सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये डासांचा प्रकोप शिखर गाठते. साचलेल्या पाण्यांमध्ये डासांची वाढ होत. त्यांच्यामुळे हिवताप, डेंग्यू सारखे घातक रोग होतात. काहींना डास चावलेल्या ठिकाणी सूजही येते. रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यास असे होत असल्याचे मानले जाते. पण, डास हे गर्दीतही तुम्हालाच लक्ष करत आहेत, असे तुम्हाला वाटते का? तर रंग आणि शरीराच्या गंधामुळे असे होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण एका नवीन आभ्यासात आपला आहार देखील डासांना आकर्षित करते असे सांगण्यात आले आहे.

डास आकर्षित होण्याचे हे आहे कारण

आपण जे खातो, पितो ते आपल्या श्वासोच्छवासावर आणि स्किन मायक्रोबायोम परिणाम करू शकते. अशा स्थितीत अन्नामुळे डास तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात असे अभ्यासातून समोर आले आहे. मानव शरीरात संयुगे तयार होतात ज्यांना विओसीएसच्या रुपाने ओळखले जाते. शरीरातील लॅक्टिक अॅसिड, कार्बन डाइऑक्साइड आणि अमोनिया सारखी संयुगे डासांना आकर्षित करू शकतात. या पार्श्वभूमीवर कोणते पदार्थ डासांना आकर्षित करू शकतात, याबाबत जाणून घेऊया.

(Diabetes : आता स्वस्तात मिळणार मधुमेहावरील ‘ही’ औषध, किंमत केवळ ६० रुपये, कुठे मिळणार जाणून घ्या..)

१) मद्य

जे लोक मद्याचे अधिक सेवन करतात त्यांना मच्छर अधिक चावतात, असे संशोधनातून समोर आले आहे. मद्याच्या सेवनाने शरीराचे तापमान वाढते आणि या स्थितीत वीओसी बदलतात. त्यामुळे मच्छर चावू नये यासाठी मद्य टाळले पाहिजे.

२) कॅफीन

संशोधनानुसार, जे लोक कॉफी किंवा चहा घेतात त्यांना देखील मच्छर अधिक चावतात. कॅफीनमुळे चयापचय वाढत आणि अशा परिस्थितीत शरीराचे तामान वाढू लागते. उबदार त्वचेकडे डास सहजपणे आकर्षित होतात असे मानले जाते. त्यामुळे कॅफीनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा.

(पपईप्रमाणे तिच्या बियांचेही आश्चर्यकारक फायदे, ‘या’ समस्या कमी करण्यात मदत करू शकतात)

३) लो कार्ब डाइट

अहवालानुसार, जे लोक कमी कार्बयुक्त आहार घेतात, त्यांना देखील मच्छर अधिक चावतात. त्याचबरोबर त्वचा स्वच्छता केली पाहिजे. मच्छर अस्वच्छ वस्तूंवर बसतात, त्यामुळे त्वचा स्वच्छ ठेवावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)