सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या बोल्ड फॅशनमुळे तर कधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. नुकतेच उर्फीने लिप फिलरचा आपला अनुभव सांगणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिच्या मते, “तिचा लिप फिलर चुकीच्या पद्धतीने बसवला गेला होता आणि त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढण्याऐवजी विचित्र दिसत होते, त्यामुळे तिने तो काढण्याचा निर्णय घेतला. या व्हिडीओमध्ये उर्फीने सुधारात्मक कॉस्मेटिक प्रक्रियेत घ्यावयाच्या काळजीविषयीही माहिती दिली आहे.
रीलच्या कॅप्शनमध्ये उर्फी सांगते:
“हा फिल्टर नाही, मी ठरवले की चुकीच्या जागी बसवलेले फिलर्स काढून टाकावेत. मी पुन्हा फिलर्स घेईन पण नैसर्गिक पद्धतीने. मी फिलर्सला नाही म्हणत नाही. फिलर काढण्याची प्रक्रिया वेदनादायक असते, तसेच फिलर्ससाठी चांगल्या डॉक्टरांकडे जाणे खूपच महत्त्वाचे आहे, कारण अनेक फॅन्सी क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टरांना याची पुरेशी माहिती नसते.”
“सुजलेले ओठ दाखवणारा व्हिडीओ खरी गोष्ट पूर्णपणे सांगत नाही. तो फक्त एक चुकीचा अनुभव दाखवतो आणि यामुळे वेदना व सूज याबद्दल चुकीच्या समजुती निर्माण होतात. प्रत्यक्षात, लिप फिलर्स हे सुरक्षित असतात, जर ते कुशल त्वचारोगतज्ज्ञाकडून केले गेले तर. तज्ज्ञांना नेमका किती फिलर वापरायचा हे माहीत असते आणि ते तुलनेने कमी वेदनादायक पद्धतीने करू शकतात. अगदी फिलर काढण्याची प्रक्रियाही व्हिडीओत दिसते तितकी वेदनादायक नसते. ही नाजूक प्रक्रिया फक्त बोर्ड-प्रमाणित त्वचारोगतज्ज्ञाने क्लिनिकमध्येच करावी,” असे दिल्ली, वसंतकुंज येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल डर्मेटॉलॉजिस्ट असलेल्या डॉ. रश्मी शर्मा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

लिप फिलर्स म्हणजे काय? ( what are lip fillers?)
लिप फिलर्स हे हायल्युरॉनिक अॅसिडचे इंजेक्शन्स (hyaluronic acid) असतात, जे शरीरात नैसर्गिकरीत्या आढळणारे एक घटक आहे आणि ते पाणी शोषून घेण्याची क्षमता ठेवते. यामुळे ओठांना भरदारपणा मिळतो, त्यांचा आकार सुधारतो आणि स्पष्टता वाढते.
लिप फिलर्स कसे काढले जातात?(How are lip fillers dissolved?)
लिप फिलर काढणे ही एक सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे. यासाठी हायल्युरोनिडेस (Hyaluronidase) नावाचे एन्झाइम इंजेक्ट केले जाते, जे फिलरमध्ये असलेल्या हायल्युरॉनिक अॅसिडचे विघटन करते. ओठ हा संवेदनशील भाग असल्याने ही प्रक्रिया थोडी वेदनादायक ठरू शकते. मात्र, योग्य इंजेक्शन तंत्र आणि डॉक्टरांच्या कौशल्यामुळे वेदना कमी करता येतात.
लिप फिलर काढण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?( Should you follow a protocol before dissolving your lip filler?)
- कोणताही मोठा कार्यक्रम असेल तर किमान एक आठवडा आधी ही प्रक्रिया करा.
- तुमचा पूर्ण वैद्यकीय इतिहास, संसर्ग, ऑटोइम्यून आजार किंवा हर्पीजची माहिती डॉक्टरांना द्या.
- पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेटेड ठेवा.
- जर तुम्ही ब्लड थिनर्स घेत असाल, तर प्रक्रिया होण्यापूर्वी तीन दिवस ते थांबवा.
- अॅस्पिरिनसारखी औषधे किंवा सप्लिमेंट्स जे रक्तस्राव वाढवू शकतात आणि जखम बरी होण्यास अडथळा आणू शकतात, ती टाळा.
- धूम्रपान पूर्णपणे बंद करा.
- तुमच्या त्वचारोगतज्ज्ञाकडून हायल्युरोनिडेस इंजेक्शनला अॅलर्जी आहे का हे तपासण्यासाठी पॅच टेस्ट केली जाईल.
- तसेच अचानक अॅलर्जिक रिअॅक्शन झाल्यास त्वरित उपचारासाठी क्लिनिकमध्ये आवश्यक आपत्कालीन साधनं तयार ठेवली जातील.
- प्रक्रियेनंतर त्या भागावर थोडी वेदना किंवा अस्वस्थता होऊ शकते, त्यामुळे आइस पॅक लावणे किंवा नंबिंग (ओठ सुन्न करणारी) क्रीम वापरणे उपयुक्त ठरते.
- तुम्हाला ओठांना अत्यंत लालसरपणा जाणवत असेल, पांढरट झाले असतील, तीव्र वेदना, थंडी जाणवत असेल किंवा रक्तस्त्राव यांसारखे कोणतेही गुंतागूंत दिसल्यास त्वचारोगतज्ज्ञांना त्वरित संपर्क करा, ते लगेच उपाय करतील.
- प्रक्रिया झाल्यानंतर किमान एक आठवडा फेशियल्स करणे टाळा. उपचारित भागावर मसाज करू नका आणि न स्पर्श करा.
- तिन्ही दिवसांसाठी कठोर व्यायाम, वाफ घेणे टाळा.
सर्व लिप फिलर काढता येतात का? (Do all lip fillers dissolve?)
हायल्युरॉनिकआधारित फिलर सर्वसामान्य आणि सहज काढता येण्यासारखे असतात. मात्र, जर तुमच्या फिलरमध्ये सिलिकॉन किंवा इतर काही पदार्थ असतील तर ते काढणे शक्य नाही.
फिलर शरीरातून कसा बाहेर पडतो?(How does the filler go out of the body?)
एकदा फिलर काढून टाकल्यानंतर तो यकृत आणि मूत्रपिंडाद्वारे शरीरातून बाहेर पडतो.
फिलर विघटनासाठी किती वेळ लागतो? (How much time does dissolution take?)
फिलर काढण्याची प्रक्रिया एका सत्रात साधारण १० ते १५ मिनिटे घेते. प्रक्रिया नंतर सूज, जखम आणि कोमलता सामान्य लक्षण असतात आणि काही दिवसांत ते कमी होतात. या लक्षणांसाठी काही औषधं शिफारस केली जाऊ शकतात. ओठांचे आकार हळूहळू कमी होऊन पूर्वीच्या स्वरूपात परत येतात.
फिलर घेण्यापूर्वी काय जाणून घ्यावे?(What should you know before going in for fillers?)
नेहमी अधिकृत आणि टॉपलाइन क्वालिटी ब्रँड्सचा वापर करा.
सुरक्षा ही किमतीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.