Holi 2025 Wishes In Marathi : ‘होळी रे होळी पुरणाची पोळी…’ वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये होळी पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन मासातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. भारतात विविध प्रकारचे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात त्यातलाच एक सण म्हणजे होळी. आज १३ मार्च रोजी होळी तर उद्या १४ मार्चला रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

तर एखादा सण आला की, मित्र-मैत्रिणींपासून ते अगदी नातेवाईकांपर्यंत तुम्हाला व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर शुभेच्छांचे मेसेज येण्यास सुरुवात होते. एखाद्या व्यक्तीने आपल्याला अगदी आठवणीने केलेला मेसेज चेहऱ्यावर नकळत आनंद देऊन जातो नाही का? तर आज होळीनिमित्त तुम्हीही इतरांना शुभेच्छा द्या आणि त्यांचा आनंद द्विगुणित करा.

होळीच्या मराठी शुभेच्छा (Holi 2025 Wishes)

होळीच्या आगीत जळून खाक होणार राग, निराशा, दुःख-दारिद्र
सगळ्यांच्या आयुष्यात येणार सुख, शांती, ऐश्वर्य आणि आरोग्य.

होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
नवे रंग तुमच्या जीवनात भरू दे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या माणसांची साथ
पंगतीला पुरणपोळीचा थाट
होळीच्या अग्नित नकारात्मकतेचा होणार नाश
पुन्हा नव्याने होऊदेत तुमच्या आयुष्याची सुरुवात
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

होळी संगे केरकचरा जाळू
झाडे वाचवू पर्यावरण सुरक्षित करू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवून देऊ आणि होळी आनंदाने साजरी करू

होळी पेटू दे
द्वेष, चिंता मिटू दे
आगामी वसंत ऋतूत
तुमच्या आयुष्यात
सुख-समृद्धीने ओंजळ भरू देत

उद्या आहे धूलिवंदन
आज करूया होळीला वंदन
नैवद्य दाखवू पुरणपोळीचा
आनंद लुटू या रंगीबेरंगी सणाचा

वाईटाचा होवो नाश, आयुष्यात येवो सुखाची लाट
तुम्हा-आम्हा सगळ्यांना होळीच्या भरपूर शुभेच्छा

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा ठेवू लक्षात
आनंद लुटू होळी सणाचा, यशस्वी होवो तुमचा पुढचा प्रवास…
तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

होळीच्या शुभमुहुर्तावर होईल स्वप्नपूर्ती,
धन,आनंदाने भरेल तुमची झोळी
मनात पेटवा आशेची आग
पूर्ण होऊदेत तुमच्या सर्व अपेक्षा

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा होळी सुखाची, आनंदाची जावो, स्वतः सुरक्षित राहा व इतरांची सुद्धा काळजी घ्या आणि हो वरील शुभेच्छा शेअर करायला विसरू नका.