पराठा किंवा डाळ भातावर तूप वापरणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. पण, काही आरोग्यप्रेमी कॉफीमध्ये चमचाभर तूप मिसळून पितात. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांसारख्या काही प्रसिद्ध सेलिब्रिटी ‘घी कॉफी’ म्हणजेच तूप टाकलेली कॉफी आवडीने पितात. पण, सध्या ट्रेंडमध्ये असलेली ही कॉफी खरंच आरोग्यदायी आहे का? कॉफीत तूप टाकून पिण्याचे शरीराला खरंच काही फायदे होतात का? चला जाणून घेऊ या

कॉफीमध्ये तूप टाकून पिणे खरंच आरोग्यदायी आहे का?

शालिमार बाग येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या युनिट हेड ऑफ डायबेटिक्सच्या श्वेता गुप्ता यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, “‘तूप टाकलेली कॉफी’, ज्याला घी कॉफी, बटर कॉफी किंवा बुलेटप्रूफ कॉफी असेही म्हणतात. ब्लॅक कॉफीमध्ये तूप किंवा काहीवेळा फक्त लोणी एकत्र मिसळून पितात. ही संकल्पना केटो डाएटमधून उगम पावली आहे, जी ऊर्जा पातळीसाठी उच्च-गुणवत्तेच्या फॅट्च्या वापरावर भर देते.”

हेही वाचा – रोज जेवल्यानंतर गोड पदार्थ खाल्ले, तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?

कॉफीत तूप टाकून पिण्याचे फायदे

उर्जा देते : पारंपरिक कॉफीच्या तुलनेत तूप टाकलेल्या कॉफीमध्ये अधिक फॅट्स असल्यामुळे बराच काळ टिकाणारी ऊर्जा मिळते असे मानले जाते, ही ऊर्जा हळूहळू शरीरात सोडली जाते. तुपातील हेल्दी फॅट्स कॅफिनचे शोषण कमी करतात, ऊर्जा वाढवतात.

लक्ष केंद्रित करण्यास मदत करते : कॅफिन आणि फॅट्स यांच्या मिश्रणाने मेंदूचे संज्ञानात्मक (cognitive) कार्य सुधारते असे मानले जाते. फॅट्स मेंदूसाठी सहज उपलब्ध ऊर्जा स्त्रोत म्हणून काम करते, संभाव्यत: मानसिक स्पष्टता देते, लक्ष केंद्रित करते आणि एकाग्रता वाढवते.

भूक नियंत्रण करते : तुपातील स्निग्धांश तृप्ततेची भावना निर्माण करू शकतात, भूक नियंत्रणात मदत करतात आणि एकूण कॅलरीजचे सेवन कमी करतात. विशेषत: केटोजेनिक किंवा कमी-कार्बोहायड्रेट डाएटचे पालन करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

अँटीऑक्सिडंट वाढवते : कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि तुपासारख्या उच्च-गुणवत्तेच्या स्निग्धांशांसह एकत्रित केल्यास ते अतिरिक्त अँटिऑक्सिडंटचे फायदे देऊ शकते. शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

हेही वाचा – हिवाळ्यात येणारा हार्ट अटॅक टाळण्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे फायदेशीर ठरेल का?

तूप टाकलेली कॉफी कशी बनवायची?

साहित्य
१ कप तयार केलेली कॉफी
१ ते २ चमचे उच्च दर्जाचे तूप

कृती
उच्च गुणवत्तेची कॉफी पावडर वापरून आपल्या पसंतीच्या कॉफीचा एक कप तयार करा.
ब्लेंडरमध्ये गरम कॉफी, तूप एकत्र करा.
मिश्रण फेसाळ होईपर्यंत सुमारे २०-३० सेकंदांपर्यंत मिश्रण करा.
इच्छित असल्यास त्यात गोड पदार्थ टाका आणि अतिरिक्त ५-१० सेकंद मिसळा.
मिश्रित तूप कॉफी मगमध्ये ओता आणि आनंद घ्या.

टीप : थोड्या प्रमाणात तुपाने सुरुवात करा, हळूहळू वैयक्तिक सहनशीलतेनुसार तुपाचे प्रमाण वाढवा.

हेही वाचा – सारखं काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होतेय? डॉक्टरांकडून जाणून घ्या उपाय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॉफीमध्ये तूप टाकून पिणे सर्वांसाठी आरोग्यदायी आहे का?

तूप टाकून कॉफी पिणे काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कोची येथील अमृता हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ अंजू मोहन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, “प्रत्येकाची वैयक्तिक आहारातील प्राधान्ये आणि आरोग्य स्थिती विचारात घेणे महत्त्वाचे आहे. कमी फॅट्स असलेला आहार घेणारे लोक, त्यांच्या कॅलरीजचे सेवन नियंत्रित करणारे, दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असणार्‍या व्यक्तींनी आणि हृदयाशी संबंधित समस्या असलेल्यांनी तूप टाकलेली कॉफी पिताना सावधगिरी बाळगली पाहिजे. पित्ताशयाची समस्या असलेल्या व्यक्तींना पचनसंस्थेमध्ये वेदना जाणवू शकतात आणि जे कॅफिनला संवेदनशील असतात, त्यांनी कॉफीचे उत्तेजक परिणाम लक्षात ठेवले पाहिजे. आहारात महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी आरोग्यसेवा व्यावसायिक किंवा पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्या, कारण असे आहार सर्वांसाठी योग्य नसतात.”