How Many Calories do Astronauts Need in Space: नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघे नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज (१९ मार्च) पृथ्वीवर परतले आहेत. अवघ्या ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर गेलेले विल्यम्स व विल्मोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले होते. तब्बल २८६ दिवसांनंतर ते पृथ्वीवर परतले आहेत. नऊ महिने पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षणाशिवाय राहिल्यामुळे त्या काही दिवस पृथ्वीवर आधाराशिवाय उभ्या देखील राहू शकणार नाहीत. अंतराळामध्ये असताना गुरुत्वकर्षामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि अंतराळामध्ये तंदरुस्त राहण्याते ते काय करतात याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

गुरूत्वाकर्षणाचा अंतराळवीरांच्या शरीरावर कसा होतो परिणाम? (How does gravity affect astronauts’ bodies?)

जसे पृथ्वीवर, जेथे उष्मांक कमी झाल्यामुळे शरीराच्या वजनावर परिणाम होतो, अंतराळातही असेच घडते. सूक्ष्म गुरूत्वाकर्षण किंवा फारच कमी गुरुत्वाकर्षणामुळे हा परिणाम वाढतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. “सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे शरीराची हाडे आणि स्नायू द्रव्यमान राखण्याची क्षमता बाधित होते. जलद उष्मांक कमी होणे आणि प्रथिनांची कमतरता आणि पौष्टिकतेची कमतरता, ज्यामुळे अंतराळात दीर्घकाळ राहिल्यास द्रव आणि इलेक्ट्रोलाइट संतुलनात बदल होऊ शकतो, ” असे झांड्रा हेल्थकेअरचे डायबेटोलॉजीचे प्रमुख आणि रंग दे नीलाचे सह-संस्थापक डॉ. राजीव कोविल यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “अंतराळात राहिल्यामुळे अंतराळवीरांच्या कॅलरीज लवकर वापरल्या जातात आणि दीर्घकाळ राहिल्याने काही महत्त्वपूर्ण पोषक घटक गमावतात. पृथ्वीवर गुरूत्वाकर्षण हे आपले स्नायू आणि हाडांचे आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. गुरूत्वाकर्षण आपल्याला नेहमी खाली खेचते आणि आपल्या न कळत आपले स्नायू आणि हाडे मजबूत ठेवते. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे अंतराळात शरीराला अधिक मेहनत करावी लागते, ज्यामध्ये अधिक ऊर्जा आणि पोषक तत्वांचा वापर होतो,” असे डॉ. कोविल यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….

अंतराळवीरांना अंतराळात उत्साही अन् तंदुरुस्त राहण्यासाठी काय करावे लागते? (What do astronauts need to do to stay motivated and fit in space?)

डॉ. कोविल यांच्या मते, “अंतराळातील मजबूत गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे अंतराळवीरांच्या हाडे आणि स्नायूंना अपुरा व्यायाम होतो, परिणामी ते कमकुवत होतात. याचा मुकाबला करण्यासाठी, अंतराळवीरांनी दोन-तीन तासांच्या कठोर दैनंदिन व्यायामात गुंतले पाहिजे. म्हणूनच अंतराळवीरांच्या शरीरात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी असू शकतात, जे निरोगी राहण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.”

“तसेच या बदलांमुळे अंतराळवीरांचे शरीर महत्त्वाचे द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्समधील संतुलन गमावू शकते, म्हणूनच अंतराळातील लांबच्या प्रवासात शक्य तितके निरोगी राहण्यासाठी त्यांनी कठोर आहार आणि व्यायामाची दिनचर्या पाळणे आवश्यक आहे,” असे डॉ. कोविल म्हणाले.

हेही वाचा –सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा

अंतराळवीराला किती कॅलरीज आवश्यक आहेत?

डॉ. कोविल यांनी शेअर केले की, “अंतराळवीरांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सुमारे ४,००० कॅलरीजची आवश्यकता असते. पृथ्वीवर तुम्हाला जेवढी गरज असते त्यापेक्षा हे सहसा दुप्पट असते.”

हैदराबादचे एलबीनगर, ग्लेनेगल अवेअर हॉस्पिटल, डॉ. बिराली स्वेथा, मुख्य आहारतज्ज्ञ म्हणाले, “सामान्यतः पुरुष अंतराळवीरांना दररोज सुमारे
२७००-३७०० कॅलरीजची आवश्यकता असते, तर महिला अंतराळवीरांना सुमारे २,०००-२,७०० कॅलरीजची आवश्यकता असू शकते. या गरजा शरीराचा आकार, मिशन ॲक्टिव्हिटी आणि वैयक्तिक चयापचय (metabolism) यावर आधारित बदलतात, परंतु ते सामान्यतः सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणामुळे पृथ्वी-आधारित कॅलरी (Earth-based calorie) आवश्यकतांपेक्षा जास्त आहेत, ज्यामुळे शरीरावर ऊर्जेची मागणी वाढते,” असे डॉ. बिराली म्हणाले.