Rapper Badshahs Weight Loss Transformation :आजकाल अनेक सेलिब्रिटी अचानक वजन कमी करीत असल्याचे पाहायला मिळत आहेत. राम कपूर, करण जोहर, कपिल शर्मा, ज्युनियर एनटीआर आणि आता रॅपर बादशाह यांनी आश्चर्यकारकपणे झटपट वजन कमी केले आहे. या सर्व सेलिब्रिटींना पाहून सर्वच जण थक्क झाले आहेत आणि वजन कमी करण्यासाठी औषध घेतले आहे, असा दावा करीत आहेत. आता बादशाहने त्याच्या वजन कमी करण्याबद्दल माहिती दिली आहे.
झटपट वजन कमी केल्यानंतर रॅपर बादशाहाचा व्हिडीओ व्हायरल झाला. वजन कमी करण्यासाठी त्याने औषध घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले. परंतु त्याने अलीकडच्या मुलाखतीत त्याने या अफवा खोट्या असल्याचे स्पष्ट केले. वजन कमी करण्यासाठी त्याने कोणतेही डाएटिंग केले नाही किंवा कोणतेही औषध घेतलेले नाही. तो म्हणाला,”त्याने अत्यंत अवघड पद्धतीने वजन कमी केले. कारण- त्याच्या लठ्ठपणामुळे त्याचा स्लीप ॲप्नियाचा त्रास वाढत होता. वजन कमी करण्यासाठी तो काटेकोरपणे आहार, व्यायाम व झोप यांचे नियम पाळत होता पण, वजन कमी करण्यात खरोखर महत्त्वाचे ठरले ते म्हणजे जेवणाचे भाग नियंत्रण करणे (portion control in diet) म्हणजेच कोणता आहार किती प्रमाणात खातो याकडे लक्ष देणे.
स्लीप एपनिया म्हणजे?
रॅपर बादशाहचे वजन नक्की कशामुळे कमी झाले हे जाणून घेण्यापूर्वी स्लीप ॲप्निया म्हणजे काय? ते थोडक्यात जाणून घेऊ. तर स्लीप ॲप्निया ही अशी स्थिती आहे, ज्यामुळे तुम्ही झोपेत असताना श्वास बंद होतो. हे एक तर तुमच्या श्वासनलिकेत जिभेमुळे येणाऱ्या अडथळ्यामुळे (ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया) किंवा तुमचा मेंदू अपेक्षेप्रमाणे तुमच्या श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवत नसल्याने (सेंट्रल स्लीप ॲप्निया) घडते.
रॅपर बादशाहाने कसे कमी केले वजन?
रॅपर बादशाहच्या वजन कमी करण्याबाबत माहिती देताना दिल्ली येथील सर गंगाराम हॉस्पिटल, सल्लागार व आहारतज्ज्ञ मुक्ता वशिष्ठ सांगतात की, अहवालांनुसार अतिरेकी आहारामुळे त्याचा वेग कमी झाला होता आणि त्यामुळे त्याला अधिक भूक लागत होती. कोणत्याही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत आहारामुळे वजन कमी होण्याचे सुमारे ७५ टक्के योगदान असते आणि व्यायामामुळे वजन कमी होण्याचे सुमारे २५ टक्के योगदान असते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर त्यात आहाराची भूमिका खूप महत्त्वाची ठरते आणि तुम्ही अन्न किती प्रमाणात खात आहात यावर नियंत्रण करणे त्यासाठी एक वैज्ञानिक मार्ग आहे.”
एकाच वेळी भूक शांत करणे आणि किती प्रमाणात अन्न खावे यावर नियंत्रण कसे ठेवावे? (How to practise portion control and manage your hunger pangs at the same time?)
सातत्याने थोडा थोडा आहार घ्या; जेणेकरून सातत्याने ऊर्जा मिळत राहील, ज्यामुळे अन्न खाण्याची तीव्र इच्छा कमी होऊ शकते आणि रक्तातील साखर स्थिर होऊ शकते. जेवणाच्या अर्धा तास आधी दोन ग्लास पाणी प्या; जेणेकरून तुमची भूक कमी होईल. ही सवय तुम्हाला भूक नसताना काहीतरी खाण्याची इच्छा टाळण्यास मदत करते. अन्नसेवनाचे नियंत्रण करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे जेवताना छोटी ताटली आणि छोटी वाटी वापरा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ताटात भरपूर अन्न दिसत नसेल, तर तुमची जास्त खाण्याची शक्यता कमी होते. तसेच तुम्ही फक्त अन्न किती आकर्षक दिसते यावरून नाही, तर तुम्हाला किती भूक आहे यानुसार जेवता. तुमच्या शरीराला भूक लागल्याचे संकेत नियंत्रित करण्यास मदत करण्यासाठी विशिष्ट वेळीच जेवण करा. मात्र, जेवण न करणे टाळा. कारण- त्यामुळे नंतर तुमची भूक वाढू शकते आणि नंतर जास्त खाण्याची शक्यता असते. तुम्ही घराबाहेर किंवा हॉटेलमध्ये जेवत असला, तर नेहमी अर्ध्या प्लेटची ऑर्डर द्या किंवा तुमच्या प्लेटमधील पदार्थ मित्रांबरोबर वाटून खा.
तुमच्या जेवणाची रचना कशी बदलायची? (How to change your meal composition?)
तुमच्या जेवणाच्या ताटात प्रथम प्रथिनांचा समावेश करा. प्रथिनयुक्त पदार्थ तुम्हाला पोट भरल्याची आणि तृप्त झाल्याच्या भावनेचा अनुभव देतात. एकदा पोट भरल्याची जाणीव झाली की, तुम्ही कार्बोहायड्रेट्सवर अवलंबून राहणे आपोआप कमी होईल. कार्बोहायड्रेट्सचे सेवन करताना ते तुमच्या ताटाच्या एक-चतुर्थांशपेक्षा जास्त नसेल याची खात्री करा. सकाळी व दुपारी जास्त कॅलरीज खा आणि रात्री कमी कॅलरीज घ्या. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ज्यांनी नाश्त्यात त्यांच्या दैनंदिन कॅलरीजचा जास्त प्रमाणात वापर केला, त्यांच्या भुकेचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले.
पोट भरेल आणि तृप्ततेची भावना वाढविण्यासाठी तुमच्या जेवणात आणि स्नॅक्समध्ये उच्च फायबरयुक्त पदार्थांचा (स्टार्चविरहीत फळे, भाज्या व संपूर्ण धान्य) समावेश करा. प्रतिरोधक स्टार्चयुक्त (Resistant starch) पदार्थांचा समावेश करा. प्रतिरोधक स्टार्च हा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे, जो पूर्णपणे पचत नाही आणि म्हणून तो रक्तप्रवाहात कमी प्रमाणात साखर सोडतो.
स्नॅकिंगबद्दल काय?
बदाम, अक्रोड व काजू यांसारखे नट स्नॅकिंगसाठी चांगले पर्याय असतात कारण- त्यात चांगले फॅट्स असते; पण ते जास्त प्रमाणात खाऊ नका. सर्व एकत्र करून खा आणि आठ ते १० ग्रॅमपर्यंत मर्यादित प्रमाणात खा. तुम्ही एका लहान वाटीत सॅलड खाऊ शकता; ज्यामध्ये लेट्यूस, कोबी व टोमॅटो यांसारख्या फायबरयुक्त भाज्या असतील. तुम्ही दोन चमचे भाजलेल्या बिया आणि अर्धा मध्यम आकाराचा ॲव्होकॅडो खाऊ शकता.