अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. आरोग्याची काळजी घेण्यासाठी तो जितके प्रयत्न करतो ते खरंच कौतुकास्पद आहे. सोशल मीडियावर अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत येत आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या आहाराबाबत आणि त्याच्या खाण्याच्या सवयींबाबत खुलासा केला आहे.

मुलाखतीमध्ये अक्षय सांगतो की, शास्त्रांमध्ये सांगितले आहे ६.३० नंतर अन्न खाऊ नये. जर भूक लागली तर अंड्याचा पांढरा भाग किंवा गाजर, मुळा अशा गोष्टी खातो किंवा सॅलेड-सूपचे सेवन करतो. जेव्हा रात्री उशिरा तुम्ही जेवता, तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराचे मोठे नुकसान करता. जेव्हा तुम्ही रात्री १० ते ११ वाजता अन्न खाता आणि त्यानंतर लगेच झोपता, तेव्हा तुमच्या शरीराला अन्न पचवण्यासाठी फक्त ३ ते ४ तास मिळतात. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा पूर्ण शरीर आराम करते, पण तुमचे आतडे त्याचे कार्य करत असते.”

संध्याकाळी ६.३० नंतर भूक लागली तर तो ज्या मोड आलेल्या कडधान्यांचे सॅलेड खातो, त्याबद्दल बोलताना अक्षयने त्याची रेसिपीदेखील प्रेक्षकांना सांगितली.

मोड आलेल्या कडधान्याचे सॅलडची रेसिपी

एका भांड्यात मोड आलेले कडधान्य, एक कप बारीक चिरलेले कांदे, टोमॅटो आणि काकडी, मूठभर उकडलेले कॉर्न, एक छोटा कप डाळिंबाचे दाणे, अर्धा छोटा कप कैरी आणि कच्चे शेंगदाणे घाला. दुसऱ्या भांड्यात एक चमचा काळी मिरी पावडर, काळे मीठ आणि भाजलेले जिरे पावडर, एक चमचा ऑलिव्ह ऑइल, मूठभर धणे, पुदिन्याची पाने घाला आणि अर्धे कापलेले लिंबू पिळून चांगले मिसळा. चिरलेल्या भाज्यांमध्ये हा मसाला घाला, सर्वकाही चांगले मिसळा आणि आनंद घ्या.

अक्षय कुमारने सांगितलेले हे मोड आलेल्या कडधान्यांचे सॅलडचे आरोग्यासाठी काय आहेत फायदे? (What are the health benefits of this salad?)

दिल्लीस्थित पोषणतज्ज्ञ शोनाली सभरवाल यांच्या मते, जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा एक वाटी कोंब आलेले कडधान्य खाऊ शकता. ते फायबर, कॅल्शियम, जीवनसत्त्वे अ आणि क, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे समृद्ध स्रोतदेखील आहेत.

“अंकुर या पोषक तत्त्वांची जैवउपलब्धता वाढवते. अँटिऑक्सिडंट्सचा एक उत्तम स्रोत, अंकुरलेले कडधान्य मुक्त रॅडिकल्सना निष्क्रिय करण्यास मदत करतात. त्यांच्यात कर्करोगविरोधी गुणधर्मदेखील आहेत. कडधान्यांना मोड आणणे अत्यंत सोपे आणि तुलनेने स्वस्त आहे. मोड उगवण्याच्या प्रक्रियेसह कडधान्यांमध्ये असलेले फॅटी अॅसिडचे प्रमाणदेखील वाढते,” असे सभरवाल सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोड आलेल्या कडधान्याचे सॅलड खाताना या गोष्टीं घ्या काळजी (Take these precautions while eating spoiled grain salad)

“मोड आलेले कडधान्य – हा कमी कॅलरी असलेला नाश्ता घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे. विशेषतः कच्च्या किंवा न शिजवलेल्या मोड आलेल्या कडधान्यामुळे स्वयंप्रतिकार आजार (autoimmune conditions – जिथे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वतःच्या निरोगी ऊती आणि पेशींवर हल्ला करते.) असलेल्या आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्यांमध्ये अन्न विषबाधा होऊ शकते, ज्यामध्ये मुले आणि वृद्धांचा समावेश आहे. त्यामध्ये प्रथिने आणि फायबरदेखील जास्त असतात, म्हणून कमकुवत मूत्रपिंड असलेल्यांनीदेखील काळजी घ्यावी,” असा सभरवाल यांनी इशारा दिला.