कडधान्ये खाण्यास तरुण मंडळी नेहमीच कंटाळा करतात, पण कडधान्ये आहारात असावे असा सल्ला आपल्याला डॉक्टरांकडून नेहमीच मिळतो. कडधान्यांमध्ये अनेक प्रकार असतात. त्यात जास्त तर मूग डाळीचा वापर घरगुती पदार्थांमध्ये करण्यात येतो. मूग डाळीचा वापर खिचडी करण्यासाठी करण्यात येतो. तसेच मूग डाळ खाण्याचे अनेक फायदेसुद्धा आहेत.त्यात प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन बी-६, आणि फोलेट आढळते.
तर आज मूग डाळ खाण्याचे फायदे किती आहेत हे आपण पाहणार आहोत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांनी मूग डाळ आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकते याची माहिती दिली आहे.

मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमधील क्लिनिकल आहारतज्ज्ञ डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांच्या मते, पिवळी डाळ किंवा मूग डाळ ही अत्यंत पौष्टिक असते. तसेच स्वयंपाकघरात याचा सर्वाधिक वापर केला जातो.

five powerhouse superfood is helpful for good for blood health
Superfood For Blood Health : रक्त शुद्ध व निरोगी ठेवण्यासाठी हे पाच सुपरफूड्स ठरतील फायदेशीर
Office Snacks Must Have Food
ऑफिसच्या डब्यात ‘हे’ तीन पदार्थ असायलाच हवेत! पोषणतज्ज्ञांनीच सांगितला, काम करताना ऊर्जा वाढवण्याचा सोपा फंडा
How to protect your skin from common infections during monsoon Tips
पावसाळ्यात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या त्रास देऊ शकतात; ‘या’ उपायांनी मिळवा लगेच आराम
Benefits Of Drinking Tulsi Water
तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
Beetroot Juice Benefits
बीटाचा रस पिण्याचे फायदे वाचलेत का? ‘या’ वयोगटातील महिलांना होऊ शकतो मोठा लाभ; अभ्यासात सांगितले आहे ‘हे’ योग्य प्रमाण
Loksatta explained Credit card usage will become more expensive due to rule changes
विश्लेषण: ताज्या नियम बदलांमुळे क्रेडिट कार्डाचा वापर महागणार?
Monsoon foods: Which ones should you eat and which ones should you avoid
Monsoon foods : पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत? डॉक्टरांकडून घ्या जाणून….
have you been you using toothpicks then read health experts recommendations
दातांमधील अन्नकण काढण्यासाठी टूथपिकचा वापर करणे थांबवा! तज्ज्ञांनी सुचविलेले ‘हे’ पर्याय पाहा वापरून

डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांनी सांगितल्याप्रमाणे, १०० ग्रॅम शिजवलेल्या मूग डाळीमध्ये अंदाजे खालील पोषक घटक असतात :

कॅलरी: १०५ kcal
प्रथिने : ७.१ ग्रॅम
चरबी (फॅट) : ०.४ ग्रॅम
कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) : १९.१ ग्रॅम
आहारातील फायबर : ७.६ ग्रॅम
लोह : १.४ मिलिग्रॅम
मॅग्नेशियम: ४८ मिलिग्रॅम
पोटॅशियम: २९२ मिलिग्रॅम
व्हिटॅमिन बी ६ (B6) : डीव्हीच्या सुमारे (DV) १०%
फोलेट (Folate) : डीव्हीच्या सुमारे २४%

हेही वाचा… तुम्ही तुमचं बीपी योग्य पद्धतीने मोजताय का ? औषधोपचाराची गरज कधी निर्माण होते ?

मूग डाळीचे आरोग्यदायी फायदे पाहूयात:

डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांनी स्पष्ट केले की, मूग डाळ वनस्पती-आधारित प्रथिने आणि आहारातील फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. तसेच मूग डाळ पचनाससुद्धा मदत करते आणि बद्धकोष्ठता कमी करते. मूग डाळीतील जीवनसत्व आणि फोलेट, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी ६ पौष्टिकदृष्ट्या महत्वाचे असतात. तसेच डॉक्टर उषा किरण सिसोदिया पुढे म्हणाल्या की, मूग डाळीतील कमी चरबी हृदयास फायदेशीर ठरते.

मधुमेही रुग्णांसाठी मूग डाळ फायदेशीर आहे का?

मूग डाळीत कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते, जी रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवते, असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी मूग डाळ ही एक चांगली निवड आहे. तथापि, आहारात कोणत्याही पदार्थांचा समावेश करण्यापूर्वी आपल्या मधुमेहतज्ज्ञ किंवा पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा; असे डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांनी स्पष्ट केले आहे.

गर्भवती महिला मूग डाळ सुरक्षितपणे खाऊ शकतात का?

डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांच्या म्हणण्यानुसार गर्भवती महिलांना मूग डाळीचा खूप फायदा होऊ शकतो. मूग डाळीत असणारे फोलेट (Folate) गर्भातील काही दोष टाळण्यास मदत करते; तसेच लोह अशक्तपणा टाळण्यास मदत करते आणि प्रथिने गर्भाच्या वाढीस मदत करतात. तथापि, गर्भधारणेदरम्यान विशिष्ट आहाराच्या सल्ल्यासाठी नेहमी स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांनी स्पष्ट केले आहे.

मूग डाळीचे आहारात सेवन करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी :

मूग डाळ पौष्टिक असली तरी मूग डाळ भिजवणे किंवा आंबवणे यासारख्या क्रिया त्यांची पातळी कमी करू शकतात. काही व्यक्तींना शेंगा त्याचबरोबर मूग डाळीचीसुद्धा ॲलर्जी असू शकते. पुरळ उठणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अशा अनेक समस्यादेखील उद्भवू शकतात.

मूग डाळीबद्दल गैरसमज :

1.मूग डाळीबद्दल एक गैरसमज आहे की, मूग डाळीतील प्रोटीनमुळे वजन वाढते. तथापि, डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांनी स्पष्ट केले की, प्रत्यक्षात मूग डाळ वजन कमी करण्यास आणि शरीरात स्नायू तयार करण्यास मदत करते.

2.मूग डाळीबद्दल दुसरा गैरसमज असा आहे की, मूग डाळीमुळे शरीरात ‘उष्णता’ निर्माण होते. पण खरं असे आहे की, मुगाची डाळ थंड आणि पचायला सोपी मानली जाते, असे डॉक्टर उषा किरण सिसोदिया यांनी स्पष्ट केले आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)