scorecardresearch

Omicron, Delta,….सगळ्या विषाणूंना दूर पळवा केवळ २० मिनिटांत; घरच्या घरी करा ‘हे’ विशेष व्यायाम

करोना प्रादुर्भावामुळे लागलेल्या निर्बंधांमुळे व्यायामशाळा, जीम, योगा क्लास यांच्यावर निर्बंध आहेत. अशावेळी घरच्या घरी व्यायाम करणं हाच सर्वात चांगला मार्ग आहे

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनाच आपली रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य आणि चौकस आहारासोबत व्यायामाचीही गरज आहे. मात्र करोना प्रादुर्भावामुळे लागलेल्या निर्बंधांमुळे व्यायामशाळा, जीम, योगा क्लास यांच्यावर निर्बंध आहेत. अशावेळी घरच्या घरी व्यायाम करणं हाच सर्वात चांगला मार्ग आहे. त्यामुळे जाणून घ्या कोणते व्यायाम प्रकार तुम्ही घरच्या घरी करू शकता.

व्यायाम करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

हे व्यायाम सकाळी किंवा संध्याकाळी केले जाऊ शकतात. खाली नमूद केलेले व्यायाम सुरुवातीला २ मिनिटे करा, त्यानंतर हळूहळू वेळ वाढवा, अन्यथा जास्त थकवा येऊ शकतो. आरोग्याची कोणतीही समस्या असल्यास, शरीराच्या कोणत्याही भागाला दुखापत झाल्यास किंवा तुम्ही पहिल्यांदाच व्यायाम करत असाल, तर आधी तज्ञाचा सल्ला घ्या आणि नंतर व्यायाम करा.

१. दोरी उड्या मारणे

दोरी-उड्या मारणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे, जो घराच्या टेरेसवर किंवा रिकाम्या हॉलमध्ये सहज करता येतो. असे केल्याने भरपूर कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. विविध डेटानुसार, १५-२० मिनिटे दोरीवर उडी मारल्याने २५०-३०० कॅलरीज बर्न होऊ शकतात. हा व्यायाम करताना लक्षात ठेवा की तोंडाने श्वास घेऊ नका आणि शरीर सरळ ठेवा. त्याच वेळी काही लोक उडी मारताना गुडघे वाकतात, तसे करणे टाळायला हवं.

२. पुश-अप्स

हा एक अतिशय मूलभूत व्यायाम आहे, जो स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात. या व्यायामाने छाती, खांदे, हात, पोट इत्यादींवर ताण येतो. हा व्यायाम केल्याने शरीराची ताकद वाढते, छातीचे स्नायू वाढतात, छातीला आकार येतो आणि कॅलरीज बर्न होतात.

३. बर्पी (Burpee)

१ बर्पी केल्याने २ कॅलरीज बर्न होतात. या व्यायामामुळे ताकद आणि तग धरण्याची क्षमता वाढते.

४. पुल-अप

इतर व्यायामांच्या तुलनेत हा अनेकांना थोडा कठीण वाटू शकतो. कारण त्यात आपल्या शरीराचे वजन आपल्या हातांनी खेचावे लागते. घरामध्ये, खोलीत, हॉलची उंच रेलिंग किंवा गेटचा पसरलेला भाग छतावर बार हातात धरून हा व्यायाम करता येतो. हा प्रकार करत असताना, सुरुवातीला लक्षात ठेवा की जर तुम्हाला संपूर्ण वर जाता येत नसेल तर आधी अर्ध्यावर जा आणि नंतर हळूहळू शरीर वर नेण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम करताना पोट घट्ट असावे आणि हात खांद्याच्या बाहेर असावेत.

५. जिना चढणे

पायऱ्या चढणे हा देखील एक चांगला घरगुती व्यायाम आहे. या व्यायामामुळे केवळ कॅलरीज बर्न होत नाहीत तर पायांचे स्नायू देखील मजबूत होतात. यासाठी आपण घराच्या, सोसायटीच्या पायऱ्या वापरू शकतो. घट्ट शूज घालून पायऱ्या पटकन चढण्याचा आणि उतरण्याचा व्यायाम करा. वेगात प्रक्रिया झाल्याने हृदयाची गती वाढेल आणि अधिक कॅलरी बर्न होतील. पण जर जास्त थकवा येत असेल तर हा व्यायाम हळूहळू करा.

(ही सर्व माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Exercise at home to increase immunity in few minutes vsk

ताज्या बातम्या