आहारात डाळींचं किती महत्त्व आहे हे आपण आधीच्या लेखात समजून घेतलं. या लेखात आपण कडधान्यांची भूमिका समजून घेऊया. किती प्रकारची कडधान्यं आहेत, त्यांचे उपयोग काय, कडधान्यं खाताना काय काळजी घ्यावी हे सगळं लक्षात घेणं आवश्यक आहे.

हिरवे मूग

हलके गोडसर आणि काहीसे तुरट अशी चव असणारे मूग चविष्ट कडधान्य आहे. जीवनसत्त्व अ , ब , लोह, कॅल्शिअम आणि फॉस्फरस तसंच फायबर (तंतुमय पदार्थ) आणि आवश्यक स्निग्धांशांचं उत्तम प्रमाण असणारे मूग पचायला हलके आणि आरोग्यदायी आहेत. मूग डाळीइतकेच अख्खे मूग सुद्धा पोषक असतात. नियमित मुगाची उसळ आहारात असावी. ज्यांना ताप, सर्दी पडसे यासारखे विकार होतात त्यांनी नियमितपणे मुगाचे सेवन करावे.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Is thirst a good predictor of dehydration
तहान लागते म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा…
yoga poses to relieve gas
Health Special: पोटातील गॅसवर योगासनांचा जालीम उपाय; नेमके काय कराल? – भाग २
What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…

कुळीथ

तांबड्या रंगाचे किंवा गडद राखाडी रंग असणारे कुळीथ अनेक घरात वापरले जातात. कुळथाचं पिठलं किंवा कुळथाची डाळ ही शरीरासाठी अत्यंत आरामदायी असते विशेषतः ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी कुळीथ अत्यंत उपयुक्त आहेत. सुकलेला कफ किंवा कोरडा कफ ,दमा अशा विकारांमध्ये देखील कुळथाचा काढा हा अत्यंत उपयोगी पदार्थ आहे. मूळव्याध ,आमवात असेल तर कुळीथ अत्यंत गुणकारी आहेत. उत्तम केस, स्नायूंच्या ताकदीसाठी कुळीथ विशेष उपयुक्त आहेत.

हेही वाचा…Health Special : हिवाळा संपता संपता कडू का खावं? 

काबुली चणे

साधारण ७५०० वर्षांपूर्वीच्या आरोग्यविषयक आणि आहारविषयक साहित्यामध्ये काबुली चण्यांचा समावेश केलेला आढळतो. काबुली चणे वाफवताना त्यात एखादे तमालपत्र आणि १ चमचा तेल किंवा तूप टाकून वाफवावेत. व्यायाम करणारे, धावणारे, सायकलचालक आणि पोहणारे तसेच विविध खेळाडूंसाठी काबुली चणे प्रथिनांचे आणि आवश्यक ऊर्जेचे उत्तम स्रोत आहेत.

हरभरा

चवीला उत्तम, चण्यांचाच एक प्रकार म्हणून हरभरा खाल्ला जातो. हिरवे आणि तांबडे अशा रंगात हरभरा आहारात वापरला जातो. लोह, प्रथिने आणि ऊर्जेने भरपूर असणारा हरभरा पोषक, चविष्ट आणि तितकाच आरोग्यदायी आहेत. आजार बरे होताना हरभऱ्याचा काढा अत्यंत उपयुक्त आहे. कफविकार असणाऱ्यांसाठी देखील हरभऱ्याचा काढा आरोग्यदायी आहे.

चवळी

पांढऱ्या रंगाची चवळी प्रथिने आणि ऊर्जेने भरपूर आहे. काहीशी पिठूळ आणि पचायला जड असणारी चवळी ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे.

हेही वाचा…Health Special : फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम काय असतो? त्याने आपल्या एकाग्रतेवर कसा परिणाम होतो? 

पावटे किंवा वाल

वाल किंवा पावटे, हिरवे वाल , कडवेवाल असे वालाचे अनेक प्रकार आहेत. हिरव्या शेंगांतील वाल सगळ्यात पौष्टिक मानले जातात.

ज्यांचा मेटाबॉलिझम चांगला आहे त्यांच्यासाठी अत्यंत चांगले कडधान्य आहे. वाल पचायला जड आहेत त्यामुळे त्याच्याबरोबर जिरेपूड, लसूण वापरणं आवश्यक आहे.

हे झालं कडधान्यांबद्दल पण कडधान्य खाताना विशेष काळजी घ्यावी लागते.

कडधान्यं भिजवणे /मोड येणे

कडधान्ये पाण्यात भिजवल्याने त्यातील फायटेट नावाचा अन्न घटक ज्यामुळे कडधान्ये पचण्यासाठी जड ठरतात त्यांचे प्रमाण कमी होते. साधारण ४८ ते ७२ तासांनी कडधान्यांना मोड येतात. मोड आल्यानंतर कडधान्यांतील प्रथिने, फायबर आणि आवश्यक स्निग्धांशाचे प्रमाण वाढते. ते पचायला हलके होतात.

हीच कडधान्यं जर नीट शिजवून आहारात समाविष्ट केली नाही तर मात्र गॅसेस होणे, पोट फुगणे अपचन होणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात.

हेही वाचा…Health Special : पेन बिहेवियर म्हणजे काय?

कडधान्यांचा चिला /पोळा

कडधान्ये किंवा डाळी मध्यम आचेवर भाजून त्याचे पीठ तयार करू वापरल्यास चिला आणि पोळा यासारखे पौष्टिक पदार्थ नेहमीच्या आहारात वापरले जाऊ शकतात. कडधान्यांपासून पोळा किंवा चिला तयार करताना त्यात जिरेपूड, धणेपूड आणि भरपूर भाज्या समाविष्ट कराव्यात.

कडधान्यांचे पाणी

अनेकजण कडधान्ये उकडल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकतात. या पाण्यात अनेक जीवनसत्त्वं आणि प्रथिने असतात. त्यामुळे कडधान्ये शिजवल्यानंतर त्यातील पाणी उसळ तयार करताना जरूर वापरावेत.