अंडी एक असे सुपरफूड आहे जे मांसाहारी लोकं तर खातातचं, पण शाकाहारी लोकही ते भरपूर खातात. प्रथिनेयुक्त अंड्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते. पोषक-समृद्ध अंडी जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी चरबी यांसारख्या पोषक तत्वांनी भरलेली असतात. आरोग्यासाठी फायदेशीर अंड्यामुळे काही आजारही वाढू शकतात.

हृदयरोगींना अनेकदा अंडी खाण्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला दिला जातो. अंडी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदयविकाराचा धोकाही जास्त असतो. पण आता नवे संशोधन समोर आले आहे ज्यात असे दिसून आले आहे की अंडी खाल्ल्याने हृदयाला कोणतेही नुकसान होत नाही. हृदयरोग्यांसाठी अंडी किती फायदेशीर आहे हे संशोधनात जाणून घेऊया.

ब्लड प्रेशर, ब्लड शुगर आणि हृदयरोगींसाठी अंडे कसे चांगले आहे

जर्नल न्यूट्रिएंट्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अधिक अंडी खाल्ल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी २,३०० हून अधिक प्रौढांच्या डेटाचा अभ्यास केला आणि असा निष्कर्ष काढला की आठवड्यातून पाच किंवा अधिक अंडी खाणे हे उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणाशी संबंधित आहे. याचे सेवन केल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. संशोधनानुसार, अंडी खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.

निरोगी हृदयासाठी किती अंडी आवश्यक आहेत

सध्या, अमेरिकन हार्ट असोसिएशन हृदयासाठी निरोगी आहाराचा भाग म्हणून अंड्याचा पांढरा खाण्याव्यतिरिक्त दररोज एक किंवा दोन संपूर्ण अंडी खाण्याची शिफारस करते. अंडी हे प्रथिने आणि इतर पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत असताना, ते कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यास देखील ओळखले जातात, जे हृदयासाठी चांगले नसू शकतात.

फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट, ओखला, नवी दिल्ली येथील इलेक्ट्रोफिजियोलॉजी आणि कार्डियाक पेसिंगच्या संचालक डॉ. अपर्णा जसवाल यांनी सांगितले की एक अंड्यातून सुमारे सहा ग्रॅम प्रथिने मिळतात. याचा अर्थ असा की जर तुमचे वजन ६० किलो असेल तर तुम्हाला ४०-६० ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. डॉक्टर जसवाल यांनी indianexpress.com यांना सांगितले की, अंड्याचा पांढरा खाण्याव्यतिरिक्त तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा अंड्यातील पिवळ बलक देखील खाऊ शकता.

( हे ही वाचा: ब्लेडच्या मध्यभागी रिकामी जागा का असते? यामागचे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल)

अंड्याचे पोषक घटक:

पोषणतज्ञ आणि न्यूट्रेसी लाइफस्टाइलच्या संस्थापक डॉ. रोहिणी पाटील यांनी यापूर्वी indianexpress.com ला सांगितले होते की अंड्यांमध्ये इतर पोषक घटक देखील असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • व्हिटॅमिन ए – ६%
  • व्हिटॅमिन बी5 – ७%
  • व्हिटॅमिन बी12 – ९%
  • फॉस्फरस – ९%
  • व्हिटॅमिन बी2 – १५%
  • सेलेनियम – २२%

डॉ. पाटील यांनी indianexpress.com यांना सांगितले, “हेच कारण आहे की सकाळच्या नाश्त्यात अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अंड्यांमध्ये रक्तदाब नियंत्रित करणारे गुणधर्म देखील असतात.