डॉ. अमोल देशमुख

निर्णय घेणे हे एक कौशल्य आहे. यशस्वी लोकांचा विचार करताना, त्यांच्या यशाचे श्रेय बहुतेकदा त्यांच्या निर्णय घेण्याच्या कौशल्यांना असते. चांगल्या निवडी करणे ही एक प्रतिभा आहे. निर्णय घेण्याचे कौशल्य शिकले आणि सुधारले जाऊ  शकते. उत्तम निर्णय कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे आणि ही कौशल्ये निर्णयाचा सकारात्मक परिणाम घडून येण्याची वारंवारता वाढवतात किंवा नकारात्मक परिणाम कमी करतात. एखाद्या गोष्टीबाबत निर्णय न घेणे किंवा निर्णय घ्यायला उशीर करणे नुकसानकारक आहे.

निर्णय घेण्याची प्रक्रिया तणावपूर्ण असू शकते. वैचारिक आणि भावनिक घटक, निर्णय घेण्याच्या मूलभूत प्रक्रियेत केंद्रस्थानी असतात. निर्णय घेते वेळी निर्माण होणारी भावनिक अस्थिरता (उदा. भीती, अस्वस्थता) तर्कहीन विचारसरणीतून उत्पन्न होते, जी निर्णय घेताना त्रासदायक ठरते. तर्कहीन विचारसरणीला, भावनिक अस्थिरतेला, निर्णयाच्या प्रक्रियेबाबतचा अविवेकी दृष्टिकोन जर योग्य नियोजित करू शकलो तर निर्णय घेताना मदत होईल. निर्णय घेणे ही मानसिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये अनेक पर्यायी कृतींचा निर्देशक मार्ग निवडला जातो. वैयक्तिक गरजा, प्राधान्ये आणि मूल्यांच्या संदर्भात निर्णयांचे परीक्षण करणे आवश्यक आहे  तथापि, आपण नियमित घेतलेलेाहुतेक निर्णय नकळतपणे होतात. निर्णय घेण्याची कौशल्ये दोन किंवा अधिक पर्यायांपैकी एक निवडण्यात आपली प्रवीणता दर्शवतात.

निर्णय घेण्याच्या टप्प्यांचा योग्य आणि शिस्तीने वापर केल्याने आपण निर्णय घेण्यातील चुका कमी करू शकतो. प्रत्येकाने निर्णय घेण्याची तयारी करण्यापूर्वी विषय समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

चांगल्या निर्णय प्रक्रियेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे विचार करून शक्य तितके चांगले पर्याय निर्माण करणे आहे, सर्जनशील कौशल्ये निर्णय पर्याय ओळखण्यात मदत करू शकतात. पर्याय शोधण्याचा टप्पा हा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा सर्वात जास्त वेळ घेणारा भाग असतो. ही पायरी कार्यक्षम करण्यासाठी, तुम्ही तुमच्या विश्लेषणामध्ये समाविष्ट करणाऱ्या विषयानिगडित असलेल्या घटकांबद्दल स्पष्ट राहणे आवश्यक आहे. बहुतेक निर्णयांमध्ये काहीतरी जोखीम असते. तथापि, सर्वोत्तम निवड शक्य करण्यासाठी तुम्हाला ती जोखीम समजून घेणे आवश्यक आहे.

तुम्ही १०० टक्के अचूकतेसह निर्णयाचे परिणाम सांगू शकत नाही. परंतु निर्णयाचे संभाव्य परिणाम ओळखण्यासाठी आणि त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी तुम्ही प्रभावी पूर्वतयारी केल्यास नक्कीच तुमची अचूकता वाढते. निवड वास्तववादी आणि अंमलबजावणी करण्यायोग्य आहे का? या घटकाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. निर्णय घेताना तुम्हाला सहसा काही मर्यादांचा विचार करावा लागतो. या मूल्यमापन टप्प्याचा एक भाग म्हणून तुम्ही निवडलेले पर्याय लक्षणीयरीत्या चांगले आणि सूचक असल्याची खात्री करा.

आत्मविश्वास वाढेल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर निर्णय महत्त्वपूर्ण असेल, तर तुमचे गृहीतक बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी त्याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील शेवटच्या टप्प्यात निर्णयाबाबत संवाद साधणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी करणे समाविष्ट आहे. तुम्ही तुमचा निर्णय इतरांच्या मान्यतेची मागणी करून त्यांच्यावर जबरदस्ती लादू शकतात किंवा तुम्ही तुमचा निर्णय का घेतला आणि निर्णयापर्यंत कसा पोहोचला हे सांगून तुम्ही त्यांची स्वीकृती मिळवू शकता, जे की जास्त योग्य आहे. जसे जसे तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिक अनुभव मिळेल आणि परिणामकारक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या साधने आणि संरचनांशी तुम्ही अधिक परिचित व्हाल, तुमचा आत्मविश्वास वाढेल.