Farah Khan Weight Loss Strategy: बॉलिवूडमधील अभिनेते, डायरेक्टर, कोरिओग्राफर यांच्या गाड्यांपासून ते त्यांच्या ड्रेसिंग स्टाईलपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा सुरु असते. तर आज बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध डायरेक्टर आणि कोरिओग्राफर पैकी एक फराह खानची चर्चा होताना दिसते आहे. अलीकडेच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया या जोड्याबरोबर झालेल्या फूड ब्लॉगमध्ये फराह खानने तिच्या वजन कमी करण्याबद्दल सांगितले.
तर फराह खानला खाण्याची आवड असूनही, तिने दिवसातून फक्त दोनदाच म्हणजे दुपारी आणि रात्रीचे जेवण्याचा निर्णय घेतला . तेही संध्याकाळी ७.३० पूर्वी. म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे ठराविक वेळेत घेतला जाणारा आहार. फराह खान ही मेथड बऱ्याच वर्षांपासून फॉलो करत आहे. डान्स रिॲलिटी शो ‘झलक दिखला जा सीझन ११’ च्या आधी फराह खानचे वजन कमी झाले होते ; असे तिने सांगितले आहे.
पण वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग हा उपाय बेस्ट आहे का?
या प्रश्नाचे उत्तर शोधून काढण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटल (आर) येथील मिनिमल ॲक्सेस, जीआय आणि बॅरिएट्रिक सर्जरीचे संचालक डॉक्टर सुखविंदर सिंग सग्गु यांच्याशी चर्चा केली. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यान एका विशिष्ट वेळेत जेवण करणे म्हणजे इंटरमिटंट फास्टिंगचा होय. तर इंटरमिटंट फास्टिंग चरबी कमी करण्यासाठी पुरेसा मानला जातो. हा काळ आपल्या पाचक एंझाइम्स, इन्सुलिन आणि इतर चयापचय प्रक्रिया सर्वात जास्त सक्रिय (ऍक्टिव्ह) असतात त्या कालावधीशी जुळतो. रात्री उशिरा जेवण्याच्या तुलनेत या कालावधीत खाल्ल्याने चांगले पचन, उच्च चयापचय आणि निरोगी आतड्यांचे सूक्ष्मजीव वाढतात. तसेच रात्रीचे जेवण झोपेच्या २-३ तास आधी करावे. यात जास्त जेवण आणि सूर्यास्तापूर्वी लवकर जेवणयांचं समावेश असू शकतो; असे डॉक्टर सुखविंदर सिंग सग्गु म्हणतात.
इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे –
१. चयापचय आणि पचन सुधारते.
२. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते.
३. कोलेस्ट्रॉल पातळी, उच्च एचडीएल (चांगले) आणि कमी एलडीएल (वाईट) कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवते.
तसेच हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, शरीराचे किंवा बॉडीचे सर्केडियन रिदम केवळ पचनक्रियाच नव्हे तर रक्तदाब, हृदय गती आणि इतर महत्वाच्या कार्यांवर देखील नियंत्रण ठेवते. चुकीच्या वेळी, विशेषतः रात्री उशिरा, जेवल्याने या प्रक्रियांमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात ; असे फराह खानने सांगितले आहे.
संध्याकाळी लवकर जेवल्याने तुमच्या खाण्याच्या पद्धती शरीराच्या नैसर्गिक चक्रांशी जुळतात, ज्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि चयापचय सिंड्रोमचा धोका कमी होतो. तसेच रात्री ८ वाजण्यापूर्वी जेवण्याचे इतर महत्त्वाचे फायदे म्हणजे पचन सुधारणे, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि वजनावर चांगले नियंत्रण, चयापचय वाढवणे असा फायदा होता. माइंडफुल इटिंगमुळे व्यक्तींना त्यांच्या जेवणाची चव चाखण्यास, शरीराच्या भूकेच्या संकेतांकडे लक्ष देण्यास, तृप्त होण्यापूर्वी खाणे थांबवण्यास मदत करतात ; ज्यामुळे जास्त खाण्याचा धोका देखील जाणवत नाही. याउलट रात्री उशिरा जेवल्याने पचनाच्या समस्या आणि कालांतराने वजन वाढू शकते.