Cancer Treatment In Just 7 Minutes: इंग्लंडमधील शेकडो कर्करोगाच्या रुग्णांना उपचारासाठी अत्यावश्यक असे इंजेक्शन बनवणारी ब्रिटनची राज्य-संचालित राष्ट्रीय आरोग्य सेवा संस्थेच्या तपासात एका मोठा आशावादी तपास समोर आला आहे. या संस्थेच्या नव्या संशोधनामुळे कॅन्सरवरील उपचारांचा कालावधी तीन चतुर्थांश कमी होणार असल्याचे समजतेय. असे झाल्यास इतक्या मोठ्या स्तरावर यश संपादन करणारी ही जगातील पहिली संस्था ठरू शकते.

मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (MHRA) च्या मंजुरीनंतर, NHS इंग्लंडने मंगळवारी सांगितले की, इम्युनोथेरपी, एटेझोलिझुमॅबने उपचार केलेल्या शेकडो रुग्णांना ‘त्वचेच्या खाली’ इंजेक्शन देण्यात आले आहे. म्हणजेच आतापर्यंत ज्या शेकडो कॅन्सर रुग्णांचा इलाज इम्युनोथेरपीने होत होता. त्यांना आता त्वचेच्या खाली एटेजोलिजुमॅबचे इंजेक्शन देण्याची तयारी केली आहे. यामुळे कॅन्सरच्या उपचाराचा वेळ कमी होणार आहे.

यापूर्वी कॅन्सर रुग्णांवर सरळ ड्रीपच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांच्या नसांमध्ये इंजेक्शन दिले जात होते. या प्रक्रियेला सुमारे ३० मिनिटे ते एक तासांचा वेळ लागत होता. काही रुग्णांना त्यापेक्षा अधिक वेळ लागतो. नसांमध्ये हे औषध पोहचणे अवघड असते. आता नव्या तंत्रज्ञानात औषध त्वचेत इंजेक्ट करुन दिले जाईल. यामुळे कॅन्सरवरील उपचारांचा कालावधी अवघ्या सात मिनिटांवर येऊ शकतो.

वेस्ट सफोल्क एनएचएस फाऊंडेशन ट्रस्टचे सल्लागार ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अलेक्झांडर मार्टीन यांनी सांगितले की या नव्या तंत्राने केवळ रुग्णांवर जलद उपचार मिळतील असेच नव्हेत त्यामुळे अधिक रुग्णांची तपासणी करायला डॉक्टरांना वेळ मिळेल. रोशे प्रोडक्ट्स लिमिटेडचे मेडीकल डायरेक्टर मारियस शोल्ट्ज यांनी सांगितले की या नव्या पद्धतीत केवळ सात मिनिटे लागतात.

हे ही वाचा<< अंगठा व बोटांच्या अंतरावरून पुरुषांच्या लिंगाची लांबी खरंच मोजता येते? OMG 2 मधील या प्रश्नावर तज्ज्ञ सांगतात..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सध्या तयार करण्यात आलेले हे एक इम्युनोथेरपी औषध असून रुग्णांच्या इम्यून सिस्टीमला कॅन्सरग्रस्त पेशी शोधणे आणि नष्ट करण्यास मदत करते. याचा वापर सध्या फुप्फुस, स्तन, यकृत आणि मुत्राशयाच्या कॅन्सरमध्ये होतो.