सायकल चालवणे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते. मात्र, एका सर्वेक्षणानुसार पुरुषांनी सायकल चालवणं त्यांच्यासाठी धोकादायक ठरु शकतो. सायकल चालवण्याने पुरुषांना नपुंसकतेच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. लहान मुलं, वृद्ध माणसं किंवा तरुण पिढीला सायकल चालवणं आवडतं. कारण सायकल चालवण्याने आरोग्यास अनेक फायदेही होतात. शरीरातील स्नायूंच्या तसेच हाडांच्या मजबतूसाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी सायकल चालवणे फायदेशीर ठरते. पण एकाच जागेवर सतत बसल्याने नपुंसकतेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे सायकल चालवण्यामुळंही पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

इरेक्टाइल डिसफंक्शन नपुंसकतेचं उदाहरण आहे. अशा परिस्थितीत एखाद्या पुरुषाला शारीरीक संबंध करण्यासाठी शारीरीक समस्या जाणवू शकते. प्रायव्हेट पार्ट्सला सतत ताठरपणाची समस्या येत असल्यास पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य वाढतं आणि आत्मविश्वासही कमी होतो. तसंच शारीरीक संबंधांवरही याचा विपरीत परिणाम होतो, असं एका सर्वेक्षणात सिद्ध झालं आहे.

नक्की वाचा – भरधाव वेगानं जाणाऱ्या एक्स्प्रेससमोर आला हत्तींचा कळप, रात्रीच्या वेळी लोको पायलटने कमालच केली, पाहा Viral Video

इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या उद्धवते, कारण…

जेव्हा तुम्ही सायकल चालवण्यासाठी सीटवर बसता त्यावेळी तुमच्या प्रायव्हेट पार्टला इजा होते. याचाच अर्थ असा की, तुमच्या शरीरातील नसांवर खूप मोठ्या प्रमाणावर प्रेशर पडतो. याच कारणामुळं इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येला सामोरं जावं लागतं. सायकलिंग करत असताना सीटमुळं तुमच्या प्रायव्हेट पार्टवर आणि अॅनलच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेशर पडतो. त्यामुळे नसा कमकुवत होण्याचा धोका संभवतो. तसंच काही वेळासाठी रक्तपुरवठ्याची गती कमी होते.

नक्की वाचा – बापरे! तुमचा बॅंक बॅलेंस लोकांना कळणार? हे ATM दाखवतं तुम्ही रोडपती की करोडपती? Viral Video पाहून चक्रावाल

सर्वेक्षणात काय म्हटलंय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलंड मध्ये व्रोकला वैद्यकीय विद्यापीठाच्या एका सर्वेक्षणात सांगितलं आहे की, पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समेस्येवर मात करायची असल्यास, सायकल चालवताना काही वेळ उभं राहणं गरजेचं असतं. प्रत्येक दहा मिनिटांनी सायकल चालवताना पॅंडलवर उभं राहीलं पाहिजे, असं सर्वेक्षणात म्हटलं आहे. सायकलच्या सीटवरच बसल्याने तुमच्या लैंगिक क्षमतेवर परिणाम होत नाही, तर खराब सीट आणि सायकल चुकीच्या पद्धतीत चालवणं या समस्येला कारणीभूत ठरू शकतं. हार्वर्डच्या विशेष आरोग्य अहवालानुसार, सायकल चालवण्यामुळं नसा कमकुवत होतात आणि त्याचा थेट परिणाम प्रायव्हेट पार्टच्या आर्टरीजवर होतो. ज्यामुळे नपुंसकेची समस्या निर्माण होते. जे पुरुष आठवड्यातून तीन तासांहून अधिक काळ सायकल चालवतात, त्यांना या समस्येला सामोरं जावं लागतं, असं या अध्ययनात म्हटलं आहे.