टाइप 2 डायबिटीज हा सध्याच्या काळातील धोकादायक आजारांपैकी एक आहे, ज्यामुळे इतर अनेक आजार उद्भवण्याचा धोका वाढतो. या आजाराची सर्वात भयंकर बाब म्हणजे तो आजार झाल्याची सुरुवातीची लक्षणे आढळून येत नाहीत आणि जेव्हा त्याची लक्षणे समजतात तोपर्यंत तो आजार नियंत्रणाबाहेर गेलेला असतो.

मात्र, टाइप 2 डायबिटीजची लक्षणे सुरुवातीलाच ओळखता आली तर तो थांबवता येऊ शकतो आणि त्या आजापासून पुर्णपणे बरेही होऊ शकतो. जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास होत असेल सतत लघवीला जाणे आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी ही या आजाराच्या सुरुवातीची लक्षणे असू शकतात. पण काही लोक म्हणतात की जेवल्यानंतर लघवी केल्याने डायबिटीजचा त्रास होत नाही? लोकांच्या या बोलण्यात किती तथ्य आहे ते तज्ञांकडून जाणून घेऊयात.

हेही वाचा- सतत मोबाईलचा वापर केल्याने डोळे होतात कमजोर; काळजी घेण्याचे उपाय तज्ञांकडून जाणून घ्या

जेवल्यानंतर लघवी केल्याने डायबिटीज होत नाही?

डॉ. मीनाक्षी जैन, डायरेक्टर ऑफ इंटरनल मेडिसिन विभाग, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पटपरगंज, दिल्ली यांनी जनसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, जेवल्यानंतर लघवी केल्याने डायबिटीज होत नाही, ही पूर्णपणे चुकीची संकल्पना आहे. शरीरात इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे डायबिटीज होतो. मात्र, जर तुम्ही जास्त अन्न खाल्ले आणि तुमच्या अन्नानुसार तुमच्या शरीरात इन्सुलिन तयार होत नसेल तर तुम्हाला डायबिटीजचा त्रास होऊ शकतो. जेवल्यानंतर लगेच लघवीला येणे किंवा हालचाल झाली तर डायबिटीजचा धोका टळतो हे शक्य नसल्याचंही डॉक्टर जैन यांनी सांगितलं.

हेही वाचा- शौचावाटे लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ ५ पदार्थ? तज्ज्ञांनी सांगितली डिटॉक्सची पद्धत

मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवता येईल?

डॉ. मीनाक्षी जैन यांनी सांगितले की, डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे. शिवाय अन्नातील साखरेचे प्रमाण कमी करणे, उच्च फायबरयुक्त आहार घेणे आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी केल्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांच्या साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेज अन्नामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवल्यामुळे, एरोबिक व्यायाम केल्याने, जेवल्यानंतर चालल्यामुळे आणि तणावमुक्त राहिल्याने डायबिटीजवर नियंत्रण ठेवता येते.

हेही वाचा- Lung Cancer: ‘या’ कारणांमुळे धूम्रपान न करणाऱ्यांनाही होऊ शकतो फुफ्फुसाचा कर्करोग; कसा ते जाणून घ्या

सतत लघवीला येणे धोक्याचे?

वारंवार लघवी होणे हे डायबिटीज सुरु होण्याचे एक लक्षण आहे. पण जर तुम्ही २४ तासाच ६ ते ७ वेळा लघवी करत असाल तर ती सामान्य बाब आहे. मात्र, यापेक्षा जास्त वेळा लघवी होत असल्यास तुम्ही मधुमेहाची तपासणी करून डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, डायबिटीजसंदर्भातील अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)