Bad Breath Issue: तोंडातून दुर्गंध येणे हे इतरांसमोर तुम्हाला अस्वस्थ करू शकते. तोंडातून वास आल्यास इतरांसमोर जाण्याची इच्छा होत नाही. खुलून हसने देखील कठीण होऊन जाते. तसेच, तोंडाची दुर्गंधी कुठल्या कार्यक्रमात जावे की नाही जावे हा देखील विचार करण्यास भाग पाडू शकते. त्यामुळे वेळीच त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. दात न घातल्यास दुर्गंधी येते हे आपल्याला ठावूक आहे. मात्र दुसऱ्या काही कारणांमुळे देखील तुमच्या तोंडातून वास येऊ शकतो.

तोंडाची दुर्गंधी ही एक अत्यंत कॉमन समस्या आहे. शक्यतो सकाळी झोपेतून उठल्यावर अनेकांना याचा त्रास जाणवतो. तोंडाची दुर्गंधी ही नैसर्गिक असूनही त्याकडे दुर्लक्ष करणे हे अपायकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार तोंडाच्या दुर्गंधीचे मुख्य कारण म्हणजे नीट ब्रश न करणे किंवा स्वच्छतेची काळजी न घेणे. काहीवेळा अपचनामुळे सुद्धा तोंडाच्या अपचनाचा त्रास जाणवू शकतो. ही समस्या काही गंभीर आजारांचे लक्षण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. केवळ तोंडाच्या आरोग्याशीच नव्हे तर मधुमेह, किडनीचे विकार यांच्याशीही तोंडाच्या दुर्गंधीचा संबंध असू शकतो. तोंडाला दुर्गंध का येतो? तोंडाची दुर्गंधी कशाचे लक्षण आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तोंडाच्या दुर्गंधीवर उपाय काय हे जाणून घेऊयात…

तोंडाच्या दुर्गंधीचे कारण काय?

दिल्लीचे प्रख्यात ऑर्थोडॉन्टिस्ट डॉ. आलोक परमार यांच्या माहितीनुसार काही वैद्यकीय कारणांनी सुद्धा तोंडाची दुर्गंधी वाढू शकते. केवळ लहान मुलंच नाही तर अनेक वयस्कर मंडळी आपल्या दातांची स्वच्छता राखण्यात टाळाटाळ करतात. जरी तुम्ही दात स्वच्छ केले तरी त्यासह तुमच्या जिभेची व हिरड्यांची स्वच्छता करणेही महत्त्वाचे असते. दिवसातून दोन वेळा ब्रश न करणे, दातांच्या फटीत फ्लॉस न करणे, जीभ स्वच्छ न करणे यामुळे दातात अन्न व जंतू जमा होऊन तोंडाची दुर्गंधी जाणवू शकते. यातूनच काही आजारांची सुरुवात होऊ शकते…

हिरड्या व दातांचे विकार

डॉ. परमार यांच्या माहितीनुसार, तोंडाची स्वच्छता न राखल्यास बॅक्टरीयाचे संक्रमण वाढू शकते. यातूनच पीरियडोंटल रोग वाढीस लागतात. याशिवाय जेव्हा दातांवर प्लाक जमा होऊ लागतो तेव्हा दातांच्या बाहेरील बाजूची झीज होऊ लागते व परिणामी दात किडण्यास सुरुवात होते. दातांना किड लागल्यास तोंडाचे विकार सुरु होऊ शकतात.

तोंडाची दुर्गंधी ‘या’ आजारांचे आहे लक्षण

  • डॉ. आलोक परमार सांगतात की तोंडाची दुर्गंधी ही गैस्ट्रोओसोफेगल रिफ्लक्स रोगाचे लक्षण मानले जाते. या आजारात पोटात बनणारे ऍसिड हे अन्ननलिकेत पसरू लागते, काहीवेळा हा त्रास अधिक जेवण झाल्यास होऊ शकतो. पण जर तुम्हाला नेहमीच असा त्रास होत असल्यास तो एक गंभीर आजार असू शकतो.
  • याशिवाय तोंडाची दुर्गंधी ही पोटात जंत झाल्याचे सुद्धा लक्षण ठरते. मुख्यतः हेलिकोबैक्टर पाइलोरी संक्रमण ज्यामुळे पोट व छोट्या आतड्यांवर प्रभाव होतो याचा सुरुवातीचा टप्पा तोंडाची दुर्गंधी वाढणे हे असते.
  • तसेच तोंडाची दुर्गंधी हे डायबिजटीज, फुफ्फुसांचा विकार, यकृताचे आजार यांचे लक्षण असू शकते. जसे हे आजार आणखी गंभीर होऊ लागतात तशी तोंडाच्या दुर्गंधीची समस्याही वाढू लागते.

हे ही वाचा<< World Aids Day 2022: शरीरात HIV संक्रमण होताच दिसू लागतात ‘हे’ बदल; AIDS ची लक्षणे घरीच ओळखा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तोंडाच्या दुर्गंधीवर उपाय

  • लवंगाच्या वापरानेही तोंडाचा वास दूर केला जाऊ शकतो.अशा स्थितीत तुम्ही दिवसातून एक किंवा दोन लवंगा चघळाव्यात.
  • तुळशीच्या पानांच्या सेवनानेही तोंडाचा वास दूर होतो.तुळशीची पाने चांगली धुवून चावून खा.
  • पेरूची पाने चघळल्यानेही तोंडाचा वास दूर होतो.

हे ही वाचा<< बदाम खाल्ल्याने ‘हे’ ४ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात! एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?

  • बडीशेपच्या सेवनाने तोंडाला येणारा वासही थांबतो.तुम्ही बडीशेपसोबत साखरेचे सेवन करू शकता
  • खाल्ल्यावर चुळ भरून तोंड स्वच्छ करा. तुमचा ब्रश निदान चार महिन्यातून एकदा बदला.