जगात सर्वाधिक मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात, तसं पाहायला गेलं तर सर्व प्रकारचे कर्करोग हे धोकादायकच मानले जातात. मात्र, त्या कर्करोगांच्या तुलनेक फुफ्फुसाचा कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. फुफ्फुसाचा कर्करोग हा ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कर्करोगानंतरचा तिसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. तंबाखूचा धूर हे या कर्करोगाचे प्रमुख कारण मानले जाते. धूम्रपान करणार्‍यांची संख्या जशी कमी झाली आहे, तसं फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रकरणेही कमी झाली आहेत.

फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही हा कर्करोग वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तंबाखू किंवा धुम्रपानाशिवाय असे अनेक घटक आहेत, जे फुफ्फुसांवर परिणाम करतात ज्यामुळे कर्करोग होतो. धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुफ्फुसाचा कर्करोग का होतो, तो होण्यामागची नेमकी कराणं काय आहेत ते आपणल जाणून घेऊया. धुम्रपान न करता फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची कारणे पुढीलप्रमाणे –

हेही वाचा- तुम्हालाही वारंवार लघवी होते का? तर हाय सोडियम बनवतंय तुमच्या रक्तामध्ये पाणी, लगेच करा ‘या’ पदार्थांचे सेवन

धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कात येणे –

असे अनेक लोक आहेत जे धूम्रपान करत नाहीत, परंतु धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या संपर्कात येतात. जर एखादा व्यक्ती तुमच्याशेजारी उभा राहून धूम्रपान करत असेल आणि जाणूनबुजून किंवा नकळत ते पित असलेल्या सिगारेटचा धूर श्वासातून तुमच्या शरीरात गेला तरीही फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.

वायू प्रदूषण –

हेही वाचा- रोज सकाळी ‘या’ वनस्पतींची पाने खाल्ल्याने रक्तातील साखर राहील नियंत्रणात? सेवनाची पद्धत जाणून घ्या

भारतात फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे मुख्य कारण म्हणजे वायु प्रदूषण. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) वायुप्रदूषणामुळे दरवर्षी १८ दशलक्ष लोक फुफ्फुसाचा कर्करोग होऊन मरण पावतात. वायू प्रदूषण फुफ्फुसाच्या कर्करोगासह आरोग्य संबंधित अनेक समस्यांना कारणूभूत ठरते. २०२० मध्ये द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, २०१९ मध्ये भारतात वायू प्रदूषणामुळे तब्बल १७ लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

आनुवंशिकता –

जनुक उत्परिवर्तनामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. ज्या कुटुंबात फुफ्फुसाच्या कर्करोगाची अनेक प्रकरणे आढळतात त्या कुटुंबांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो.

रेडिएशन एक्सपोजर –

रेडिएशन एक्सपोजरमुळे फुफ्फुसांच्या पेशींमधील डीएनएला हाणी पोहचवू शकतात. तसंच अणुउद्योगात काम करणाऱ्या लोकांसारख्या उच्च पातळीच्या आयनीकरण किरणोत्सर्गाच्या संपर्कात आलेल्या लोकांनादेखील फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, कर्करोगाशी संबंधित अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)