Heart Attack: गेल्या काही वर्षांमध्ये हृदयाशी संबंधित आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. खराब जीवनशैली, चुकीचा आहार अशा काही गोष्टींचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. बदलत्या राहणीमानामुळे हा विकार बळावतो असे म्हटले जाते. सध्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वय झालेल्या वृद्धांपर्यंत कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आधी फक्त वयस्कर मंडळींना याचा त्रास व्हायचा. आता मात्र याला वयाचे बंधन राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे. वयवर्ष २२ ते ४० यांमधील लोक या आजारांने प्रभावित आहेत. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेच मदत मिळणे आवश्यक असते. पण जर समजा तुम्ही बाहेर किंवा घरामध्ये एकटे आहात आणि तेव्हा तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला, तर…? अशा वेळी कोणाची मदत न मिळाल्यास जीव जाऊ शकतो. ही स्थिती उद्भवू नये यासाठी काय करावे याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

हृदयविकाराचा झटका येत असल्याची लक्षणे ओळखा.

शरीरामध्ये त्यातही छातीमध्ये दुखत असल्यास, अस्वस्थ वाटत असल्यास लगेच डॉक्टरांकडे जावे. छाती जड होणे, जळजळ होणे, छातीभोवतीचा भाग जड होणे ही हृदयविकाराचा झटका येण्याची प्राथमिक लक्षणे आहेत असे म्हटले जाते. जर तुम्हाला मळमळत असेल आणि हृदयाचे ठोके वाढले आहेत असे लक्षात येत असेल, तर लगेच मदत घेण्याचा प्रयत्न करावा.

आणखी वाचा – ७२ टक्के भारतीय आनंदी असताना करतात ही चूक, काय सांगतो अहवाल जाणून घ्या

इतरांची मदत घ्यावी/ रुग्णवाहिकेला फोन करावा.

जर तुम्ही एकटे असाल आणि हृदयविकाराचा झटका आला आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर आजूबाजूला असलेल्या लोकांची मदत घ्या. मित्र-नातेवाईक जे तुमच्या जवळचे आहात, अशा लोकांना फोन करा. अशा वेळी रुग्णवाहिकेला फोन करणे योग्य ठरु शकते.

जीभेखाली Aspirin टॅब्लेट गोळी धरावी.

हृदयविकाराचा झटका आल्यास Aspirin tablet 300 mg, Clopidogrel 300 mg किंवा Atorvastatin 80 mg यांपैकी जी गोळी मिळेल ती जीभेखाली ठेवावी. असे केल्याने धमण्यांमध्ये रक्त गोठण्यास प्रतिबंध होतो आणि रक्ताभिसरणाची प्रक्रिया पुर्वपदावर येण्यास मदत होते. हृदयविकाराचा झटका येण्याआधी हा उपाय केल्याने जीव वाचू शकतो. रक्तदाबाशी संबंधित समस्यांनी पीडित असलेल्या व्यक्तींनी हा उपाय करणे टाळावे.

आणखी वाचा –

जमिनीवर झोपून पायांखाली उशी ठेवावी.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर घाबरल्याने त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा वेळी स्थिर राहण्यासाठी जमिनीवर स्वस्थपणे झोपून जावे आणि पायांच्या खाली उशी ठेवावी. असे करत असताना हळूहळू श्वास घ्यावा. उघडलेली खिडकी, पंखा, एसी यांच्यासमोर झोपणे अधिक फायदेशीर ठरु शकते. हा उपाय केल्याने हृदयापर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचेल.