how much sleep do you need to control cholesterol and diabetes: “लवकर नीजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य-धनसंपदा लाभे”, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. म्हणजेच जे लोक रात्री लवकर झोपतात व सकाळी लवकर उठतात, त्यांना चांगले आरोग्य आणि संपत्ती मिळते. झोप तुमच्या दैनंदिन दिनक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. योग्य वेळी पुरेशी झोप मिळणे अन्न आणि पाण्याइतकीच जगण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या आरोग्यासाठी झोप किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण, जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रित ठेवायचं असेल तर तुम्हाला किती तासाची झोप घ्यायला हवी, माहिती आहे का? याविषयीचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे, त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

खरंतर कामाचे तास, वाढत्या ताणतणावाची पातळी आणि अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे झोपेच्या अनियमित पद्धती उद्भवू शकतात. यामुळे केवळ तुमच्या दैनंदिन दिनचर्येतच व्यत्यय येतो असे नाही, तर तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो; ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहसारख्या जीवनशैलीच्या परिस्थिती उद्भवू शकतात. झोपेच्या कमतरतेमुळे उच्च कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढू शकतो.

झोप आपल्या शरीराला आणि मनाला ताजेतवाने करण्यास मदत करते. झोपेच्या वेळी मेलाटोनिन नावाचे संप्रेरक शरीराला आराम देते, ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके कमी होतात. निद्रानाशामुळे तुमचे शरीर असामान्यपणे कार्य करू शकते. पुढील दिवशी तुमच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. हे तुमच्या मेंदूला थकवते, ज्यामुळे शरीराच्या नैसर्गिक कार्यावर परिणाम होतो.

२००९ च्या “झोपेची समस्या” नावाच्या एका अभ्यासात असे आढळून आले की, सहा तासांपेक्षा कमी झोपलेल्या पुरुषांमध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉल जास्त होते. याव्यतिरिक्त, जवळजवळ समान प्रमाणात झोपलेल्या महिलांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. आता या अभ्यासावरून हे स्पष्ट होते की, झोपेचा पुरुष आणि महिलांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो.

लठ्ठ लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते यात शंका नाही. तसेच २०२० मध्ये, इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी कॉग्निटिव्ह अँड ब्रेन सायन्सेस, अकादमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्स, बीजिंग यांच्या संशोधनातून असे दिसून आले की, झोपेच्या कमतरतेमुळे सीरम कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि यकृतामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या मते, झोपेच्या अनियमित पद्धतीमुळे शरीराची इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढू शकते. डायबिटीज केअरमधील २००९ च्या अहवालात असे आढळून आले की, वारंवार निद्रानाश असलेल्या लोकांना टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकन अकादमी ऑफ स्लीप मेडिसिन आणि स्लीप रिसर्च सोसायटीने शिफारस केली आहे की, प्रौढांनी दररोज किमान सात ते आठ तास झोपावे. रात्री उशिरापर्यंत जागे राहणे म्हणजे अधिक फोन, टिव्ही पाहणे आणि खाणे, यामुळे बर्‍याचदा कार्ब आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले जंक फूड खाल्ले जातात. हे सर्व टाइप २ मधुमेहाचा धोका आणि लठ्ठपणा वाढवते.