आजच्या लेखात आपण पुन्हा एकदा वेदनेकडे वळलो आहोत, गेली पाच वर्ष अनेक स्नायू आणि हाडांच्या वेदनांच्या रुग्णांशी संवाद साधताना आणि उपचार करताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की रुग्ण त्यांच्या वेदना व्यक्त करताना एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात ती म्हणजे त्या वेदनेची तीव्रता! साहजिकच त्यांच्यासाठी वेदनेची तीव्रता हा सगळ्यात त्रास देणारा भाग असतो. पण या वेदनेला इतर अनेक कंगोरे असतात ज्याबद्दल असायला हवी तितकी जागरूकता रुग्णांमध्ये आजही नाही. बहुतेकवेळा औषध घेऊन वेदना तात्पुरती बंद करणे या संकल्पनेभोवती फिरणार्‍या बायोमेडिकल मॉडेलचा हा परिणाम असावा. आपल्या शरीरात असणारी वेदना सजगपणे अनुभवणे, आणि वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि दैनंदिन घटकांमुळे ती कशी प्रभावित होते ही प्रक्रिया समजून घेणं हे रूग्णांच्या दृष्टीने अतिशय फायद्याचं ठरू शकतं. हे घटक आपल्या वेदनेला प्रभावित करू शकतात हे रुग्णांना कळलं की ते वेदनेकडे अधिक सजग रीतीने बघू शकतात, आपल्या वेदनेची तीव्रता कमी करण्याचा सर्वोत्तम उपाय आपल्यालाच माहिती आहे ही भावना त्यांना सशक्त करते आणि त्यांचं परावलंबित्व कमी करते.

कोणत्याही वेदनेची तीव्रता हा एक पैलू आहे, पण यासारखेच वेदनेचे अनेक पैलू असतात यांना एकत्रितपणे ‘पेन बिहेवियर’ असं म्हणतात. आपण जेव्हा एखाद्या वेदनेच्या उपचारांसाठी डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपण त्यांना हे ‘पेन बिहेवियर’ व्यवस्थित सांगितलं तर ते आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतात शिवाय आपल्या स्वतःला आपल्या वेदनेचे सूक्ष्म कंगोरे लक्षात येऊन आपण स्वतःच ती अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकतो…जेव्हा आपण आपल्या शरीरात एखादी वेदना अनुभवतो तेव्हा त्या वेदनेचं खाली दिलेल्या निकषांवर निरीक्षण करा..

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
environment issue in election manifestos environmental issues in lok sabha election 2024
या रणधुमाळीत पर्यावरणाबद्दल प्रश्न विचारा..
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

हेही वाचा : तापमानातील चढ-उतारामुळे आरोग्याला धोका! आरोग्यतज्ज्ञ सांगताहेत कशी काळजी घ्यावी…

वेदनेची तीव्रता

ही तीव्रता खूपच, खूप जास्त, सहन होण्यासारखं किंवा न सहन होण्यासारखं या शाब्दिक कक्षेत बसवण्यापेक्षा त्याला सरळ सरळ १००% पैकी मार्क द्या, साहजिकच आकडा १००% च्या जितका जवळ असेल तितकी वेदनेची तीव्रता अधिक असेल. यात अजून एक पैलू म्हणजे विशिष्ट काम करताना वेदना अधिक तीव्र होईल किंवा कमी होईल त्यामुळे अॅट रेस्ट वेदनेची तीव्रता १००% पैकी किती आणि विशिष्ट काम करताना किती हे तुम्ही अगदी सहज डॉक्टराना सांगू शकाल.

२४ तासांमधले बदल

आपल्याला जाणवणारी वेदना दिवसातल्या कोणत्या वेळी सर्वाधिक आहे आणि कोणत्या वेळी सगळ्यात कमी आहे याचं निरीक्षण करा, काही वेळा दिवसातल्या कोणत्याच वेळेचा वेदनेवर काहीही परिणाम होणार नाही तस असल्यास ते ही डॉक्टरांना सांगा. काही वेदना या तापमानातील बदलामुळे देखील प्रभावित होतात, वाढलेल्या किंवा कमी झालेल्या तापमानाचा आपल्या वेदनेवर प्रभाव होतोय का याचं निरीक्षण करा.

हेही वाचा : दुसऱ्यांदा ह्रदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काय काळजी घ्याल? कोणत्या चाचण्या कराल? वाचा डॉक्टरांचा सल्ला

वेदनेची क्वालिटी

आपल्याला जाणवणार्‍या वेदना या नक्की कशा जाणवतात याचं निरीक्षण करा. जळजळणे, टोचणे, आग होणे, ठसठसणे, कळ येणे, ओढणे, वात येणे, गोळा येणे, चमक निघणे, आखडणे यापैकी आपली वेदना कोणत्या प्रकारात मोडते याचं निरीक्षण करा. तसंच वेदना ही खोलवर जाणवते आहे की वर वर जाणवते आहे याचं निरीक्षण करा. मुंग्या येणं, एखादा भाग सुन्न पडणं हे वेदनेचे प्रकार नसून स्वतंत्र संवेदना आहेत त्यांची वेदनेच्या संवेदनेशी गल्लत करू नका.

अॅक्टिविटी

दैनंदिन आयुष्यातल्या कोणत्या क्रिया करताना वेदना वाढते, कोणत्या शारीरिक स्थितीमध्ये वेदना सर्वाधिक जाणवते याचं निरीक्षण करा, उदाहरणार्थ पायर्‍या चढताना गुडघे दुखतात पण उतरताना तितका त्रास होत नाही, खूप वेळ बसल्यावर उठताना त्रास होतो, खूप वेळ उभं राहिलं की कंबर दुखते इत्यादी.

हेही वाचा : तुम्हाला चहा-कॉफीचे व्यसन आहे का? शरीरावर होणारे वाईट परिणाम, जाणून घ्या 

सामाजिक, भावनिक आणि मानसिक पैलू

कोणत्या भावना आपली वेदना वाढवतात किंवा कमी करतात याचं निरीक्षण करा. उदाहरणार्थ ताण, दुःख, आनंद, राग यामध्ये आपली वेदना वाढते, कमी होते किंवा काहीच बदल होत नाही याचं निरीक्षण करा. आजूबाजूला घडणार्‍य घटना बघून, ऐकून आपली वेदना कशी बदलते याकडे लक्ष द्या, आपला यश, अपयश, कामाचा ताण, नातेसंबंध या गोष्टींचा वेदनेशी दुहेरी संबंध असतो तो प्रत्येक व्यक्तीगणिक वेगळा असतो त्याचं खोलवर निरीक्षण करा.

वर दिलेल्या गोष्टी आपण सजगतेने अनुभवल्या आणि डॉक्टरांना सांगितल्या तर त्यांना आणि आपल्यालाही वेदनेचं प्रभावी व्ययस्थापन करता येणार आहे!