scorecardresearch

किडनी हळू हळू पूर्ण निकामी व्हायच्या आधी शरीर देऊ शकते ‘ही’ ७ लक्षणे! लहान मुलांमध्येही वाढलेला धोका ओळखा

Kidney Disease Signs: किडनीच्या बिघाडाआधी शरीरात दिसणारी काही सामान्य लक्षणे आज आपण जाणून घेणार आहोत. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत ही लक्षणे सर्वांमध्ये दिसू शकतात.

Chronic Kidney Failure Shows This Seven Signs In Body Before Kidney Stops Working How To Identify Danger In Kids Health News
किडनी हळू हळू पूर्ण निकामी व्हायच्या आधी शरीर देऊ शकते 'ही' ७ लक्षणे (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Chronic Kidney Disease Signs: क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये किडनी हळूहळू कार्य करण्याची क्षमता गमवण्याचा धोका वाढतो. ही एक गंभीर आणि संभाव्य जीवघेणी स्थिती आहे. जगभरातील लहान मुलांसह लाखो लोक या आजराने ग्रस्त आहेत. किडनीचा आजार अनुवंशिकता आणि जीवनशैलीतील बिघाडांमुळे वाढू शकतो. परंतु वेळेत रोगाचे निदान झाल्यास व योग्य उपचार केल्यास तुम्ही या आजारावर नक्कीच मात करू शकता. रोगाचे निदान साहजिकच डॉक्टरांकडून करून घेणे उचित ठरेल पण त्याआधी तुमचे शरीरच तुम्हाला काही महत्त्वाचे संकेत देत असते, किडनीच्या बिघाडाचा आधी शरीरात दिसणारे काही सामान्य लक्षणे आज आपण जाणून घेणार आहोत. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत ही लक्षणे सर्वांमध्ये दिसू शकतात.

क्रोनिक किडनी आजाराच्या आधी शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणे

१) वारंवार लघवी होणे

वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्रीच्या वेळी सतत लघवीसाठी उठावे लागत असेल तर हा तुमच्या शरीराचा संकेत असू शकतो. जेव्हा किडनी शरीरातील कचरा आणि अतिरिक्त द्रव योग्यरित्या फिल्टर करू शकत नाहीत तेव्हा मूत्र उत्पादनात वाढ होते.

२) सूज येणे

हातपायांना सूज येणे हे किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते. किडनी जेव्हा शरीरातील द्रव योग्यरित्या नियंत्रित करू शकत नाही त्यामुळे ऊतींमध्ये द्रव जमा होते व परिणामी शरीर सुजल्यासारखे वाटू शकते.

३) उच्च रक्तदाब

मुलांमध्ये उच्च रक्तदाब हे किडनी विकाराचे लक्षण असू शकते. आपली किडनी रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा मूत्रपिंड खराब होते किंवा नीट काम कार्य करत नाहीत तेव्हा रक्तदाब वाढू शकतो.

४) थकवा

वारंवार थकवा येणे, सुस्त वाटणे हे मुलांमध्ये क्रोनिक किडनी आजाराचे लक्षण असू शकते. जेव्हा मूत्रपिंड शरीरातील कचरा आणि जास्तीचे द्रव योग्यरित्या फिल्टर करू शकत नाहीत, ज्यामुळे विषारी पदार्थ तयार होतात ज्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटू शकते.

५) लघवीवाटे रक्त जाणे

लघवीतील रक्त किंवा हेमॅटुरिया हे मुलांमध्ये किडनीच्या विकाराचे लक्षण असू शकते. महिलांमध्येही मासिक पाळीच्या दिवसांशिवाय वारंवार लघवीतून रक्त जात असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.

६) उंची व मेंदूचा विकास खुंटणे

किडनीच्या आजारात लहान मुलांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसून येऊ शकते. किडनीच्या बिघाडामुळे मुलांच्या वाढीस उशीर होण्याचा त्रास वाढू शकतो. जेव्हा मूत्रपिंड शरीरातील आवश्यक पोषक सत्व नीट नीट शोषून घेऊ शकत नाहीत, तेव्हा वाढ आणि विकास खुंटतो.

७) भूक न लागणे

मुलांमध्ये भूक न लागणे हे क्रोनिक किडनी आजाराचे लक्षण असू शकते. शरीरातील आवश्यक पोषक घटकांच्या पातळीचे नियमन करण्यात किडनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जेव्हा किडनी खराब होते तेव्हा पचन कमी वेगाने होते व भूक सुद्धा कमी झाल्याचे भासू शकते.

हे ही वाचा<< हेच हवं होतं! चहा बनवायच्या ‘या’ ५ टिप्स डायबिटीज व ऍसिडिटी ९० टक्के कमी करू शकतात, जाणून घ्या पद्धत

तुमच्या मुलामध्ये तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. क्रोनिक किडनी आजाराचे निदान वेळीच झाल्यास तुम्हाला गुंतागुंत रोखण्यास मदत होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवश्य घ्या)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 16:22 IST

संबंधित बातम्या