तुम्ही जे काही खाता किंवा पिता ते तुमच्या आतड्यांमधून जाते. शरीरातील आतड्यांचे काम म्हणजे तुम्ही खात असलेल्या अन्नापासून पोषण वेगळे करणे, आणि शरीराच्या इतर भागापर्यंत पोहोचणे आणि बाकीचा कचरा शरीराबाहेर काढून टाकणे आहे. साहजिकच आतड्यांच्या क्रियेवर परिणाम झाला तर तुमची पचनसंस्था बिघडू शकते, ज्यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार देखील होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतड्यांमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. काही पदार्थ चांगले बॅक्टेरिया मारतात, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. चांगले बॅक्टेरिया पचनास मदत करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आतड्यांच्या आरोग्याशी तडजोड केल्याने तुम्हाला इन्सुलिन रेसिस्टेंट, वजन वाढणे, जळजळ, लठ्ठपणा, IBD आणि कोलोरेक्टल कर्करोग यासारख्या गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो. काही खाद्यपदार्थ तुमचे आतडे खराब करू शकतात. त्यामुळे ते आजच खाणे सोडा…

साखर

साखर हे अनेक रोगांचे मूळ आहे. हे आतड्यांमधील निरोगी जीवाणू काढून टाकण्याचे काम करते, ज्यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते. साखर लहान आतड्यात वेगाने पचते, ज्यामुळे तुमची रक्तातील साखर वाढू शकते. रिफाइंड शुगरमध्ये सुक्रोज, उच्च फ्रुक्टोज कॉर्न सिरप, एग्वेव्ह सिरप आणि सोडा सारखी गोड पेये यांचा समावेश आहे.

(हे ही वाचा: हळदीच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल? फक्त वापरण्याची पद्धत एकदा जाणून घ्या)

मैदा

जर तुम्ही मैदा किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करत असाल तर तुमच्या आतड्यांना गंभीर इजा होऊ शकते. धान्यापासून मैदा बनवल्याने त्यातील फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे नष्ट होतात. त्याच्या वापरामुळे तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू शकते. रिफाइंड धान्यांमध्ये पांढरे पीठ, पांढरा ब्रेड, पांढरा तांदूळ, पेस्ट्री, पास्ता आणि पांढर्‍या पिठापासून बनवलेले स्नॅक्स इत्यादींचा समावेश होतो.

आर्टिफीसियल स्वीटनर

ब्रिटनमधील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की कृत्रिम गोड पदार्थ आतड्यांमध्ये हानिकारक बॅक्टेरिया वाढवून रोगांची संख्या वाढवू शकतात. त्याचप्रमाणे, दुसर्‍या अभ्यासात असे आढळून आले आहे की विशिष्ट प्रकारचे कृत्रिम गोड पदार्थ आतडे जळजळ आणि ग्लुकोज इनटोलरेंस या दोन्हीचा धोका वाढवू शकतात, ज्यामुळे मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

( हे ही वाचा: युरिक ॲसिड वाढल्यास होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; यापासून सुटका कशी मिळवायची जाणून घ्या)

तळलेले पदार्थ

तळलेले पदार्थ आरोग्यासाठी सर्व प्रकारे हानिकारक असतात. डायबिटीज केअरमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, तळलेले पदार्थ आतड्यांमधील निरोगी जीवाणू नष्ट करू शकतात. यामुळे तुम्हाला रक्तातील साखर वाढणे, पोटात विषारीपणा वाढणे आणि सूज येणे अशा समस्या असू शकतात. तुम्ही तळलेले मांस, फ्रेंच फ्राईज, डोनट्स आणि इतर तळलेले डेझर्ट खाणे टाळावे.

जास्त फायबर वापरणे

संपूर्ण धान्य आणि भाज्यांसारखे फायबर-समृद्ध अन्न हे आतड्याच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या पचनासाठी आवश्यक आहे. पण जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खात असाल तर तुमच्या पचनसंस्थेला जुळवून घेण्यास त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्हाला गॅस आणि सूज येऊ शकते. त्यामुळे फायबरचे प्रमाण हळूहळू वाढवा.

( हे ही वाचा: ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ट्राय करा; खराब कोलेस्ट्रॉल पासून कायमस्वरूपी सुटका मिळेल)

‘या’ गोष्टी आतड्यांसाठीही हानिकारक असतात

जर तुम्ही प्रीबायोटिक्स नसलेल्या अधिक गोष्टी खात असाल तर तुम्हाला अजूनही धोका आहे. यामध्ये डाळ, चणे आणि बीन्स, ओट्स, केळी, शतावरी आणि लसूण यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय अति मद्यपान, प्रतिजैविकांचा अतिवापर, धूम्रपानाचे व्यसन यासारख्या गोष्टीही आतड्यांसाठी हानिकारक असतात. क्लीव्हलँड क्लिनिकच्या संशोधकांना आढळले की जास्त अंडी खाणे देखील आतड्यांसाठी चांगले नाही.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to research 10 worst foods for digestion that can damage large and small intestine gps
First published on: 15-12-2022 at 16:55 IST