बदललेली जीवनशैली, तणाव यांमुळे आजकाल अनेकांना मायग्रेन, डोकेदुखी याचा त्रास होतो. तणाव आणि काही आजारांमधील लक्षणांच्या स्वरूपात होणारी डोकेदुखी वगळता काही पदार्थ खाल्ल्यानेही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. कोणते आहेत असे पदार्थ जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोकेदुखीसाठी करणीभूत ठरणारे पदार्थ

आणखी वाचा : High BP नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात ‘हे’ पदार्थ; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

लोणचं
लोणचं किंवा त्या प्रकारची फर्मेंटेड खाद्यपदार्थांमध्ये टाइरामिन जास्त असते, ज्यामुळे डोके दुखू शकते.

कॉफी
कॉफी हे अनेकांचे आवडते पेयं असते, थकवा दुर करण्यासाठी काहीजण दिवसभरात अनेक वेळा कॉफी पितात. परंतु यात आढळणारे कॅफिन शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते, तसेच यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

चॉकलेट
चॉकलेटमध्येही टाइरामिन आढळते, त्यामुळे जर जास्त चॉकलेट खाण्याची सवय असेल तर त्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

कमी कॅलरी असणारे खाद्यपदार्थ
जास्त कॅलरी असणारे खाद्यपदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणून काहीजण कमी कॅलरी असणारे खाद्यपदार्थच खातात. पण यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच रक्तदाबही अनियंत्रित होण्याची शक्यता असते.

आणखी वाचा : हिवाळ्यात मनुके खाणे आरोग्यासाठी ठरेल वरदान! जाणून घ्या याचे अनेक फायदे

केक, ब्रेड
केक, ब्रेड असे पदार्थ बनवताना यीस्टचा वापर केला जातो. तसेच यामध्ये टायरामाइन नावाचा घटक आढळतो, ज्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास ट्रिगर होऊ शकतो.

अल्कोहोल आणि तंबाखू
अल्कोहोलच्या अतिसेवनाने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. यासह धूम्रपान केल्याने शरीरातील सेरोटोनिनच्या पातळीवर परिणाम होतो, ज्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cake chocolate alcohol coffee these food items can increase headache problem pns
First published on: 23-11-2022 at 11:06 IST