What Is The Best Exercise For Overall Health : तंदुरुस्त राहण्यासाठी आता सगळेच जण चालणं, जॉगिंग आणि सायकलिंग करू लागले आहेत. पण, व्यायाम तुमच्या आरोग्यासाठी चांगला तरीही तुमच्यासाठी वैयक्तिक ध्येय, तुमच्या फिटनेसची पातळी आणि शारीरिक स्थितीवर अवलंबून असतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी क्रियाकलापांपैकी, चालणे, जॉगिंग आणि सायकलिंग तुमच्या शरीराला अद्वितीय फायदे देतात. तुम्ही अगदी कमी हालचाली करणारे किंवा फिटनेस उत्साही असाल तुमच्यासाठी कोणती ॲक्टिव्हिटी किंवा व्यायाम सर्वात योग्य आहे हे ठरवण्यात आज आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत…
१. चालणे
बंगळुरूच्या जयनगरमधील क्लाउडनाइन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या प्रमुख फिजिओथेरपिस्ट शाझिया शादाब म्हणाल्या की, चालणे हा व्यायाम वय किंवा तुम्ही किती तंदुरुस्त आहात ही गोष्ट विचारात न घेता जवळजवळ प्रत्येकासाठी योग्य आहे.
चालण्याचे आरोग्यदायी फायदे
सांध्यांसाठी अनुकूल – तुम्ही तरुण असाल किंवा अगदी वृद्ध चालणे तुमच्या सांध्यासाठी अनुकूल ठरते.
हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम –चालणे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य वाढवते आणि रक्तदाब कमी करते.
वजन व्यवस्थापनास मदत – व्यायाम जॉगिंग किंवा सायकलिंगपेक्षा कमी परिणाम देणारा व्यायाम असला तरीही जलद चालणे कॅलरी बर्न करण्यास आणि वजन कमी करण्यात मदत करते.
मानसिक आरोग्य सुधारते – तर निसर्गाच्या सानिध्यात चालणे, तुमचा तणाव कमी करून तुमचा मूड सुधारण्यात मदत करू शकते.
चालणे या व्यायामाचे तोटे
जॉगिंग किंवा सायकलिंगच्या तुलनेत व्यायाम केल्याने कमी कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे शरीरावर अनावश्यक ताण न आणता दैनंदिन जीवनात हालचालींचा समावेश करण्याचा चालणे हा सर्वात सोपा मार्ग आहे, असे शादाब म्हणतात.
चालणे हा व्यायाम कोणासाठी बेस्ट आहे?
- दुखापतींमधून बरे होणे किंवा नव्याने व्यायाम करण्याची सुरुवात करणाऱ्यांसाठी चालणे हा व्यायाम बेस्ट आहे.
- एक सोपी आणि टिकाऊ व्यायामपद्धत आहे; ज्यामुळे दररोज थोडा वेळ काढून शरीर तंदुरुस्त ठेवायचं आहे, त्यांच्यासाठी चालणे सर्वोत्तम आहे.
- गर्भवती महिलांसाठी चालणे ही ॲक्टिव्हिटी बेस्ट आहे. यामुळे रक्ताभिसरण वाढवते आणि गर्भधारणेदरम्यान व्यायामाचा सर्वात सुरक्षित प्रकार सुद्धा मानला जातो.
२. जॉगिंग
शाझिया शादाब यांच्या मते जॉगिंग हा एक हाय इंटेंसिटी वर्कआउट आहे जो हृदयाला बळकट करून, सहनशक्ती वाढवतो आणि कॅलरीज बर्न करतो.
जॉगिंग करण्याचे फायदे
कॅलरी बर्न – जॉगिंग वजन कमी करण्यासाठी आणि चयापचय वाढविण्यासाठी कॅलरी बर्न करतात.
हाडांचे आरोग्य – जॉगिंग हाडे मजबूत करून ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी करतात.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती – जॉगिंग हृदयाचे आरोग्य आणि एरोबिक क्षमता वाढवते.
जॉगिंग कोणत्या लोकांसाठी बेस्ट आहे?
- इंटरमीडिएट किंवा फिटनेस उत्साही लोकांसाठी जॉगिंग हा पर्याय बेस्ट आहे.
- सहनशक्ती सुधारू इच्छिणारे किंवा लवकर वजन कमी करू इच्छिणारे लोकांसाठी जॉगिंग चांगला पर्याय आहे.
जॉगिंग करण्याचे तोटे काय ?
- जॉगिंग केल्यामुळे सांध्यांवर, विशेषतः गुडघ्यांवर आणि घोट्यांवर ताण येतो.
- जॉगिंग सांध्यांच्या समस्या किंवा लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींसाठी योग्य नाही.
३. सायकलिंग
रस्त्यावर सायकलिंग करणे असो किंवा गार्डन आणि व्यायाम शाळेत बसून सायकलिंग करणे असो हा एक सांध्यासाठी अनुकूल व्यायाम आहे; जो कार्डिओ फिटनेस फायद्यांसह स्नायूंना बळकट करण्यास हातभार लावतो.
सायकलिंग करण्याचे फायदे
कमी-प्रमाणकारक व्यायाम – जॉगिंग संधिवात असलेल्या लोकांसाठी योग्य आहे.
स्नायू टोनिंग – क्वॅडस्, हॅमस्ट्रिंग आणि कॅव्हल्ससह शरीराला बळकट करतो.
कॅलरी बर्न करण्यात मदत – कॅलरी बर्न करण्यासाठी सायकलिंग जॉगिंगचा प्रतिस्पर्धी आहे.
सायकलिंग लवचिकता प्रदान करते. तसेच घरामध्ये किंवा बाहेरही करता येऊ शकते.
सायकलिंग कोणासाठी बेस्ट आहे?
- सांधेदुखी असणाऱ्या व्यक्तींसाठी.
- जॉगिंग हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारताना त्यांचे पाय टोन करण्याचा प्रयत्न करतात.
- बाहेरील ट्रेल्सचा आनंद घेणारे किंवा इनडोअर सायकलिंग करण्याला प्राधान्य देणारे दुचाकीस्वार.
तर तुमच्यासाठी कोणता व्यायाम योग्य आहे?
तुमच्या फिटनेस ध्येयांवर, आरोग्य स्थितीवर आणि वैयक्तिक आवडीनिवडींवर तुम्ही कोणता व्यायाम करावा हे अवलंबून असते.
सामान्य आरोग्य आणि नवशिक्यांसाठी – चालणे हा सर्वात सोपा पर्याय आहे.
वजन कमी आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्तीसाठी – जॉगिंगमुळे सर्वाधिक कॅलरी बर्न होतात. पण, जॉगिंग या ॲक्टिव्हिटीसाठी तयारी आवश्यक असते.
स्नायू टोनिंगसाठी – सायकलिंग सांध्यांना अनुकूल व्यायाम आणि शरीराच्या बळकटीसाठी बेस्ट पर्याय आहे.
चालणे, सायकलिंग आणि जॉगिंगमधून फायदे मिळण्यासाठी काय करावे?
हळूहळू सुरुवात करा – तुम्ही कोणताही व्यायाम प्रकार निवडा. पण, त्याची तीव्रता आणि कालावधी हळूहळू वाढवा.
सगळ्या गोष्टी एकत्र करू नये – चालणे, जॉगिंग आणि सायकलिंग एकत्र केल्याने कंटाळा येऊ शकतो.
तयारी करा – जॉगिंगसाठी योग्य शूज आणि सायकलिंगसाठी योग्य फिटिंग असलेली सायकल वापरा.
नियमित आणि मध्यम प्रमाणात केलेला व्यायाम हा अचानक आणि खूप जास्त जोर लावून केलेल्या व्यायामापेक्षा अधिक फायदेशीर ठरतो.