Plant Based Diet Good For Acid Reflux : चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, उशिरा झोपून लवकर उठणे या समस्यांमुळे अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. पण, छोटे छोटे उपाय करूनही अ‍ॅसिडिटीची समस्या काही केल्या कमी होत नाही. मग यासाठी नक्की करायचं काय असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोरच उभा राहतो. तर एका मुलाखतीत अभिनेता किंवा अभिनेत्री नाही तर चित्रपटाच्या निर्मात्यांनी जीवनशैलीत फक्त तीन बदल करून अ‍ॅसिडिटी गायब झाल्याचा जबरदस्त अनुभव शेअर केला आहे.

“द काश्मीर फाइल्स” चित्रपटाचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी अलीकडेच कर्ली टेल्सच्या मुलाखतीत आहाराच्या दिनचर्येबद्दल आणि अ‍ॅसिडिटीसह २ ते ३ आरोग्य समस्यांबद्दल सांगितले आहे. विवेक अग्निहोत्री दररोज नॉनव्हेज खायचे. प्रथिनांसाठी मासे खायचे, भरपूर मद्यपानाचे सेवन करायचे. पण, आता ते फक्त वनस्पती-आधारित अन्न खातात. मटण, चिकन सोडून बरीच वर्ष झाली असे त्यांनी आवर्जून मुलाखतीत सांगितले आहे.

विवेक अग्निहोत्री यांच्या मते, या बदलामागे विज्ञान आहे. नवीन वैद्यकीय शास्त्र हे जीवनशैली (लाइफस्टाईल मेडिसिन) वर आधारित आहे. त्यानुसार सर्व रोगांचं म्हणा किंवा आजारांच एकच कारण आहे, ते म्हणजे अन्न. त्यामुळे विवेक अग्निहोत्री ३ ते ४ नियम पाळतात. पहिलं म्हणजे जमिनीतून येणारे फळ, भाज्या, धान्य, डाळी खाणे. दुसरे म्हणजे चेहरा नसणारे अन्न टाळणे; जसे की, मासे. तिसरं म्हणजे टीव्हीवर जाहिरातीत दाखवणारे पदार्थ टाळणे, कारण नैसर्गिक केळं, दूध यासारखे पदार्थ कधीच जाहिरातीत दाखवत नाहीत.

विवेक अग्निहोत्री यांनी पुढे असेही सांगितले की, त्यांना २ ते ३ आरोग्य समस्या होत्या, ज्या कमीच होत नव्हत्या. त्यांना २० वर्षांपासून अ‍ॅसिडिटी होती; जी अगदी अशी गायब झाली, जणू आयुष्यात ती कधी नव्हतीच. यामुळे मग त्यांच्या डोक्यातली गोंधळलेली अवस्था (mental fog) नाहिशी झाली; तर विवेक अग्निहोत्री यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही अशा आहाराचे फायदे समजून घेण्यासाठी सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षक कनिक्का मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली.

वनस्पती-आधारित आहार अनेक भारतीयांना आवडतो आणि जवळचा वाटतो, कारण आपल्या परंपरेनुसार आपण शाकाहारी जेवणालाच जास्त प्राधान्य देतो. त्याचबरोबर निसर्गातून थेट येणारे पदार्थ निवडण्याचा आणि जास्त प्रक्रिया केलेल्या किंवा जाहिरात केलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा दृष्टिकोन ही अगदी आपल्या जुन्या भारतीय आजीच्या शिकवणीसारखीच पद्धत आहे.

जड, तेलकट, मसालेदार जेवणानंतर जवळजवळ प्रत्येक भारतीयाला ज्या तक्रारीचा सामना करावा लागतो त्या अ‍ॅसिडिटीपासून नॉनव्हेज आणि मद्यपान सोडल्यावर आराम मिळत असेल तर त्यात काही आश्चर्य नाही. त्यांनी मांसाहार आणि दारू पूर्णपणे बंद करून, त्याने आम्लपित्त आणि पचनाच्या त्रासाला कारणीभूत होणारे मुख्य कारणं त्यांच्या आयुष्यातून काढून टाकली आणि हे एकप्रकारे योग्यच आहे.

आहारतज्ज्ञांच्या मते, अनेक लोकांना असे आढळते की, वनस्पती-आधारित अन्न, जे फायबरने समृद्ध आणि पोटासाठी सौम्य असतात; त्यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात, विचारसरणीही स्पष्ट होते. पण, त्यासाठी शुद्ध शाकाहारी आहार नाही तर पोषणाची कमतरता भरून काढण्यासाठी डाळ, काजू, बिया आणि शक्यतो बी१२ पूरक आहारांचा समावेश तुमच्या जेवणात आलाच पाहिजेच. विवेक अग्निहोत्रीप्रमाणेच तुमच्या शरीराचे ऐकणे आणि नियमित तपासणी केल्याने कायमस्वरूपी आरोग्य फायदे तुम्हाला मिळू शकतात, असे तज्ज्ञ म्हणाले आहेत.

त्यामुळे जीवनशैलीत बदल करणे जसे की साधे, जास्त मसाल्यांशिवाय, घरी शिजवलेले अन्न खाणे. आम्लता आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. पारंपरिक भारतीय उपायांमध्ये ताक, दही, केळी, ताज्या, हंगामी भाज्या यांसारख्या पदार्थ पोटासाठी योग्य असतात आणि चांगले पचन करण्यास मदत करतात. मसालेदार, तेलकट, प्रक्रिया केलेले पदार्थ तसेच साखरेचे पेये आणि अल्कोहोल कमी करणे किंवा टाळणे छातीत जळजळ रोखू शकते आणि रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करू शकते. तसेच आले, जिरे, बडीशेप आणि तुळशीसारखे घटक पचनास प्रोत्साहन देतात आणि पचनसंस्थेला शांत करण्यास मदत करतात, असे विवेक मल्होत्रा म्हणाले आहेत.

बाजरी, डाळी, ताज्या हिरव्या पालेभाज्या वाफवून, हलक्या मसाल्याच्या वापर करून बनवल्या तर जेवण पौष्टिक आणि सौम्य बनते; त्यातच अधिक फायबर जोडणे आणि कमी प्रमाणात खाल्ल्याने आम्लता आणि ग्लुकोजची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते, ज्यामुळे एकूण आरोग्याला आधार मिळतो असे कनिक्का मल्होत्रा म्हणाल्या आहेत.