Snoring Remedies : अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते. कधीकधी या घोरण्याचा आवाज इतका मोठा असतो की ज्यामुळे शेजारी झोपलेल्या व्यक्तीची झोप मोड होते. पण मोठ्याने घोरणे हे गंभीर समस्यांचे कारण असू शकते. त्यामुळे झोपेत घोरण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी आम्ही ७ सोपे उपाय सांगत आहोत. घोरण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की, सायनसची समस्या, अल्कोहोलचे जास्त सेवन, एॅलर्जी, सर्दी किंवा लठ्ठपणा. पण या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी खालील ७ सोप्पे उपाय ट्राय करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) झोपण्याची स्थिती बदला

पाठीवर झोपताना जीभ आणि टाळू वायुमार्गावर दाबाव आणतात यामुळे झोपेच्या वेळी कंपनाचा आवाज निर्माम होतो. पण एका कुशीवर झोपल्याने तुम्हाला घोरण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकेल, शरीर एकाबाजूने करुन झोपल्याने घोरणे कमी होते. कारण शरीराचा बॅलेन्स एका बाजूला जातो. डोके उंचावर ठेऊन झोपल्याने देखील घोरणे कमी होते, कारण यामुळे नाकातील वायुमार्ग मोकळा होतो आणि तो घोरण्यास रोखतो. पण यामुळे मनदुखीची समस्या जाणवू शकते.

hasta mudra : पोट साफ होण्यासाठी हातांची ‘ही’ मुद्रा करुन पाहाचं

२) वजन कमी करा

वजन कमी केल्याने देखील घोरण्याच्या समस्येपासून दूर राहता येते. पण हे सर्वांना लागू होत नाही. कारण काही बारीक लोकं देखील घोरतात. पण तुम्ही आधी घोरत नसाल आणि अचानक वजन वाढल्यामुळे ही समस्या जाणवत असेल तर वजन कमी केल्याने तु्म्ही घोरण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळवू शकता. मानेभोवती चरबी वाढल्यानेही देखील ही समस्या जाणवते.

३) अल्कोहोलपासून दूर राहा

अल्कोहोलमुळे घशातील स्नायू संकुचित होतात. यामुळे घोरणे सुरु होते. तज्ज्ञांच्या मते, झोपण्याच्या चार ते पाच तास आधी दारूचे सेवन केल्याने घोरण्याची समस्या वाढते. सामान्यत: जे लोक रोज घोरत नाही ते दारू प्यायल्यानंतर घोरायला लागतात.

४) झोपण्याची योग्य सवय लावा

वेळेवर झोप न लागल्याच्या कारणामुळेही घोरण्याची समस्या वाढते. बराच वेळ जागे राहिल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर थकून जाते आणि गाढ झोप येते. अशावेळी स्नायू आकुंचन पावतात आणि घोरणे सुरु होते.

५) नाकपुड्या उघड्या ठेवा

जर तुम्ही नाकातून घोरत असाल तर नाकाची नाकपुडी उघडी ठेवल्यास यातून आराम मिळण्यास मदत होऊ शकते. सर्दी किंवा इतर कोणत्या कारणामुळे नाक बंद झाल्यास घोरण्याची समस्या अधिक जाणवते. यामुळे झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ केल्याने नाकपुड्या उघडतात. मिठाच्या पाण्याने नाक धुतल्यानेही घोरणे टाळता येऊ शकते.

६) उशी बदला

कधी कधी उशीच्या एॅलर्जीमुळेही घोरण्याची समस्या जाणवते. उशीमध्ये जमा झालेल्या धुळीच्या कणांमुळे एॅलर्जी होते ज्यामुळे घोरण्याची समस्या उद्धवते. म्हणून उशी दर दोन आठवड्यांनी उघड्या हवेत ठेवा आणि दर सहा महिन्यांनी उशी बदला. यामुळे तुमची घोरण्याची समस्या कमी होऊ शकते.

७) हायड्रेट रहा

जास्तीत जास्त पाणी पिऊन स्वत:ला हायड्रेट ठेवा, डिहायड्रेशनमुळे नाक आणि टाळू चिकट होते यामुळे घोरण्याची समस्या जास्त होते. यावर मात करणयासाठी भरपूर पाणी प्या आणि आहारात द्रव पदार्थाचे सेवन वाढवा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snoring symptoms causes and 7 easy remedies sjr
First published on: 17-04-2023 at 19:21 IST