Multani Mitti: त्वचेला नैसर्गिकरीत्या सुंदर बनविण्यासाठी मुलतानी मातीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्वचा स्वच्छ, एक्सफोलिएट व पोषण करण्याच्या क्षमतेसाठी मुलतानी माती खूप लोकप्रिय आहे. परंतु, त्वचाशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून मुलतानी मातीचा वापर सगळ्याच गोष्टींसाठी करणे योग्य नाही.

अभिवृत एस्थेटिक्सचे सह-संस्थापक, कॉस्मेटोलॉजिस्ट व त्वचा तज्ज्ञ डॉ. जतीन मित्तल म्हणाले, “मुलतानी माती तेलकट आणि मुरमे आलेल्या व्यक्तींसाठी त्याच्या उच्च शोषक गुणधर्मांमुळे वरदान ठरू शकते. हे जास्तीचे तेल प्रभावीपणे भिजवते, छिद्रे बंद करते व अशुद्धता काढून टाकते. त्यामुळे मुरमांपासून बचाव होतो. त्याचा थंड प्रभाव मुरमांशी संबंधित जळजळ आणि चिडचिडदेखील शांत करतो.”

Health Benefits Of Anjeer
Health Benefits Of Anjeer : सकाळी रिकाम्या पोटी खा अंजीर; लगेच दूर होतील ‘या’ पाच समस्या
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
eating egg whites is not good for you
Eating Egg Whites Healthy Or Not : फक्त अंड्यातील पांढरा भाग खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी मांडली मते…
mother and son died drowning Nashik district,
नाशिक जिल्ह्यात बंधाऱ्यात बुडून मायलेकासह तिघांचा मृत्यू
coriander juice beneficial for weight loss
Coriander Juice : खरंच कोथिंबिरीचा रस प्यायल्याने वजन कमी होते? जाणून घ्या, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर?
How many times in a week you should wash your bath towels Using dirty towels can cause skin diseases
बापरे! रोज टॉवेल न धुता वापरताय? यामुळे होऊ शकतात त्वचेचे गंभीर आजार, वाचा तज्ज्ञांचे मत
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
This is what happens to the body when you consume expired biscuits
एक्सपायरी डेट संपल्यानंतर बिस्किटे खाल्ल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

“परंतु, दीर्घकाळापर्यंत मुलतानी मातीचा वापर केल्याने तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्यामुळे त्वचा कोरडी होते,” असे डॉ. रिंकी कपूर, सल्लागार, त्वचाशास्त्रज्ञ, कॉस्मेटिक त्वचाशास्त्रज्ञ व त्वचा-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक्स, मुंबई यांनी सांगितले.

डॉ. मित्तल यांनीदेखील विशेषत: कोरडी किंवा संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. “तेलकट त्वचेसाठी मुलतानी मातीला फायदेशीर बनवणारे तेच शोषक गुणधर्म कोरड्या किंवा संवेदनशील त्वचेच्या प्रकारांसाठी हानिकारक असू शकतात. त्यामुळे त्वचेची विद्यमान स्थिती आणखी बिघडू शकते. एक्झिमा किंवा रोसेसिया यांसारख्या त्वचेसाठी मुलतानी मातीचा वापर केल्याने जास्त नुकसान होऊ शकते. त्यामुळे लालसरपणा आणि इतर समस्या निर्माण होऊ शकतात.”

डॉ. कपूर यांच्या म्हणण्यानुसार, सर्वांच्या त्वचेसाठी मुलतानी मातीचा उपाय फायदेशीर ठरू शकत नाही. कारण- प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार, पोत, अॅलर्जी आणि वैद्यकीय परिस्थिती वेगवेगळी असते.

हेही वाचा: हिरव्या पपईची पाने बोटॉक्सपेक्षा अनेक पटीने फायदेशीर आहेत? तज्ज्ञ काय सांगतात वाचा..

“मुलतानी माती ही त्वचेच्या दोन वेगवेगळ्या प्रकारांनुसार परिणाम दाखवू शकते. ती तेलकट, मुरमे असलेल्या त्वचेसाठी आश्चर्यकारक काम करते; परंतु कोरड्या किंवा संवेदनशील त्वचेसाठी ती खूप कठोर ठरू शकते. त्यामुळे तुम्ही नेहमी तुमच्या त्वचेचा प्रकार विचारात घ्या आणि मगच त्याचा वापर करा,” असे डॉ. मित्तल म्हणाले.

तर, मुलतानी माती हा अनेक फायद्यांसह एक वेगळा घटक आहे; परंतु त्याची उपयुक्तता त्वचेच्या प्रकारानुसार बदलते. त्वचा तज्ज्ञ सल्ला देतील की, तुमच्या त्वचेच्या विशिष्ट गरजा समजून घेणे आणि मुलतानी मातीचा तुमच्या स्किनकेअर पथ्यामध्ये समावेश करण्यापूर्वी त्यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. “स्किनकेअर प्रोफेशनलशी सल्लामसलत केल्याने त्याचा वापर प्रभावीपणे करण्यात मदत होऊ शकते,” असे डॉ. मित्तल म्हणाले.