कोणताही घरगुती उपाय किंवा आजीने सांगितलेले उपाय बघा, त्यात तुम्हाला हळदीचा वापर होत असल्याचे लक्षात येईल. हळद हा आल्यासारखा दिसणारा मसाला आहे अन्नाची चव वाढवतो आणि वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेल्या आरोग्य फायद्यांनीही परिपूर्ण आहे. त्यामुळे, बरेच लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात एका ग्लास कोमट हळदीच्या पाणी पिऊन करतात. पण ते तुमच्या शरीरावर नेमके कसा परिणाम करते? या आरोग्य ट्रेंडचे काही महत्त्वाचे फायदे आहेत का? हळदीच्या पाण्याबाबत सर्व शंकांची उत्तरे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने काही तज्ज्ञांशी संपर्क साधला.
“हळदीच्या पाण्याने दिवसाची सुरुवात केल्यास पचन सुधारण्यास, यकृताच्या कार्याला चालना मिळते, दाह कमी करण्यास आणि काही लोकांमध्ये चयापचय वाढविण्यास मदत करू शकते,” आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. अंजना कालिया यांनी फायद्यांची पुष्टी केली. दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की,”हळदीचे दाह-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्यात आढळणाऱ्या कर्क्यूमिनपासून येतात, जे एक नैसर्गिक संयुग आहे.
पोषण तज्ज्ञ निकीता सोईन यांनी याबाबत सहमती दर्शवली आणि त्या याच्या सौंदर्यविषयक फायद्यांवर प्रकाश टाकतात, ज्यामुळे हे तरुणांमध्ये लोकप्रिय झाले आहे. दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना त्या म्हणाल्या,”हळदीचे पाणी त्वचा थोडी स्वच्छ दिसण्यास मदत करते, मुरूमांमुळे होणारी सूज कमी करते आणि तारुण्यातील तेज वाढवते. याशिवाय, वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही हे उपयुक्त ठरू शकते.
दोन्ही तज्ज्ञ हे मान्य करतात की,”नियमितपणे हळदीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पोटाचे आरोग्य सुधारते.
निकिता सोइन यांच्या मते – “ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी झाल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो तसेच संधिवात, हृदयविकार आणि काही प्रकारच्या कर्करोगासारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो.”
फक्त पाण्यात हळद घेणे पुरेसे नाही. आपल्या शरीराला कर्क्युमिन सहज शोषता येत नसल्यामुळे त्यात काळी मिरीची पूड टाकण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. याशिवाय, बाजारात भेसळयुक्त मसाले उपलब्ध असल्यामुळे सेंद्रिय हळदीचा वापर करण्याचा सल्ला सोइन देतात.
हेही वाचा – साबुदाणा, भगर आणि बटाटे: काय खाल्यास वाढते रक्तातील साखरेची पातळी? नवरात्र उपवासात काय खावे आणि काय टाळावे?: सकाळी उठल्या-उठल्या फक्त हळदीचे पाणी प्या! शरीरात होईल असा बदल की तुम्हीही थक्क व्हाल!दररोज हळदीचे पाणी पिणे सुरक्षित आहे का?(Is it safe to drink this haldi water daily?)
बहुतेक निरोगी व्यक्तींसाठी माफक प्रमाणात हळदीचे पाणी पिणे सुरक्षित मानले जाते. मात्र अनेकदा लोक वैद्यकीय सल्ल्याशिवाय याचे अति सेवन करतात.
निकिता सोइन सांगतात – “जास्त प्रमाणात हळदीचे पाणी प्यायल्यास पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो जसे की ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, जुलाब, मळमळ, उलट्या आणि पोटात ढेकर येणे.”
तसेच, “कर्क्युमिनचे जास्त प्रमाण शरीरातील लोह शोषण कमी करते ज्यामुळे अॅनिमियाचा धोका निर्माण होतो. महिलांमध्ये यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते. पुरुषांमध्ये जर आधीपासून हार्मोनल समस्या असेल तर अस्वस्थता वाढू शकते.”
याशिवाय, हळद नैसर्गिक रक्त पातळ करणारी असल्यामुळे काही दुर्मिळ केसेसमध्ये ऑक्सलेट नेफ्रोपॅथी (मूत्रपिंडाला हानी) होण्याची शक्यता असते.
हेही वाचा – उपवास करताना तुम्ही तळलेले पदार्थ आणि फळांचे अतिसेवन करता का? या ५ सामान्य चुका आरोग्यासाठी घातक आहेत!: सकाळी उठल्या-उठल्या फक्त हळदीचे पाणी प्या! शरीरात होईल असा बदल की तुम्हीही थक्क व्हाल!कोणी घ्यावी विशेष काळजी? (Who should be cautious?)
- सर्व उपाय सगळ्यांसाठी योग्य ठरतीलच असे नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक प्रकृती, चयापचय आणि आजारपण वेगळे असल्यामुळे हळदीच्या पाण्याचा परिणामही वेगवेगळा होऊ शकतो.
- गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी तर खास दक्षता घ्यावी.
- पित्ताशयातील खडे, मूत्रपिंडात खडे किंवा काही पोटाशी संबंधित आजार असतील तर हळद त्रासदायक ठरू शकते.
- काहींमध्ये हळद सूज कमी करण्याचे काम करते, पण इतरांमध्ये ती पोटाच्या अस्तराला त्रासदायक ठरू शकते.
- IBS (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम), ऍसिडिटी किंवा पोटाचे अल्सर असलेल्या लोकांना हळदीचे पाणी प्यायल्यानंतर पोट फुगणे, पोटात मुरडा किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
मधुमेही रुग्णांसाठी खबरदारी
मधुमेह असणाऱ्यांनी हळदीचे पाणी घेताना काळजी घ्यावी. हे ब्लड शुगर कमी करू शकते, ज्यामुळे मधुमेहावर औषध घेणाऱ्यांसाठी धोका वाढतो.
हळदेमध्ये सौम्य रक्त पातळ करणारे गुणधर्म असल्याने जर आपण Warfarin किंवा इतर anticoagulants सारखीऔषधे किंवा साधे ऍस्पिरिन घेत असाल तर रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो.
सावधानतेची चिन्हे (Warning Signs)
- हळदीचे पाणी प्यायल्यानंतर जर खालील लक्षणे जाणवली तर त्वरित वापर थांबवा:
- सतत पोटदुखी
- मळमळ किंवा उलट्या
- जुलाब
- पिवळसरपणा (जॉन्डिससारखी लक्षणे)
- अनपेक्षित रक्तस्त्राव किंवा निळसर डाग
डॉ. कालिया सांगतात – “ही लक्षणे दिसताच हळदीचे पाणी पिणे बंद करा आणि ताबडतोब वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तसेच, जर तुम्ही दीर्घकाळ औषधे घेत असाल तर दैनंदिन दिनचर्येत हळदीचे पाणी समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.”