Sweet Potatoes And Fat Source: रताळ्याचा अनेक पद्धतींनी आहारात समावेश केला जाऊ शकतो. मग तो नाश्ता असो किंवा दुपारचे अथवा रात्रीचे जेवण असो; हे कंदमूळ केवळ स्वादिष्टच नाही, तर ते अनेक आरोग्यदायी फायद्यांनीही परिपूर्ण आहे. पण त्याचे फायदे मिळवण्यासाठी, ते योग्य पद्धतीने खाणेही तितकेच आवश्यक आहे. पोषणतज्ज्ञ मोहिता मस्कारेन्हास यांच्या मते, रताळे हे बीटा-कॅरोटीन (व्हिटॅमिन ए)च्या सर्वांत जास्त स्रोतांपैकी एक आहे, हे मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्त्व आहे. पौष्टिक फायदे वाढवण्यासाठी ते मेदाच्या स्रोतासह जोडले पाहिजेत.
“रताळ्याचा पदार्थ बनविताना त्यात नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑइल, तूप किंवा बटर अशा थोड्याशा मेदाचा वापर केल्यास बीटा कॅरोटीनचे शोषण वाढते, जे रोगांशी लढण्यास मदत करते आणि मेंदूचे कार्य, रोगप्रतिकार शक्ती, निरोगी दृष्टी, त्वचा व केस वाढवते,” असे मोहिता मस्कारेनहास यांनी इन्स्टाग्रामवरील एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए देखील भरपूर प्रमाणात असते, जे रेटिनॉल किंवा रेटिनॉइड्समध्ये आढळते – चमकदार त्वचा, बारीक रेषा व सुरकुत्या यांवरचा उपाय म्हणून मोहिता मस्कारेनहास याची शिफारस करतात. त्या म्हणतात, “या व्हिटॅमिनने समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला आतून अतिरिक्त फायदे मिळतील,” म्हणाल्या.
आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉम’ला सांगितले, “हे कंदमूळ बीटा कॅरोटीन (व्हिटॅमिन ए)चा समृद्ध स्रोत आहे, जे चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्त्व आहे. हे बीटा कॅरोटीन मेदाच्या स्रोताच्या मदतीने शरीरात व्हिटॅमिन एमध्ये रूपांतरित होते, जे निरोगी त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे आणि त्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत.”
ते मेदासह जोडल्याने कशी मदत होते?
मेदयुक्त पदार्थांसह शिजवल्यास या जीवनसत्त्वाचे शोषण वाढते, असे अन्न प्रशिक्षक व पोषणतज्ज्ञ अनुपमा मेनन म्हणाल्या. “लोणी, तूप किंवा अगदी ऑलिव्ह ऑइल यासारखे चांगले तेल वापरा. कारण- वनस्पती तेलांच्या तुलनेत हे शरीरासाठी उत्तम आहेत”, असे मेनन म्हणाले.
शरीरात त्याचे चयापचय कसे होते?
मस्करेन्हास सांगतात, रताळ्यांमधील आहारातील फायबर निरोगी आतड्यांतील सूक्ष्मजीवांना प्रोत्साहन देते. अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, मुंबई येथील आहारतज्ज्ञ डॉ. जिनल पटेल यांनी सांगितले की, आतड्यांच्या हालचाली नियंत्रित करता आल्यामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते; तर मेदयुक्त स्रोतासह रताळे रोगप्रतिकार शक्तीसह हाडांचे आरोग्य सुधारण्यास, लैंगिक संप्रेरकांची निर्मिती वाढविण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास, तसेच निरोगी मज्जातंतूंचे कार्य राखण्यास मदत करतात.
“तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये नेहमीच्या बटाट्यांपेक्षा रताळ्याला समाविष्ट करू शकता. पण, रताळे असलेले पदार्थ बनवताना नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा बटर घालण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत जाणून घ्या,” डॉ. पटेल म्हणाले.
मेनन म्हणाले, “उत्तर भारतात प्रसिद्ध असलेल्या पारंपरिक चॅट फॉर्ममध्ये तुम्ही ते खाऊ शकता किंवा पॅनमध्ये परतल्यानंतर त्यावर थोडेसे बटर लावू शकता किंवा ओव्हनमध्ये घालून शिजवू शकता.”