तुमच्या कुटुंबात असलेले आजार आणि तुमचे आरोग्य याचा खूप जवळचा संबंध आहे. यात अनेक कुटुंबांमध्ये कर्करोग हा एक महत्वपूर्ण आजार दिसून येतो. अनेक अनुवांशिक सिंड्रोम किंवा अनुवांशिक कौटुंबिक सिंड्रोम आहेत, जे त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रभावित करतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास नसलेल्या सरासरी व्यक्तीपेक्षा कर्करोगाचा धोका जास्त असतो, असे गुरुग्राममधील सीके बिर्ला हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजी आणि वैद्यकीय सल्लागार डॉ. पूजा बब्बर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
डॉ.बब्बर यांच्या मते, जर तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती कर्करोगाने ग्रस्त असेल, तर इतर सदस्यांना कर्करोग होण्याचा धोका कमीतकमी ५ ते १० पट जास्त असतो. शरीरात प्रत्येक जनुकाच्या दोन प्रती असतात. पेशींमध्ये बिघाड होण्यासाठी दोन्ही प्रती सदोष असणे गरजेचे असते. याला Knudson two hit hypotbesis म्हणतात. जेव्हा व्यक्तीमध्ये आई-वडिलांकडून जनुकाची एक प्रत सदोष येते, तेव्हा दुसऱ्या प्रतीत बिघाड झाला रे झाला की त्या पेशीचे कार्य कोलमडते, असे गुरुग्राममधील मॅक्स हॉस्पिटलचे मेडिकल ऑन्कोलॉजी आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. भुवन चुघ म्हणाले.
पहिल्या नात्याला असतो जास्त धोका
फरीदाबादमधील मारेंगो एशिया हॉस्पिटल्सच्या ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सनी जैन यांच्या मते, जर तुमच्या कुटुंबात कोणाला कर्करोग झाला असेल, तर संबंधित पहिला नात्याने म्हणजे आईची मुलगी, आईची आई किंवा मुलगा किंवा भाऊ. ही पहिली नाती आहेत आणि स्पष्टपणे एकमेकांचे जवळचे नातेवाईक किंवा भावंड असतात. त्यांनी अधिक सतर्क असले पाहिजे. अशावेळी या व्यक्तींनीही अनुवांशिक समुपदेशकाला भेटले पाहिजे. जे प्रत्यक्षात केमो टायपिंग आणि जनुकांचे विश्लेषण करतील. यामुळे आईकडून किंवा वडिलांकडून तुम्हाला कर्करोगाचा धोका आहे का याची माहिती मिळेल.
‘या’ तीन गोष्टी विचारात घ्याव्या
डॉ. बब्बर यांच्या मते, जर कुटुंबात कर्करोग झाला असेल, तर आपल्याला तीन गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. ज्यात कर्करोग झालेल्या व्यक्तीचे वय, कर्करोग झालेल्या कुटुंबातील किती लोकांना कर्करोग झाला आणि कर्करोगाचा प्रकार.
अनुवांशिक चाचणी
कर्करोगासाठी अनुवांशिक चाचणी करणे महत्वाचे आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीमध्ये सर्वोत्तम अनुवांशिक चाचणी केली पाहिजे, कारण त्या विशिष्ट व्यक्तीमध्ये जनुक उत्परिवर्तन होण्याची शक्यता सर्वाधिक असते. उदाहरणार्थ, कुटुंबात चार सदस्य आहेत आणि त्यातील एका महिलेला स्तनाचा कर्करोग झाला आहे; तर अशा वेळी अनुवांशिक सिंड्रोमसाठी त्या महिलेची प्रथम चाचणी केली पाहिजे. जर ती पॉझिटिव्ह आली तर आपल्याला त्याच जनुकासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची चाचणी करावी लागेल आणि नंतर त्यांच्यातीलही कोणाची चाचणी पॉझिटिव्ह आली तर पुढे काय केले पाहिजे, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल.