Pakistan Former President Pervez Musharraf Death : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे अमायलोइडोसिस या आजाराने निधन झाले. दुबई येथील रुग्णालयात मुशर्रफ यांचे निधन झाल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले होते. मुशर्रफ मागील एक वर्षापासून या आजाराने ग्रस्त होते. गेल्या वर्षी जून २०२२ पासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. या आजारामुळं त्यांना बोलता येत नव्हतं. तसंच चालण्यासही अडथळा निर्माण होत होता. या गंभीर अजारामुळं अखेर त्यांनी ५ फेब्रुवारी २०२३ ला अखेरचा श्वास घेतला.

अमायलोइडोसिस आजार काय आहे?  

अमायलोइडोसिस एक गंभीर आणि घातक आजार आहे. या आजारामुळं हृदय, यकृत, किडनी आणि शरीराच्या अन्य भागात अमायलोइड प्रोटिनची निर्मिती होते. अमायलोइडोसिस अनेक प्रकारचे असतात. काही अनुवंशिक असतात. खूप वेळ डायलिसिस केल्यामुळं हा आजार होऊ शकतो. या अजारामुळं शरीरातील अनेक भागात गंभीर परिणाम होतात.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
nestle controversy
Nestle Controversy : नेस्लेच्या बेबी फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त; साखर आरोग्यासाठी घातक का?
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?

अमायलोइडोसिस किती प्रकार आहेत?

आपल्या शरीरात अमाइलॉयड, अनेक वेगवेगळे प्रोटिन जमा करु शकतात. पण यातील काही महत्वाचे आरोग्य समस्यांवर आधारीत आहेत. प्रोटिनचा प्रकार आणि हे कुठे जमा होतं, यानुसार तुम्हाला कोणत्या प्रकारचं अमायलोइडोसिस झालं आहे, याबाबत माहिती मिळते. अमायलोइड तुमच्या संपूर्ण शरीरात किंवा एकाच भागात जमा होऊ शकतं. तसंच काही प्रकारच्या अमायलॉइडला अल्जायमर आजाराशी जोडलं गेलं आहे. याचा प्रभाव कधीतरी तुमच्या मेंदूवरही होऊ शकतो.

एएल (Al)) अमायलोइडोसिस (इम्युनोग्लोबुलिन लाइट चेन अमायलोइडोसिस) | AL Amyloidosis (immunoglobulin light chain amyloidosis)

एए अमायलोइडोसिस | Dialysis-related amyloidosis (DRA)
कौंटुबीक किंवा अनुवंशिक अमायलोइडोसिस | Familial, or hereditary amyloidosis

वयशी संबंधीत (सीनायल) प्रणालीगत अमायलोइडोसिस | Age-related (senile) systemic amyloidosis

अवयवानुसार विशिष्ट अमायलोइडोसिस | Organ-specific amyloidosis

नक्की वाचा – डायबिटीज रुग्णांनी कोणत्या रंगाचे खजूर खाल्ल्यास होतो फायदा? ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण

अमायलोइड प्रोटीन काय आहे?

अमायलोइड सामान्यत: शरीरात बनत नाही. हा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीनने बनवलेला असतो. अमायलोइड एक असामान्य प्रोटीन आहे. हा खासकरून बोन मॅरोमध्ये निर्माण होतो. याला कोणत्याही पेशीत किंवा अवयवात जमा केलं जाऊ शकतं.

अमायलोइडोसिसचे लक्षण

शरीराच्या अवयवांवर परिणाम झाला असेल, तर ही या आजाराची लक्षणं असतात. सूज येणे, थकवा, कमजोरी, श्वास घ्यायला अडचण निर्माण होणे, अंगदुखी, अशाप्रकारची या आजाराची लक्षणे आहेत.

१) डोफ्यात आणि पायांना सूज येणे
२) थकवा आणि अशक्तपणा आल्यासारखं वाटणं
३) श्वास घ्यायला त्रास
४) त्वचेत बदल
५) त्वचा मोठी होणे किंवा किरकोळ दुखापत होणे
६) डोंळ्यांच्याजवळ डाग येणे
७) हृदयाची गती मंदावणे
८) श्वास घेण्यात अडचण निर्माण झाल्या सरळ झोपण्यात त्रास होणे

नक्की वाचा – फळ कापल्यावर किती वेळात खाल्लं पाहिजे? एक्सपर्टकडून जाणून घ्या सविस्तर

अमायलोइडोसिसचे उपचार

अमायलोइडोसिसचा उपचार त्याच्या प्रकारावर अवलंबून असतो. या आजारासाठी कोणताही घरगुती उपचार उपलब्ध नाहीय. हा आजार झाल्यानंतर मेडिसीन नक्कीच घेतल्या पाहिजेत. याशिवाय किमोथेरेपी किंवा स्टेम सेल ट्रांसप्लांटच एकमेव उपाय आहे.

तुम्ही डॉक्टरकडे केव्हा जाता?

तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी डॉक्टरांकडून सतत सल्ला घेतला पाहिजे. जर अमायलोइडोसिस संबंधित लक्षणे पुन्हा दिसू लागल्यास, तुम्ही तातडीनं वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटून उपचार सुरु करा.