Side Effects Of Eating Chickpeas Everyday : दिवसभर एनर्जी टिकून राहावी म्हणून प्रत्येकालाच ऊर्जा हवी असते. विशेषतः काम करणाऱ्या तरुणाईला, दिवसभराच्या ताणतणावात ऊर्जा टिकवणे आवश्यक असते. यासाठी आहारात ऊर्जा देणारे पदार्थ खाणे ही एक सोपी पद्धत आहे. त्यासाठी अनेक जण चणे खातात; जे आवश्यक पोषक तत्त्वांनी भरलेले असतात. बहुतेकदा निरोगी, प्रथिनेयुक्त नाश्ता म्हणून भाजलेले चणे खाल्ले जातात. पण, पॅक केलेले किंवा व्यावसायिकरित्या भाजलेले चणे दिसतात तितके पौष्टिक नसतात. काहींमध्ये रासायनिक अवशेष किंवा असे काही पदार्थ असू शकतात; जे नियमितपणे सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो;असे दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, डॉक्टर दीपाली शर्मा म्हणाल्या आहेत.
सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे अॅक्रिलामाइड. अॅक्रिलामाइडएक रासायनिक संयुग आहे; जे उच्च तापमानावर भाजलेले किंवा तळलेले असताना नैसर्गिकरित्या तयार होतात. ॲक्रिलामाइड हे एक रासायनिक उत्पादन (byproduct) आहे; जे माययार्ड रिॲक्शन (Maillard Reaction) दरम्यान तयार होतं.
भाजलेल्या पदार्थ सोनेरी-तपकिरी रंगात बदलणे, त्यांना चव आणि सुगंध येतो हीच माययार्ड रिऍक्शन असते. भाजलेले चणे तयार करताना उष्णतेमुळे रासायनिक प्रक्रिया माययार्ड रिअॅक्शन तयार होते. या प्रक्रियेमुळे अॅक्रिलामाइड नावाचे एक उप-उत्पादन तयार होऊ शकते. नैसर्गिकरित्या उद्भवणारे अमीनो आम्ल एस्पॅराजिन आणि कमी करणारे साखर (जसे की ग्लुकोज आणि फ्रुक्टोज) जे वनस्पती-आधारित पदार्थांमध्ये आढळतात; ज्यामध्ये चणे यांचा समावेश आहे.भाजण्याचा वेळ जितका जास्त आणि तापमान जितके जास्त असेल तितकेच माययार्ड रिएक्शन जास्त होते आणि त्यामुळे अॅक्रिलामाइडचे प्रमाण वाढू शकते; असे आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक डॉक्टर अर्चना बत्रा म्हणाल्या आहेत.
डॉक्टर बात्रा यांच्या मते, अॅक्रिलामाईडचा या रसायनाचा मेंदूवर (नर्व्ह सिस्टीमवर) आणि कॅन्सरशी (कर्करोगाशी) संबंध असल्याचे काही संशोधनात दिसून आले आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) द्वारे या आंतरराष्ट्रीय संस्थेने अॅक्रिलामाइडचे “मानवी कर्करोगजन्य” (Group 2A) म्हणून वर्गीकृत केले आहे. हे वर्गीकरण प्रयोगशाळेतील प्राण्यांवर केलेल्या अभ्यासांवर आधारित आहे. मानवांमध्ये आहारविषयक (dietary) अभ्यासांमध्ये, सामान्य सेवन पातळीवर कर्करोगाच्या धोक्याशी अॅक्रिलामाईडचा मजबूत संबंध सातत्याने दिसून आलेला नाही.
अॅक्रिलामाइडचे शरीरात गेल्यावर ग्लायसिडामाइड (glycidamide) मध्ये रूपांतर होते; जे जनुकांना (genes) हानी पोहोचवू शकते. माणसांवर केलेल्या अभ्यासांमध्ये (human studies) सामान्य अन्नपातळीवर अॅक्रिलामाइड आणि कॅन्सर यांचा थेट संबंध ठामपणे दिसलेला नाही. पण, तरीही एफडीए आणि डब्ल्यूएचओ सारख्या संस्था सांगतात की, या पदार्थाचं सेवन शक्य तितके कमी ठेवावे. कारण दीर्घकाळ – सेवन केल्यास आरोग्यास हानिकारक ठरू शकतात.
याव्यतिरिक्त, काही कमी दर्जाच्या किंवा कृत्रिमरित्या चव असलेल्या भाजलेल्या चण्यांमध्ये प्रिझर्वेटिव्ह्ज (जसे की सोडियम बेंझोएट), कृत्रिम रंग किंवा चव वाढवणारे (जसे की एमएसजी) असू शकतात, जे पचनसंस्थेला त्रास देऊ शकतात किंवा संवेदनशील व्यक्तींमध्ये अॅलर्जी निर्माण करू शकतात; असे शर्मा यांनी म्हटले आहे.
सुरक्षित राहण्यासाठी, पॅक करण्यात आलेले भाजलेले चणे खरेदी करण्यापूर्वी नेहमीच लेबल काळजीपूर्वक तपासा. कमी तापमानावर भाजलेले, संरक्षक घटक नसलेले चणे घेऊ नका आणि १०० टक्के नैसर्गिक घटक असलेल्या चण्यांना प्राधान्य द्या. जर तुम्ही सैल भाजलेले चणे विकत घेत असाल; तर स्वच्छ ठिकाणाहून घेतले आहेत ना याची खात्री करा. तसेच त्यांना जळका किंवा रासायनिक वास येत नाही याकडे सुद्धा लक्ष द्या.
तर भाजलेल्या चण्याचे सेवन कमी करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करू शकता…
सोनेरी रंग – सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे भाजलेले चणे गडद तपकिरी किंवा कुरकुरीत, जळलेल्या रंगापेक्षा सोनेरी, पिवळ्या किंवा हलक्या रंगात भाजून घ्या. गडद तपकिरी रंग जास्त प्रमाणात अॅक्रिलामाइड तयार होण्याचे संकेत देतो; असे डॉक्टर बत्रा म्हणाले.
कमी तापमान, जास्त वेळ – चणे घरी भाजताना, खूप जास्त आचेवर भाजण्यापेक्षा, थोडे कमी तापमानात जास्त वेळ भाजा.
चणे धुवा – कच्चे चणे शिजवण्यापूर्वी भिजवून आणि पूर्णपणे धुवून घेतल्याने पृष्ठभागावरील साखरेचे काही भाग धुण्यास मदत होऊ शकते; ज्यामुळे पूर्वसूचक घटक कमी होण्याची शक्यता असते.
संतुलित आहार – ताजी फळे, भाज्या यांसारखे गरम न केलेले पदार्थ निरोगी आणि संतुलित आहार खाणे सुरू ठेवा, जेणेकरून भाजलेले चणे तुमच्या एकूण वापराचा एक छोटासा भाग असतील.
