उन्हाळा आणि आंबा यांची जोडी अगदी घट्ट मानली जाते. आंबा हे उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे. या हंगामात आंब्याचे उत्पादन जास्त होते. काही जण फक्त आंब्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहत असतात. आंब्याच्या चवीमुळे व त्यातल्या विविध गुणधर्मामुळे त्याला फळांचा राजा अर्थात आजच्या भाषेत सुपर फूड म्हटले जाते. आंबा आणि आमरस याशिवाय उन्हाळ्याची मजा काही पुर्ण होत नाही. दररोज एखादा तरी आंबा किंवा मग जेवणात एखादी लहानशी वाटी भरून आमरस हवाच, असं अनेक जणांना वाटतं. साधारणत: आंबा आपण जेवताना खातो, त्यामुळे चार घास जास्तही जातात. मात्र हाच आंबा नेमका कधी खावा, आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आहारतज्ञ मनप्रीत कालरा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत आंबा खाण्याची योग्य वेळ सांगितली आहे, त्यांच्या मते दुपारच्या जेवणानंतर आंबा खाणे फायदेशीर ठरु शकते. चुकीच्या वेळी आंबा खाल्ल्याने तुमची पचनसंस्था संतुलित राहण्याऐवजी तुम्हाला पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

दुपारच्या जेवणानंतर आंबा खाऊ शकता –

दुपारच्या जेवणानंतर तुम्ही आंबा खाऊ शकता, वाढलेल्या वजनामुळे हैराण झालेले असाल तर तुम्ही आवर्जून आंबा खायला हवा. यातील पोषक तत्वांमुळे आणि फायबरमुळे शरीरातील अतिरीक्त चरबी नष्ट होते. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते. आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. पण, आंब्यातील फायबर घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि निरोगी वजन राखण्यास मदत करू शकते. आंब्यामध्ये कमी-कॅलरी घनता आणि उच्च फायबर घटत असतात. यामुळे भूकेची जाणीव दूर राहते आणि तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. फायबरची ही एकमेव भूमिका नाही.

हेही वाचा – Mango Seed Benefits : आंबा खाल्ल्यानंतर कोय फेकू नका? जाणून घ्या ‘हे’ १० आरोग्यदायी फायदे

रात्री जेवणानंतर आंबे खाणे हाणीकारक –

रक्तातील साखरेची पातळी वाढते –

ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी विशेषतः रात्री आंबा खाणे टाळावे. शरीरातील साखरेची पातळी वाढवण्यासाठी आंबा कारणीभूत ठरू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वजन वाढू शकते –

वजन वाढवण्यातही आंबा उपयुक्त मानला जातो. दिवसा आंबा खाल्ल्याने व्यक्तीची शारीरिक हालचाल राहते त्यामुळे रात्रीच्या तुलनेत शरीरात कमी चरबी जमा होते. जर तुमचे वजन आधीच वाढलेले असेल तर रात्री आंबे खाल्ल्याने ते जास्त वजन वाढू शकते.