World Water Day 2022 : आज २२ मार्च म्हणजेच ‘जागतिक जल दिन’ आहे. मानवी शरीराचा सुमारे ६० टक्के भाग पाण्याने बनलेला असला, तरी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासोबतच, पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. प्रचंड गरमीमुळे खूप घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. अशात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. दररोज कमीतकमी २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक असते. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासोबतच पाणी पिण्याचे शरीराला आणखी काय काय फायदे आहेत हे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाणी पिण्याचे फायदे

सांधे निरोगी राहतात:

एका वृत्तपत्रात छापून आलेल्या रिपोर्टनुसार, सांधे आणि पाठीचा कण्यामध्ये आढळणारे कार्टिलेजमध्ये सुमारे ८० टक्के पाणी असते. दीर्घकालीन डिहायड्रेशनमुळे सांध्यांची वेदना शोषून घेण्याची क्षमता कमी होऊ शकते, ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. म्हणूनच दररोज पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे.

World Water Day 2022 : ‘हे’ आहेत पाण्याचे प्रकार; यातील तुम्ही कोणतं पाणी पित आहात?

पाणी प्यायल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारते:

रक्तामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते आणि शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये ऑक्सिजन पोहचवण्याचे काम रक्त करते. अशात शरीरातील पाण्याची पातळी खालावल्यास ऑक्सिजनचा पुरवठा बाधित होतो.

त्वचेतील तारुण्य राखून ठेवते:

जेव्हा तुम्ही दररोज २ ते ३ लिटर पाणी पिता तेव्हा याचा फायदा आपल्या त्वचेला आणि केसांना होतो. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा तेजस्वी होते. जर शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तर अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्या जाणवू लागतात. यामध्ये त्वचेचे विकार, कमी वयात सुरकुत्या पडणे, म्हातारपणाची लक्षणे दिसू लागतात.

Heat Wave चा सामना करण्यासाठी उन्हाळ्यात दररोज प्या नारळपाणी; शरीराला होतील ‘हे’ फायदे

पाणी प्यायल्याने वजन होते कमी:

नियमित पाणी प्यायल्याने आपले वजन कमी होण्यासही मदत होते. जर तुम्ही प्रतिदिन ८ ते १० ग्लास पाणी पित असाल तर तुम्हाला आपले पोट भरलेले वाटेल. त्यामुळे तुम्ही जास्त खात नाही. तुम्हालाही वजन कमी करायचे असल्यास जेवणाच्या आधी पाणी पिणे तुमच्यासाठी योग्य ठरेल.

शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकते:

शरीरामध्ये असे अनेक प्रकारचे विषारी पदार्थ जमा होत असतात, ज्यांना वेळच्यावेळी शरीरातून बाहेर काढणे गरजेचे असते. शरीरातून मल आणि मूत्र बाहेर काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. घाम येण्याच्या प्रक्रियेतही पाण्याची गरज असते.

पाणी न प्यायल्याने रक्त होते घट्ट:

पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट होऊ शकते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.

किडनी निरोगी राहते:

किडनी म्हणजेच मूत्रपिंड हा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मूत्रपिंड शरीरातील द्रव नियंत्रित करते. अपुरे पाणी पिल्याने किडनी स्टोन आणि इतर समस्या उद्भवू शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know the benefits of drinking water can prevent many serious illnesses pvp
First published on: 22-03-2022 at 10:16 IST