Banana benefits for health: फायबर, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटक शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. निरोगी आरोग्यासाठी फळांचे सेवन हा एक निरोगी मार्ग आहे. “फळे ही जीवनसत्त्व, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, फोलेट, कार्बोहायड्रेट्स, पाणी, फॉलिक अॅसिड, झिंक व मॅग्नेशियम यांचे समृद्ध स्रोत असतात.” असे मुंबई येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ फौजिया अन्सारी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “नियमितपणे फळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता. त्यामुळे संक्रमण आणि आरोग्य समस्या दूर ठेवता येतात.”

पण, एक फळ दुसऱ्यापेक्षा चांगले आहे का? आणि असे कोणते फळ आहे, जे सफरचंदशी स्पर्धा करू शकते. जे आरोग्य समस्यांना दूर ठेवते? दिल्लीतील न्यूरोलॉजिस्ट, मेडिसिन व न्यूरोलॉजी डॉ. प्रियंका सेहरावत म्हणाल्या, “दिवसाला एक केळेदेखील डॉक्टरांना दूर ठेवू शकते.”

  • केळे हे एक उत्तम प्री-बायोटिक फळ आहे, जे आतड्यात निरोगी जीव निर्माण करण्यास मदत करते.
  • केळ्यामध्ये भरपूर पोटॅशियम असते.
  • केळ्यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ती रक्तदाबाच्या रुग्णांसाठी चांगली आहेत.
  • केळी हा फायबरचाही चांगला स्रोत आहे.
  • केळ्यामुळे वजन वाढत नाही. म्हणून जर तुमचे जेवण संतुलित असेल, तर तुम्ही दिवसातून १-२ केळी खाऊ शकता.

याबाबत सहमती दर्शवीत अन्सारी यांनी सांगितले की, केळी सहज चावता येत असल्यामुळे ती लहान मुले, तसेच वृद्धांसाठी फायदेशीर आहेत. “केळी बद्धकोष्ठता रोखणे, मूड व ऊर्जेची पातळी वाढवणे, निरोगी वजन व्यवस्थापित करण्यात मदत करणे, स्नायूंचे आरोग्य मजबूत करणे व त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणे यांसारखे विविध प्रकारचे आरोग्यदायी फायदे देते.”

अन्सारी सांगतात, ”केळी प्रत्येकासाठी योग्य नाहीत. मधुमेह, उच्च रक्तदाब व किडनीचे आजार यांसारख्या काही आरोग्यविषयक समस्या असलेल्या लोकांनी कोणत्याही स्वरूपात केळी खाणे टाळावे. कारण- केळ्यामध्ये नैसर्गिक साखर असते. दररोज दोन ते दोनपेक्षा जास्त केळी खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते आणि त्यानंतर इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फळे आरोग्यदायी असली तरी त्यात नैसर्गिक गोडवा असल्याने ती कमी प्रमाणात खावीत. “तुमच्या आहारात किंवा खाण्याच्या सवयींमध्ये मोठे बदल करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या,” असे अन्सारी म्हणाल्या.