार्ड ऑफर ( photo credit – Freepik)

Credit Card : गेल्याकाही वर्षांपासून क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढतोय. क्रेडिट कार्ड फायद्याचे की नाही याबाबत भिन्न मतं असू शकतात. पण एका क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला अनेक गोष्टी खरेदी करता येतात. सध्या अनेक बँकांकडून स्वत:हून क्रेडिट कार्ड ऑफर केलं जातं, अशावेळी कोणतं क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं ते तुम्ही ठरवा. एका कार्डवर तुम्हाला शॉपिंग, रेस्टॉरंट, फूड, एंटरटेनमेंट, मूव्ही यांसारख्या अनेक गोष्टींवर फायदे वसूल करता येतात. यात तुम्हाला शॉपिंगवर भरघोस सूट मिळवता येते. विशेषत: सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यावेळी अनेक बँका खरेदीसाठी क्रेडिट कार्डवर वेगवेगळ्या ऑफर देतात. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही एकाचवेळी हजारो रुपयांची बचत करु शकता.

क्रेडिट कार्डवर मिळवा ‘हे’ अनेक फायदे

गिफ्ट बेनिफिट्स, डिस्काउंट व्यतिरिक्त क्रेडिट कार्डअंतर्गत अनेक फायदे दिले जातात. यामुळे बहुतेक लोक क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट्सच्या माध्यमातून आणखी एक फायदा मिळतो. हे रिवॉर्ड पॉइंट्स क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग, फूड, बिल पेमेंट, ट्रॅव्हलिंग, रिचार्ज, एंटरटेनमेंट यावर खर्च करुन मिळवता येतात. यानंतर हेच रिवॉर्ड पॉइंट्स पुन्हा इतर कोणत्याही शॉपिंग किंवा फूड पेमेंटसाठी वापरले जाऊ शकतात.

क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्स वाढण्याच्या सोप्या टिप्स

१) क्रेडिट कार्ड जारी केल्याच्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत तुम्ही पैसे खर्च केल्यास काही बँकांकडून वेलकम पॉइंट्स मिळतात. यात फूड, इंटरटेनमेंट आणि शॉपिंगवरील खर्चावरही पुन्हा रिवॉर्ड मिळतो.

२) जत तुम्ही क्रेडिट कार्ड पोर्टलवरून विमान तिकीट, रेल्वे तिकीट आणि हॉटेल बुकिंग करता तेव्हा या ट्रॅव्हलिंग पेमेंटवरही तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात जे तुम्ही रिडीम करु शकता.

३) तुम्हाला मिळालेले रिवॉर्ड पॉइंट्स तुम्ही अंतिम मुदतीपूर्वी रिडीम करणं गरजेचं आहे, अन्यथा ते वापरा येत नाहीत.

४) काही बँकांकडून वार्षिक खर्चावर रिवॉर्ड मिळतात. अशावेळी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून जास्तीत जास्त रिवॉर्ड पॉइंट्स जमा करू शकता.

एका अहवालानुसार, भारतात जानेवारी महिन्यात क्रेडिट कार्डचा खर्च सलग ११ महिन्यात १ लाख कोटींच्या पुढे गेला आहे. तर गेल्या वर्षी सणासुदीच्या काळात हा खर्च १.२२ लाख कोटींच्या पार गेला आहे. पण क्रेडिट कार्डच्या वापरलेल्या पैशांची तुम्ही वेळेत परतफेड केली नाही तर तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. पण क्रेडिट कार्डचा अगदी स्मार्ट पद्धतीने वापर केल्यास तुम्हाला शॉपिंगवर भरघोस सूट मिळवता येते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 19:36 IST