कॉफी आणि चहाचे कट्टरप्रेमी त्यांचे पेय किती उत्तम आहेत हे रील किंवा मिम्सच्या मदतीने नेहमीच आवर्जून सांगताना दिसतात. सकाळी गरमागरम चहा, तर संध्याकाळी किंवा मिटिंगसाठी कॉफीचा आस्वाद घेणारे आपल्यातील बरेच जण आहेत. पण, कॉफी आणि चहाचे सेवन तुमच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे का? तर आज आपण चहा, कॉफी कधी प्यावी? त्याच्या सेवनाने शरीरावर होणारे फायदे आणि तोटे जाणून घेणार आहोत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) भारतीयांना चहा आणि कॉफीचा वापर मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) च्या पार्टनरशिपमध्ये वैद्यकीय संस्थेच्या नवीन आहार मार्गदर्शक तत्त्वांनुसार चहा आणि कॉफीचे जास्त सेवन टाळले पाहिजे. कारण त्यात “कॅफिन” असते; ज्याचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो. १५० मिली कप कॉफीमध्ये ८० ते १२० मिलीग्राम कॅफिन, इन्स्टंट कॉफीमध्ये ५०-६५ मिलीग्राम आणि चहामध्ये ३० ते ६५ मिलीग्राम कॅफिन असते. तर ICMR ने दररोज फक्त ३०० मिलीग्राम कॅफिनचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा…International Nurses Day: ‘जुनं फर्निचर’ची कथा अन् आई-वडीलांची व्यथा; वृद्ध, आजारी रुग्णांची काळजी घेण्यासाठी नर्सिंग सेवा योग्य ठरते का?

या विषयावर द इंडियन एक्स्प्रेसने सीके बिर्ला हॉस्पिटल, दिल्ली येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे सल्लागार डॉक्टर विकास जिंदाल यांच्याशी चर्चा केली आहे. जेवण करण्यापूर्वी किंवा जेवणानंतर चहा किंवा कॉफी प्यायल्याने शरीरातील लोहासारखी महत्त्वाची खनिजे शोषण्यास प्रतिबंध येऊ शकतो; ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.

जेवणाच्या किमान एक तास आधी किंवा नंतर चहा, कॉफी ही पेय न पिण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. कारण त्यात टॅनिन नावाचे संयुग असतात. टॅनिन मानवी शरीराच्या लोह शोषण्याच्या कामात व्यत्यय आणू शकते. शरीरातील लोहाची कमतरता आणि ॲनिमियासारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. तसेच कॉफीच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाची अनियमिततादेखील होऊ शकते, असे त्यात म्हटले आहे.

आतड्यांचे आरोग्य सुनिश्चित करावे की आपण आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी कॉफी, चहाचे सेवन मर्यादित करावे?

दुधाशिवाय चहा पिण्याचे विविध फायदे आहेत. जसे की, रक्त परिसंचरण सुधारणे, कोरोनरी धमनी, (स्नायूंना ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात त्यांना ‘कोरोनरी’ धमनी म्हणतात) पोटाचा कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, मांस आणि सीफूडची खाण्याची शिफारस केली आहे आणि तेल, साखर आणि मिठाचे सेवन मर्यादित करावे असा सल्ला दिला आहे.

लोह शोषणासंबंधीच्या चिंतेव्यतिरिक्त जेवणाबरोबर कॉफी, चहा ऐवजी पाणी प्यायल्याने पोटातील असलेले आम्ल पातळ होऊ शकते; जे योग्य पचनासाठी महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर विकास जिंदाल म्हणाले, यामुळे अन्न-रसाचे आतड्यामार्फ़त शोषण होऊ शकते आणि शेवटी एकूण पचन आणि पोषक शोषणावर परिणाम होईल.”

दुधाशिवाय चहा घेणे हा चांगला पर्याय आहे का?

दुधाशिवाय चहा घेणे पोषक तत्वांच्या शोषणाशी संबंधित काही समस्या कमी करू शकते. कारण दुधामुळे लोहासारख्या काही पोषक घटकांचे शोषण रोखू शकते, असे डॉक्टर जिंदाल यांनी स्पष्ट केले. पण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, चहा किंवा कॉफीमध्ये दूध नसतानाही, कॅफिन आणि टॅनिन असतात; जे पचन आणि पोषक शोषणावर परिणाम करू शकतात, असे डॉक्टर विकास जिंदाल म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पचन आणि पोषक तत्वांचे जास्तीत जास्त शोषण करण्यासाठी चहा किंवा कॉफीपेक्षा जेवणासोबत पाणी पिणे चांगले आहे. एखाद्याच्या आवडीनुसार चहा-कॉफी पिण्याची इच्छा असेल तर ही पेये घेण्यापूर्वी जेवणानंतर किमान एक तास थांबण्याचा सल्ला दिला जातो. सामान्य आरोग्य आणि तंदुरुस्ती राखण्यासाठी एखाद्याने संतुलित आहाराद्वारे पुरेशी पोषक तत्वे घेतली पाहिजेत, असे डॉक्टर विकास जिंदाल पुढे म्हणाले आहेत.