मधुमेहाच्या रुग्णांना तब्बेतीची विशेष काळजी घ्यावी लागते. रक्तातील साखर अनियंत्रित होण्याबरोबरच मधुमेहाच्या रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातीलच एक म्हणजे अशा रुग्णांची दृष्टी कमकुवत होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी डोळ्यांची क्षमता कमी होण्याची शक्यता असते, हे टाळण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी काही उपाय मदत करू शकतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.

डोळ्यांची क्षमता कमी होऊ नये यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना फायदेशीर ठरणारे उपाय

आणखी वाचा: चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने काय होते? जाणून घ्या याचे शरीरावर होणारे परिणाम

योग्य आहार

मधुमेहाच्या रुग्णांनी योग्य डाएट फॉलो करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य अन्नपदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्याबरोबरच डोळ्यांचे आरोग्यही जपले जाते. यासाठी विटामिन ए, विटामिन ई, विटामिन सी, बीटा कॅरोटीन, ल्युटिन, ओमेगा ३ फॅटी ॲसिड असे पोषकतत्व असणाऱ्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा.

हेही वाचा – डायबिटीजसाठी वरदान ठरू शकतात शेंगदाणे; पण ‘या’ चुका टाळा, कसे खावेत हे ‘इथे’ जाणून घ्या

शरीराची हालचाल करा

शरीराची सतत हालचाल केल्याने किंवा शरीर ॲक्टिव्ह ठेवल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत मिळते, त्यामुळे डोळ्यांचे आरोग्यही नीट राहते. त्यामुळे शरीर सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करावा.

धूम्रपान टाळावे

मधुमेहाच्या रुग्णांना धूम्रपान टाळण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे डोळ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते.

आणखी वाचा: हिवाळ्यात गूळ खाणे ठरेल आरोग्यासाठी वरदान! जाणून घ्या फायदे

डोळ्यांची तपासणी

मधुमेहाच्या रुग्णांनी वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करावी. मधुमेहाच्या रुग्णांना काही काळानंतर डोळ्यांशी निगडित समस्या जाणवु लागतात. अशा रुग्णांना मोतीबिंदू, ग्लुकोमा, डायबिटिक रेटीनोपैथी याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी डोळ्यांची काळजी घेणे आणि नियमित तपासणी करणे गरजेचे असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)