Happy Propose Day: आजपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. व्हॅलेंटाईन डे दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. त्याआधी आज ७ फेब्रुवारी म्हणजेच रोज डे साजरा केला गेला आहे. तसेच उद्या प्रपोज डे आहे. प्रपोज डेच्या दिवशी लोकं आपल्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करतात. प्रेमात पडणे सोपे वाटत असले तरी प्रपोज करणे खूप अवघड काम आहे. लोकं एकांतात खूप तयारी करतात, पण प्रेमासमोर आल्यावर मनाचीच चर्चा हृदयातच राहते.

आयुष्यात खास व्यक्तीसोबत अतुट नाते जोडण्यासाठी कोणत्याही विशेष दिवसाची, क्षणाची किंवा कोणत्याही मुहूर्ताची खरं तर आवश्यकता नसते. आपली आवडती व्यक्ती जीवनात येण्यासाठी गरजेच्या गोष्टी असतात त्या म्हणजे ‘प्रयत्न’ आणि ‘वेळ’. या दोन्ही गोष्टींमुळे कोणतीही व्यक्ती अगदी आपसुकच आयुष्याच्या प्रवासात आपल्यासोबत जोडली जाते. तुम्हाला देखील स्पेशल व्यक्तीला प्रपोज करायचे आहे का? तर तिला/ त्याला एखादा छानसा मेसेज देखील पाठवा…

समुद्राचं किनाऱ्याशी…
ढगांचं आभाळाशी…
मातीचे जमिनीशी..
तसंच अतुट नाते आहे…
माझे केवळ तुझ्याशीच…

आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवीय
एकटेपणात तुझी सोबत हवीय
आनंदाने भरलेल्या या आयुष्यात
प्रेम फक्त तुझंच हवंय

महागडे गिफ्ट नको मला
तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि फक्त मलाच
होकार असेल तर
तुझा हात दे माझ्या हातात

काही पावले माझ्या सोबत चाल..
पूर्ण कहाणी मी तुला सांगेन,
नजरेतून तुला जे कळलं नाही…
त्या भावना मी शब्दातून तुझ्यासमोर मांडेन

ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चूक तर माझ्या नजरेची आहे
जे लपून-छपून फक्त तुलाच पाहतात…
मी तर गपच राहायचं ठरवलं होतं
पण माझ्या मनातील साऱ्या भावना अखेर डोळ्यांनीच व्यक्त केल्या
हॅपी प्रपोज डे २०२२