डॉ. अश्विन सावंत

Health Special : आयुर्वेदाने हेमंत व शिशीर या उभय शीत ऋतुंमध्ये उडीद म्हणजे माष खाण्याचा आणि दुसरीकडे उडदाच्या पिठापासून तयर केलेले खाद्यपदार्थ खाण्याचाही सल्ला दिलेला आहे. याचा अर्थ उडदाच्या पीठापासून तयार केलेले खाद्यपदार्थ थंडीमध्ये खाणे अगदी योग्य ठरेल. जाणून घेऊया उडदाच्या पीठापासून तयार केले जाणारे काही खाद्यपदार्थ.

spring season marathi news, spring season health tips marathi
Health Special: वसंत ऋतू आल्हाददायी, तरीही आरोग्यासाठी काळजीचा; असे का?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज
simple watermelon doddak pancake recipe
Recipe : कलिंगडाच्या सालींपासून बनवा ‘हा’ स्वादिष्ट पदार्थ! मुलांच्या नाश्त्यासाठी एकदम मस्त

माषादी उत्कारिका-

१)उडीद, तीळ, साठेसाळीचे तांदूळ व विदारीकंद यांचे चूर्ण समप्रमाणात घेऊन उसाच्या रसात भिजवावे. त्यामध्ये एक भाग सैंधव,वराहमेद( डुकराची चरबी) व तूप घालून एकत्र कणकेप्रमाणे मळून त्याची रोटी (उत्कारीका) करावी
२)गव्हाचे पीठ तुपामध्ये भाजून घ्यावे व त्यामध्ये उडीद, वंशलोचन, साखर व दूध एकत्र करुन त्याची कणीक मळावी व पोळी पद्धतीनेच उत्कारिका करावी आणि मांसरसासह खावी.

गुण – बलवर्धक व वाजीकर (वीर्यवर्धक व कामशक्तीवर्धक). कृश व्यक्तीसाठी बल व वजन वाढवण्यास उपयुक्त. हिवाळ्यात खाण्यायोग्य.

माषरोटिका –

उडदाची डाळ पाण्यात भिजवून नंतर त्यावरील साल कढून उन्हात वाळवून त्याचे बारीक पीठ करावे. त्या पीठामध्ये पाणी घालून कणीक मळावी आणि त्या कणकेपासून भाकरी करावी व तव्यावर भाजावी. या पद्धतीने तयार केलेल्या बलभद्रिका, गर्गरी, वेटवी व झर्झरी या उडदापासून तयार होणार्‍या भाकरीचे उल्लेख शास्त्रामध्ये आहेत.

आणखी वाचा-Health Special : हिवाळा संपता संपता कडू का खावं? 

गुण – उडदाच्या डाळीपासून तयार केलेले वरील सर्व खाद्यप्रकार हे पचायला अतिशय जड, उष्ण, बलवर्धक, वाजीकर, स्तन्यवर्धक, पौष्टिक, मांस व मेदवर्धक आणि वातनाशक असल्याने वात विकारांवर उपयोगी; मात्र कफ व पित्त वाढवणारे आहेत.

टीप – उडदाची डाळ घेऊन तयार केलेली भाकरी ही अतिशय कडक व खूप चिकट होते. त्याचसाठी उडदाच्या पीठामध्ये तांदळाचे पीठ किंवा रवाळ तांदूळ मिसळून भिजवून- आंबवून झर्झरिका (डोसा) तयार केला जातो. ही पद्धत आपल्या देशातल्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रचलित आहे.

उडदाचे सूप (कढण) – कृती व गुण- दोष

उडीद डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये तासभर भिजत ठेवावी म्हणजे लवकर शिजते.डाळीऐवजी अखंड उडीद वापरणार असाल तर उडीद बारा तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर डाळीमध्ये गरजेनुसार पाणी घालून डाळ शिजवावी. डाळ बोटांनी दाबून नरम होत नाही, तोवर कढवणे सुरु ठेवावे. डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, हिंग, जिरे वगैरे पदार्थ घालून मिश्रण रवीने घुसळून घ्यावे आणि पुन्हा थोडे पाणी मिसळून पुन्हा एक उकळी काढावी. किंवा डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये जिरे,मोहरी, चिंच, आमसूल, गूळ घालून तेलाची किंवा तुपाची फोडणी द्यावी. याला सस्नेह सूप
म्हणतात. सस्नेह ( तेल-तूपयुक्त) सूप हे वातशमनासाठी अधिक योग्य.

आणखी वाचा-Health Special: थंडीमध्ये उडदाचे पदार्थ का खावेत? आयुर्वेद काय सांगतो?

उडदाचे सूप (कढण) आणि वरण हे चवीला गोड, शरीराला उष्णता व स्निग्धता पुरवणारे, पचायला जड असते. हे सर्व गुण हिवाळ्यातल्या आहाराची अपेक्षा पूर्ण करत असल्याने उडदाचे वरण हिवाळ्यात सेवन करणे अतिशय हितकर होते. एकंदरच उडदाचे सूप हे रुची वाढवणारे, शरीराला तृप्ती देणारे, बलदायक,शरीर धातू वाढवणारे आणि अतिशय शुक्रवर्धक आहे. वात विकारांमध्ये अतिशय उपयुक्त, मात्र कफ व पित्त वाढवणारे आहे.

उडदाच्या पीठापासून तयार होणारे काही खाद्यपदार्थ- (संदर्भ- आयुर्वेदीय आहार विमर्श)