Bharati Sing Gallstone Signs & Treatment: ‘लहान बाळाची जबाबदारी असलेल्या कोणत्याही आईला हॉस्पिटलमध्ये राहण्याची वेळ येऊ नये’, असं म्हणत कॉमेडी क्वीन भारती सिंगने एक भावुक पोस्ट केली आहे. मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये भारती सिंगवर शस्त्रक्रिया पार पडली. पोटात तीव्र वेदना होत असल्याने भारती रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती तेव्हा चाचण्यांमधून तिच्या पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले. यावर उपचारासाठी शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले होते. याबाबत माहिती देताना भारतीने तिच्या युट्युब चॅनेलवरील व्हिडीओमध्ये भावुक संदेशही दिला आहे. भारतीने नेमकं आपल्या होणाऱ्या त्रासाबाबत काय सांगितलं तसेच हा आजार किती धोकादायक आहे? त्याची लक्षणे व उपचार काय? याविषयी आज आपण या लेखात माहिती जाणून घेणार आहोत.

भारती व्हिडीओमध्ये काय म्हणाली?

भारती सिंगने उघड केले की तिला सुरुवातीला अपचन किंवा अन्नातून विषबाधा झाल्याने वेदना होत असाव्यात असे वाटले होते. पित्ताशयातील खड्यांचे निदान झाल्यावर शस्त्रक्रियेसाठी तिला दोन दिवस रुग्णालयात राहावे लागणार होते, यावेळी दोन वर्षांच्या आपल्या लेकापासून दूर राहताना खूप त्रास झाल्याचं भारतीने म्हटलं आहे. या दोन दिवसात आपल्या बाळाला त्याच्या वडिलांनी (हर्ष) आई शूटिंगसाठी गेली असल्याचे सांगितले होते असेही भारती म्हणाली. ती सांगते की, “लहान बाळाची जबाबदारी असलेल्या कोणत्याही आईला हॉस्पिटलमध्ये राहण्याची वेळ येऊ नये, ही अनुपस्थिती, हा ब्रेक फक्त काहीच दिवसांचा असला तरी पण त्रासदायक आहे.”

पित्ताशयात खडे होण्याची लक्षणे

भारती सिंगला झालेला हा पित्ताशयातील खड्यांचा त्रास नेमका काय हे ही आपण पाहूया. डॉ हितेंद्र गार्ग, वरिष्ठ सल्लागार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्ली, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला पित्ताशयात खडे होण्याची काही सामान्य लक्षणे सांगितली आहेत. डॉ. गार्ग सांगतात की..

  • वरच्या उजव्या ओटीपोटात किंवा एपिगॅस्ट्रिक भागात अचानक आणि तीव्र वेदना होणे. बहुतेकदा उजव्या खांद्याच्या मागील भागात या वेदना पसरणे.
  • मळमळ, उलट्या, ताप, थंडी वाजून येणे, कावीळ (त्वचा आणि डोळे पिवळसर होणे)
  • गडद किंवा चहाच्या रंगाची लघवी होणे
  • हलक्या रंगाचे किंवा खडूसारखे मल

लक्षात घ्या ही लक्षणे जळजळ, संसर्ग (पित्ताशयाचा दाह) किंवा पित्त-वाहिनीतील अडथळा दर्शवू शकतात, ज्यासाठी त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

पित्ताशयातील खडे किडनी स्टोनपेक्षा कसे वेगळे आहेत?

पित्ताशयातील खडे स्थान, रचना आणि कार्यपद्धती यानुसार किडनी स्टोनपेक्षा वेगळे असतात, असे डॉ गार्ग यांनी स्पष्ट केले.“पित्ताशयातील खडे पित्ताशयात किंवा पित्त नलिकांमध्ये तयार होतात आणि ते प्रामुख्याने कोलेस्टेरॉल किंवा पित्तामध्ये आढळणाऱ्या रंगद्रव्यांनी बनलेले असतात. मूत्रपिंड किंवा मूत्रमार्गात मुतखडे तयार होतात आणि ते सामान्यत: कॅल्शियम ऑक्सलेट, यूरिक ऍसिड किंवा मूत्रात उपस्थित असलेल्या इतर खनिज क्षारांचे बनलेले असतात.”

हे ही वाचा<< भारती सिंहने खाण्यावर प्रचंड प्रेम असताना १५ किलो वजन कमी कसं केलं? फॅन्सना सांगितले ‘हे’ ४ सिक्रेट फंडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शस्त्रक्रियेनंतर तुम्ही स्वतःची काळजी कशी घ्याल?

सुरुवातीचे काही दिवस विश्रांती घ्या. कष्टाची कामे टाळा. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार हळूहळू रुटीन पुन्हा सुरू करा. रुग्णांनी सुरुवातीला कमी चरबीयुक्त, सहज-पचण्याजोगा आहार घ्यायला हवा. आपण पूर्णपणे बरे होईपर्यंत व खरंतर नंतरही हायड्रेटेड राहणे आणि अल्कोहोल टाळणे आवश्यक आहे.

हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे की शस्त्रक्रियेनंतर कोणत्याही समस्या किंवा गुंतागुंतीकडे आपणही सतर्क राहून लक्ष द्यायला हवे. सतत वेदना, ताप किंवा कावीळ यांसारखी कोणतीही लक्षणे बरी होण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे